आटपाडी ता.1- गेली सलग तीन दिवस अवकाळी पावसाने आटपाडी तालुक्याला झोडपून काढल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. रब्बी ज्वारी गहू आणि हरभरा पिकांच्या नुकसानी बरोबरच द्राक्ष आणि डाळिंब बागांना पावसाचा जबर फटका बसला आहे. आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आल्याने फळबागा आणि इतर पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. यंदा संपूर्ण पावसाळ्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मुख्य तलाव आणि विहिरी कोरड्या पडत चालल्या होत्या. परतीचा पाऊस जेमतेम झाला. त्यावर रब्बी ज्वारीच्या पेरणी केल्या. तर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी हरभरा आणि गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. रब्बी पिकांना थंडीची आवश्यकता असते मात्र अचानक गेली तीन दिवस अवकाळी पावसाने आटपाडी तालुक्याला पुरते झोडपून काढले आहे. यंदा पिकांना कसलीही थंडी मिळालेली नाही. पहिल्या दिवसाच्या पावसाने फारसे नुकसान झाले नव्हते. काही ठिकाणी तो उपयुक्त ठरणार होता मात्र पावसात सातत्य राहिल्याने याचा रब्बी पिकांना जबर फटका बसला आह...
गर्जा जय जय महाराष्ट्र माझा.