रोम जळत होतं, तेव्हा निरो फिडल वाजवत होता…” रोमन सम्राट निरो बाबतची ही म्हण प्रसिद्ध आहे. रोममध्ये जाणीवपूर्वक आग लावण्याचा आरोप निरोवर केला जातो. फिडल हे एक तंतुवाद्य आहे. आपली आई, सावत्र भाऊ आणि पत्नींची हत्या घडवून आणणारा आणि दरबारातल्या किन्नरांसोबत लग्न करणारा एक क्रूर राज्यकर्ता अशी इतिहासात निरोची नोंद आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी निरो आईच्या प्रयत्नांमुळे राजगादीवर आला. साल होतं इसवी सन 54. या साम्राज्याच्या सीमा स्पेनपासून ते उत्तरेला ब्रिटन आणि पूर्वेला सीरियापर्यंत पोहोचलेल्या होत्या. निरोची आई अग्रिपीना हिला सत्तेची लालसा होती. कटकारस्थानं करत तिने निरोला सत्ता मिळवून दिली. अग्रिपीनाने तिचा काका सम्राट क्लॉडियसशी विवाह केला आणि त्याच्या लेकीशी निरोचं लग्न लावून दिलं. त्यामुळे निरो राजघराण्याचा सदस्य तर झालाच पण सोबतच राजाला स्वतःचा मुलगा असूनही निरो सम्राट क्लॉडियसचा उत्तराधिकारीही ठरला. अग्रिपीनाने सम्राट क्लॉडियसला विषारी मश्रूम म्हणजे अळंबी खायला घालून ठार केलं, असं म्हटलं जातं. पण यामध्ये कितपत तथ्य आहे, हे सिद्धं होऊ शकलेलं नाही
गर्जा जय जय महाराष्ट्र माझा.