मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देशात कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार

गेल्यावर्षीच्या तुलनेमध्ये यंदा देशात साधारणतः दहा ते पंधरा टक्क्यांनी कापसाच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची अनेक अनेक कारणे आहेत.               बोगस बियाणे, पाणीटंचाई, मार्गदर्शिकांचा अभाव, खर्चाच्या तुलनेत कमी दर अशा विविध कारणामुळे राज्यात काही ठिकाणी कापसाचे क्षेत्र कमी झालेले होते. मात्र यंदा यामध्ये मोठा बदल झाला असून सरासरीपेक्षा दहा ते पंधरा ते वीस टक्के पर्यंत जास्त कापसाचे लागवड झाली आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन 15 ते 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये कापसाचे क्षेत्र वेगवेगळ्या प्रमाणात आहे. पंजाब मध्ये गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे क्षेत्र प्रचंड कमी झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी हंगामात नुकसान झाले. त्याचबरोबर काही अनेक कारणे आहेत की जी कापसाच्या लागवडीवर परिणाम करू शकतात.अनेक तज्ञांच्या मते वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज वर्तवण्यात येत आहे, कापसाचे क्षेत्र दहा टक्के वाढेल, तर काही तज्ञ असे सांगत आहे की कापसाच्या लाग...

माणगंगेच्या आखाड्यातून देशमुखांची माघार, निवडणूक बिनविरोध

आटपाडी येथील बंद असलेल्या माणगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीतून अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी आश्चर्यकारक सर्वच उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या गटाचे 18 उमेदवार बिनविरोध निवडून आले. अनपेक्षितरित्या  देशमुख गटाने उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.                                        येथील माणगंगा साखर कारखान्याची निवडणूक लागली होती. सत्ताधारी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख गटाने आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या गटाने परस्परांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 18 जागेसाठी 76 उमेदवारी अर्ज छाननीनंतर शिल्लक राहिले होते. निवडणूक बिनविरोधीसाठी बरेच वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाले होते. जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील गटाचे सर्व उमेदवारी अर्ज माघारी घेतील, अशी चर्चा होती. मात्र तानाजीराव पाटील यांनी ...

केंद्रात आणि राज्यात एकत्र असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत माणगंगेसाठी लढत होणार का?

येथील बंद असलेल्या माणगंगा साखर कारखान्याच्या अस्तित्वाची निवडणूक राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत होण्याची चिन्हे आहेत. कारखान्यातील सत्ताधारी आणि विरोधी गट राज्यात एकत्र सत्तेत असल्यामुळे कारखान्याचे रणांगण लागणार की समझोता होणार, ते 31 मे रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. त्याकडे लोकांच्या नजरा लागल्या आहेत.                                   श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी उभारलेला माणगंगा साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम 1986 मध्ये झाला होता. त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये ही बाहेरून ऊस आणून कारखाना चालू ठेवला होता. भीषण दुष्काळाच्या काळात दहा वर्षे कारखाना बंद राहिला होता तर 27 वर्षे कारखाना चालू होता. गेल्या पाच वर्षापासून कारखाना बंद आहे. जिल्हा बँकेने थकीत कर्जाच्या पोटी बँकेचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. सध्या कारखाना बँकेच्या ताब्यात असून कारखान्याची निवडणूक लागली आहे. सत्ताधारी गटाचे भा...

आटपाडी बाजार समितीचे नूतन कारभारी विकासाचे शिवधनुष्य उचलणार?

आटपाडी बाजार समितीत स्थापनेपासून यावेळी पहिल्यांदाच मतदारांनी सत्तांतर घडवली आहे. स्वच्छ, पारदर्शी कारभाराबरोबरच बाजार समिती विकसित करण्याच्या अपेक्षाचे शिवधनुष्य नवीन कारभाऱ्यांकडे आले आहे.                                                           खानापूर पासून स्वतंत्र करून आटपाडी बाजार समिती स्थापन झाल्यापासून यावेळी पहिल्यांदाच ऐतिहासिक मतदारांनी सत्तांतर घडवली आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याकडून जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि काँग्रेस व रासपकडे सत्तांतर झाले आहे. निवडणूक अटीतटीची झाली. बाजार समितीचे सभापती आणि उपसभापतींच्या निवडी पार पडल्या. सत्तांतरानंतरचा आनंदोत्सव साजरा केला. आत्ता नवीन कारभाऱ्यांना कामाला लागावं लागणार आहे. कारण त्यांच्याकडून मतदारांच्या अपेक्षा असल्यामुळे मतदारांनी सत्तेवर बसवला आहे.                       आट...

मराठी साहित्य परिषदेचा उत्कृष्ट शाखा पुरस्कार आटपाडी शाखेला प्रदान

आटपाडी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येथील शाखेला पुणे येथे साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून "राजा फडणीस उत्कृष्ट शाखा" या पुरस्काराने सन्मानित केले.  महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे अध्यक्ष विवेक सावंत, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येथील शाखेने अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना प्रदान केला.                                         पुणे येथे डॉ. माधवराव पटवर्धन सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी नामवंत लेखक अच्युत गोडबोले , साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलींद जोशी, डॉ. शमशुद्दीन तांबोळी, साहित्यिक सुभाष कवडे आणि वाचन आकलन उपक्रमाचे कार्यवाह दिनेश देशमुख उपस्थित होते.  महाराष्ट्रात साहित्य परिषदेच्या 350 वर शाखा असून यातून उत्कृष्ट शाखा पुरस्कार म्हणून आटपाडी शाखेची निवड करूध गौरव करण्यात आला. साहित्य संमेलन, विविध पुस्तक प्रकाशने, दरवर्षी अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचे मार...

मृत्यू पुर्वी पंधरा दिवस अगोदर डॉ. अनिल अवचट यांनी माणसान कुठं थांबावं, यावर लिहिलेला लेख "विसर्जन"

*डॉ.अवचट यांनी त्यांच्या मृत्यूच्या 15 दिवसांपूर्वी पुण्यातील त्यांच्या मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये एक पोस्ट टाकली होती. त्याचr xx ग्रुपमधील एका सदस्यानं 'एबीपी माझा'ला ही पोस्ट दिली आहे. “थांबणे” या मृत्यूपूर्वी 15 दिवस आधी अनिल अवचट यांनी लिहलेल्या पोस्टमधून समाधानी आयुष्य जगल्यावर कुठं थांबायला हवं यावर भाष्य करण्यात आलं आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर अनिल अवचट यांना आलेली विरक्ती आणि त्यातून त्यांनी सुरु केलेली निरवानिरव दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अनिल अवचट घरामध्ये तोल जाऊन पडले होते. त्यानंतर त्यांनी ही पोस्ट लिहली आणि ते कोमामधे गेले.* डॉ. अनिल अवचट यांची शेवटची पोस्ट: थांबणे... कुठे..? केव्हा..? कसे थांबावे..? ही एक कला आहे. ती सर्व कलांमध्ये लागू होते..! कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे जीवनातही घडते. माझ्याभोवती तरुणपणी अलौकिक माणसे होती. त्यांच्यामुळेच ही जाणीव मला होत गेली. विंदा करंदीकर माझे शेजारी आणि प्रतिभावंत कवी. एकदा त्यांनी ठणकावले की, आता मी लिखाण बंद करतो आहे. आणि ...

लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत खळखळ

लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत सध्या खळखळ सुरू झाली आहे. मी मोठा भाऊ, तु छोटा तर आपली ताकद वाढल्याचा दावा करून जास्तीत जास्त जागा आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच लागली आहे. त्या निमित्ताने उन्हाच्या तडाख्यात लोकांंंंंंंं्ंंंंंंंंंंंंंंंं्ंंंंंंंंंंंंंंंं्ंंंंंंंंंंंंंंं  मनोरंजन सुरू झाला आहे.                                                               गेल्या चार वर्षात राज्यात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडली आहेत. एकेकाळी भाजपाला सोबत घेऊन राज्यभर फिरवलेला उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजप पासून लांब गेली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी निर्माण केली आहे. या महाविकास आघाडीने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्धार आणि संकल्प तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेते मंडळींनी अनेक वेळा ज...

आमदार अनिलभाऊ कॅबिनेट मंत्री होणार

मे महिन्याच्या अखेरीस राज्य सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची शक्यता असून मंत्रिमंडळात खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांचे नाव आघाडीवर आहे. आमदार अनिल बाबर यांना मंत्रिपद मिळाल्यास खानापूर विधानसभा मतदारसंघाला स्थापनेपासूनचे पहिलेचे मंत्रीपद असणार आहे. आमदार बाबर यांना मदत व पुनर्वसन किंवा मृद व जलसंधारणचे कॅबिनेट मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.                 नुकताच उच्च न्यायालयाने 40 आमदार अपात्रतेचे अपील नुकतेच फेटाळले आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे फडवणी सरकार सुरक्षित झाल्यामुळे मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार करण्याच्या हालचाली गतीने सुरू झाल्या आहेत. येत्या शुक्रवार ता.२६ किंवा रविवारी ता. 28 मे रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेतून आमदार अनिल बाबर यांचे नाव निश्चित झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी आमदार बाबर यांच्या पत्नीचे निधन झाल्याने ते मंत्रीपदापासून लांब राहिले होते. दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्...

ईडीच्या रडारवर जयंत पाटील,,,अन् राष्ट्रवादीचा भाजपावर निशाणा

"ईडी"च्या रडारवर जयंत पाटील अन राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा                                                "ईडी " म्हणजेच सक्तवसुली संचालनालय हा शब्द शहरापासून गाव गाड्या पर्यंत आणि लहान पोरापासून आबाल वर्धापर्यंत चांगलाच परिचित झाला आहे. कारण नावाप्रमाणेच काम असल्याने चर्चेत आहे. या ईडीने भल्याभल्यांना दिवसा चांदण्यात दाखवल्या आहेत. आता ईडीचा कारभार कसा चालतो? कोणाच्या इशारावर चालतो?, कशासाठी वापर केला जातो? हे काय गुपित राहिलेले नाही. त्यामुळेच ईडीची बदनामीही तेवढीच मोठी झाली आहे. अश्या या ईडीच्या रडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आले आहेत,,,,.     "आयएल अँड एसएफ" प्रकरणात सत्यवसुली संचालनालयाने जयंत पाटील यांना दोन वेळा नोटीस दिली. पहिल्यांदा कामामुळे ते हजर राहू शकले नाहीत. तसं त्यांनी कळवले होते म्हणे. लागोलाग लगेच दुसरी नोटीसी पाठवली. यावेळी मात्र ते चौकशीला हजर झाले. त्यांची साडेनऊ तास चौकशी झाली. या चौकशीत जयंत पाट...

स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता निखारा- क्रांतिसिंह

स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता निखारा -क्रांतीसिंह नाना पाटील;म्हणजेच स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील धगधगता अंगार. जुलमी ब्रिटिश राजवटीला अहवान देणारे नाव म्हणजेच क्रांतिसिंह नाना पाटील. त्यांच्या लढ्याची आजच्या तरुण पिढीला माहिती व्हावी आणि त्यातून प्रेरणा मिळाली यासाठीच हा लेखन प्रपंच मांडला आहे. ब्रिटीशांना सळो की पळो करून नीरा काठ पासून ते कृष्णा, वारणा नद्यांचा खोऱ्यात प्रतिसरकार अर्थात पत्री सरकार स्थापन केले. प्रतिसरकार अर्थात पत्री सरकार म्हणजे ब्रिटिशांचे सरकार मान्य नसून इथल्या लोकांच्यासाठी ब्रिटिशांच्या विरोधात उभारलेले प्रति सरकार होते.गोऱ्यांच्या गुलमी आणि अत्याचारी कारभारा विरोधात देशात वणवा पेटला होता. त्यावेळी यात क्रांतिसिंह नाना पाटील आघाडीवर होते. ब्रिटिशच्या विरोधात 9 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीसिंह नाना पाटील यांनी आपल्या सवंगड्यांना आणि देशभक्तांना सोबत घेऊन प्रति सरकारची स्थापना केली. ज्याला आपण "पत्री सरकार" म्हणूनही ओळखतो. भूमीगत चळवळीच्या माध्यमातून ब्रिटिशांना त्यांनी आव्हान दिले होते. ब्रिटिशांनी उभारलेली संदेशाच्या देवाणघेवाणीची यंत्रणा उ...

"भाजपा ईडी को आगे करती, हमसे ओ डरती है" राष्ट्रवादीचे आंदोलन

ईडीकडून आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात खोटी कारवाई केली जात असल्याच्या निषेधार्थ आणि ईडीला‌ पुढे करून विरोधकांची मुस्कटदाबी केली जात असल्याच्या निषेधार्थ येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानी ईडी आणि भाजपाचा तीव्र निषेधाचे आंदोलन केले.                 पोलीस ठाण्याजवळील मुख्य चौकातील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन केले. त्यानंतर आंदोलकांनी तहसील प्रशासनाला निवेदन दिले.   राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते रावसाहेब पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सुरज पाटील, राष्ट्रवादी महिला च्या जिल्हा उपाध्यक्षा अनिता पाटील, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय यमगर, विकासराव देशमुख, ओबीसी सेल अध्यक्ष जालिंदर कटरे, राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष किशोर गायकवाड, संपतराव पाटील, साहेबराव कदम, मुन्ना मुलाणी, वसंतराव जगताप, राजेंद्र सावंत, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष ऋषिकेश गुरव, विशाल जाधव,दीपक पाटील, युवक तालुका सरचिटणीस नितीन डांगे, प्रशांत मोटे, दत्तात्रय...

राष्ट्रीय समाज पक्षाबदलची "ही" माहिती आहे का तुम्हाला

राष्ट्रीय समाज पक्ष  एक  भारतातील   राजकीय पक्ष  आहे. या पक्षाची स्थापना २००३ मध्ये झाली.  महादेव जानकर  हेेे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या पक्षाने आज पर्यंत ४ राज्यात २ लोकसभा लढविल्या. या पक्षाने  महाराष्ट्र ,  कर्नाटक ,  गुजरात ,  आसाम ,  उत्तर प्रदेश ,  राजस्थान ,  बिहार ,  तमिळनाडू   मध्यप्रदेश   विधानसभा  निवडणूका लढविल्या आहेत. सध्या ८ राज्यात पक्ष कार्यरत आहे. २०१७ झालेल्या महाराष्ट्रातील निवडणूकीत रा.स.प. ने जिल्हापरिषदेवर १२ आणि  तालुका  पंचायतवर १८ सभासद निवडून आणले. ०.२ मतदान मिळवून राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. याला निर्वाचन आयोगाकडून मान्यता मिळालेली आहे. २००३ साली पक्ष स्थापन करून २०१३ पर्यन्त  ग्रामपंचायत , ते  विधानसभा - लोकसभा लढविणे आणि जिंकणे, यात यश आले आहे. 2009ला राष्ट्रीय समाज पक्षाचा एक  आमदार  निवडून आला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये दौंड मतदार संघातून  राहूल कूल ...

आटपाडीतील रासपच्या पोरांनी यासाठी केले निधीचे संकलन

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय करण्यासाठी निवासस्थान कार्यालय घेण्यासाठी आटपाडी तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक लाख एक हजार रुपये गोळा करून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडे सुपूर्द केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरगर आणि त्यांच्या मावळ्यानी या निधीचे संकलन केले होते. या लोकनिधी संकलन आणि समर्पन सोहळा आटपाडी पार पडला. यावेळी महाराष्ट्र लोकहितवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तात्यासाहेब गायकवाड, रासकचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव ज्ञानेश्वर सलगर, रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित पाटील, रासपचे आणि तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरगर प्रमुख उपस्थित होते. दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हावी यासाठी कार्यालय निवासस्थान घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी महादेव जानकर यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या जिवाव...

शेटफळे येथील ध्येयधिशा संस्कार शिबिरातील फोटो

आटपाडी बाजार समितीच्या सभापती निवडीत कोण फुटला

आटपाडी बाजार समितीच्या सभापती निवडीत कोण फुटला? आटपाडी बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीत भाजप आघाडीतील एक मत फुटल्याने सेना आघाडीने सत्ता मिळवली मात्र फुटलेला संचालक कोण याचं गुपित रहस्य उघडलेले नाही. भाजपच्या गोटात आणि लोकांत वेगवेगळी नावे चर्चेत आहेत.                                                  आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने 18 पैकी नऊ जागेवर विजय मिळवला होता तर विरोधी शिंदे गटाची शिवसेना, काँग्रेस आणि रासप आघाडीने नऊ जागा मिळवल्या होत्या. 18 पैकी सत्ताधारी आणि विरोधी गटाला समान नऊ नऊ जागा मिळाल्या होत्या. संचालक निवडीचे मतमोजणी झाल्यानंतर अवघ्या दोन तासात भाजप आघाडीने त्यांचे निवडून आलेले आठ संचालक अज्ञात स्थळी हलवले होते. सर्वांचे फोन बंद होते. संचालकावर इतरांचे बारीक लक्ष होते. सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी वेळी भाजप आघाडीचे सर्व नऊ सदस्य एका वेळी एक...

वाचा चाळीस वर्षांपूर्वीची लग्न

नागेश गायकवाड तीस चाळीस वर्षांपूर्वीची लग्न म्हणजे अख्या गावाचा एक मोठा उत्सवच होता. एक महिना अगोदर लग्नाची तयारी चालायची. हाय नाई तेवढं पाहुणे लग्नाला मुक्कामाला यायची. एक महिना अगोदरच बस्ता काढायचा. काय तो बस्ता असायचा गावभर चर्चा व्हायची. एक आयरन नवरीच्या माणसानी काढायचा तर दुसरा नवऱ्याच्या माणसानी काढायचा. ही रिक्षा लागायची कापड भारी काढायची. इन, इवाय, मामाचा पोशाख. कान पिळकी,आजचीरच लुगडं काय काय लय असायचं. लग्नाच वराड घेऊन जाणाऱ्यासाठी अगोदरच बैलगाड्या तयार ठेवायच्या. बैलाला एक महिना अगोदरच गव्हाच्या कणकीचे गोळे चालून लठ्ठ आणि देखणी करायची. लग्नाच्या चार दिवस अगोदरच सारा गोतावळा गोळा व्हावा. तडम ताशाच्या वाद्याच्या गजरात गावदेव आदल्या दिवशी निघायचा. वराड आणायला आदल्या दिवशी मुरळी पाठवायचा. लग्नामध्ये आहेर केल्यानंतर माईकवरून पुकारायची पद्धत होती. अमुक अमुक एक रुपया, तमूक तमूक दोन रुपये, अशा प्रकारे. ज्याचा आहेर अकरा रुपये किंवा त्याच्या वर असेल, त्याच्याबद्दल तर खूप भारी वाटायचं. त्याच्यानंतर लग्नानंतर दोन-चार दिवसातच नवरदेव त्याला लग्नात हुंडा म...

आटपाडी बाजार समितीवर भगवा फडकला

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आटपाडी बाजार समितीच्या सभापती पदावर शिंदे गटाच्या शिवसेनेचे संतोष पुजारी आणि उपसभापती पदावर काँग्रेसचे राहुल गायकवाड यांची दहा विरुद्ध आठ मताच्या फरकाने निवड झाली. शिवसेना, काँग्रेस आणि रासप आघाडीने नऊ तर सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत नऊ जागेवर विजय मिळवला होता. त्यामुळे गुप्त झालेल्या मतदानात सेनेने बाजी मारली. आटपाडी बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे स्थापनेपासून निर्विवाद वर्चस्व राहिले होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी काँग्रेसचे जयदीप भोसले आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरगर यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली होती. तर सत्ताधारी गटाने माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्याशी आघाडी करून निवडणूक लढवली होती. विरोधकांनी सत्ताधार्‍यांना तगडे आव्हान दिले होते. सत्ताधारी आणि विरोधी गटाला समान नऊ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदावर कोण वि...

मराठी साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट शाखा पुरस्कार या शाखेला

नागेश गायकवाड--- मराठी साहित्य क्षेत्रात सातत्यपूर्ण सक्रिय असलेल्या येथील मराठी साहित्य परिषद शाखेला राज्यस्तरीय उत्कृष्ट शाखा पुरस्कार आज जाहीर झाला. या शाखेने गतवर्षी _एक लाख पुस्तक वाचन आणि आकलन" या राबवलेल्या उपक्रमाची मराठी साहित्य परिषदेने दखल घेतली. आटपाडीला मराठी साहित्य आणि साहित्याची मोठी परंपरा आणि वारसा लाभलेला आहे. आटपाडीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, ना.स. इनामदार, डॉ. शंकरराव खरात यांच्या रूपाने साहित्य संमेलनाला अध्यक्ष दिलेत. त्यांच्यानंतरच्या कालखंडात मराठी साहित्य लेखनाची परंपरा आटपाडीने कायम जोपासली आहे. नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आणि त्यांचे पुस्तके प्रकाशित करण्याच्या दृष्टीने आटपाडीत मराठी साहित्य परिषदेची शाखा गेली 25 वर्षे अखंडपणे सुरू आहे. आटपाडी तालुका मराठी साहित्य परिषदेच्या शाखेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख आहेत. ते शाखेच्या माध्यमातून दरवर्षी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवलेल्या लेखकाचे व्याख्यान आयोजित करतात. याशिवाय लहान मोठी साहित्य संमेलने होतात. तसेच मराठी साहित्य परिषदेच्...

काळीज चोरलेस माझे,,, शब्दाचे केलेस वार

 काळीज चीरलेस माझे, शब्दांचे केलेस वार,,.             हृदय आणि मन केलेस रक्तबंबाळ ना सोसावले मज वार. आले डोळ्यात अश्रू, ओतुनी रक्त माझे.                नाहून निघाले,, हृदय माझे रक्ताने, तुजसाठी गायिले मी शब्दांचे गीत, न कळली तुला माझ्या हृदयातील प्रीत. एकाकी जीव माझा,, तुझ्यातच गुंतला.. अन् आज जणू तोच विषारी काटा. हृदयामध्ये विखारी बनला,, सांडले रक्त भळभळते ह्रदयी. तरीही प्रेम तसेच शिलक्क राहिले, पण हृदय माझे धडधडन्यास विसरले कायमचे.

गुरुवारी कळणार आटपाडी बाजार समितीचा कारभारी

 आटपाडी ता.१६-आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची निवड गुरुवार ता. 18 मे रोजी होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटाने समान नऊ जागा मिळवल्याने निवडीत बाजी कोण मारणार?, या कडे  तालुक्याचे लक्ष लागले आहे.        आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची झाली होती. बाजार समितीची सत्ता आजपर्यंत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याकडे राहिली होती. यावेळी माजी आमदार श्री. देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि राष्ट्रवादीने आघाडी करून लढवली होती. तर त्यांना जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यानी काँग्रेसचे जयदीप भोसले आणि रासपचे लक्ष्मण सरगर यांना सोबत घेऊन शिंदे गटाची शिवसेना, काँग्रेस आणि रासप अशी आघाडी करून सत्ताधाऱ्यांना तगडे आव्हान दिले होते. या निवडणुकीत सत्ताधारी गटाला नऊ आणि विरोधकांना नऊ अशा समान जागा मिळाल्या. निवडून आलेले सदस्य अत्यंत कमी मताच्या दोन, पाच, सात, दहा या फरकाने निवडून आले आहेत. निकाल लागल्यानंतर दोन्ही गटाला समान जागा मिळाल्य...

गुरुजी कालचे,,, अन् आजचे,,

 काळ बदलत गेला. शिक्षण ही प्रक्रिया बदलत गेली आणि कालौघात शिक्षकही बदलत गेला. कधी काळी गावातील लोकांनी दिलेल्या अन्नधान्यावर जगणारा गुरूजी नंतरच्या काळात पगारदार झाला आणि आजच्या काळात चांगलाच स्थिरस्थावर झाला. आज या सरांची मानसिकता पूर्वीच्या गुरुजी सारखी राहिलेली नाही. 35 मिनिटांचा तास करणे एवढेच त्याचा देणे घेणे राहिला आहे. पोट पोटतिटकीना विद्यार्थ्यांना शिकवणे, विद्यार्थी घडवून दुरापास्त झाला आहे. कधी काळी "कणा" नावाची कविता तुम्हा वाचली असेलच. कुसुमाग्रज यांची ही कविता विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्यावर भाष्य करते. महापुरात सगळंच गमावून बसलेला विद्यार्थी केवळ हिम्मत मिळावी म्हणून आपल्या शिक्षकांकडे जातो. ‘ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी...’ इथून सुरुवात झालेली ही कविता शेवटी मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.. इथे संपते. ही कविता जेव्‍हा जेव्‍हा आठवते तेव्‍हा तेव्‍हा या कवितेतील विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही मनापासून ‘सॅल्यूट’ करावासा वाटतो. कारण एक विद्यार्थी आणि शिक्षकांचा नातं किती अंतकरणापासून जिवाभावाचे होते हे समजतं. मुळात सा...

शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी इजराइलला नेतो म्हणून 50 लाखाचा गंडा घातला

 आटपाडी - इजराइलला शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी घेऊन जातो म्हणून पुण्यातील भामट्याने सांगोला आणि आटपाडी तालुक्यातील 31 शेतकऱ्यांना 47 लाख 70 हजाराचा चुना लावला आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडून एक लाख साठ हजार रुपये घेऊन त्यांना इजराइल दौऱ्याला न नेहता फसवणूक केल्याची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.              याबाबत अधिक माहिती अशी की आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील मोठे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा एक व्हाट्सअप ग्रुप होता. या सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यातील महेश भाऊसाहेब कडूस पाटील राहणार गणेश नगर चिंचवड पुणे हा आला होता. दुष्काळी भागातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना इजराइल मधील डाळिंबाची अत्याधुनिक शेती डाळिंबातील तंत्रज्ञान दाखवण्यासाठी म्हणून शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करतो असे सांगून नाना गडदे त्यांच्या ३० मित्राकडून प्रत्येकी एक लाख ७० प्रमाणे पैसे घेतले होते. नानासो गडदे यांचे मित्र नाना यशवंत माळी, कल्लाप्पा गडदे सर्व रा.गोडवाडी ता. सांगोला यांच्यासह 29 जणांनी करगणी येथील आयसीआयसीआय बँकेतून महेश भाऊसाहेब कडव यांना पैसे पाठवले. त...

कविता

  काळीज चीरलेस माझे, शब्दांचे केलेस वार ना सोसावले मज वार ...  आले डोळ्यात अश्रू .. ... ओतुनी रक्त माझे.. तुजसाठी गायिले मी गीत .. न कळली आज तुला.. माझ्या हृदयातली प्रीत.. एकाकी जीव माझा .. त्या एकटीत गुंतला.. आज जणू विषारी काटा.. हृदयामध्ये खोल रुतला सांडले रक्त ह्रदयी.. प्रेम शिलक्क राहिले मात्र हृदय आज माझे ना सोसावले मज वार ... ओतुनी रक्त माझे.. तुजसाठी गायिले मी गीत .. न कळली आज तुला.. माझ्या हृदयातली प्रीत.. एकाकी जीव माझा .. त्या एकटीत गुंतला.. आज जणू विषारी काटा.. हृदयामध्ये खोल रुतला सांडले रक्त ह्रदयी.. प्रेम शिलक्क राहिले मात्र हृदय आज माझे ना सोसावले मज वार ... ओतुनी रक्त माझे.. तुजसाठी गायिले मी गीत .. न कळली आज तुला.. माझ्या हृदयातली प्रीत.. एकाकी जीव माझा .. त्या एकटीत गुंतला.. आज जणू विषारी काटा.. हृदयामध्ये खोल रुतला सांडले रक्त ह्रदयी.. प्रेम शिलक्क राहिले मात्र हृदय आज माझे धडधडन्यास कायमचे विसरले