मुख्य सामग्रीवर वगळा

अवकाळी पावसाने आटपाडी तालुक्याला झोडपले

आटपाडी ता.1- गेली सलग तीन दिवस अवकाळी पावसाने आटपाडी तालुक्याला झोडपून काढल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. रब्बी ज्वारी गहू आणि हरभरा पिकांच्या नुकसानी बरोबरच द्राक्ष आणि डाळिंब बागांना पावसाचा जबर फटका बसला आहे.                       आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आल्याने फळबागा आणि इतर पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. यंदा संपूर्ण पावसाळ्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मुख्य तलाव आणि विहिरी कोरड्या पडत चालल्या होत्या. परतीचा पाऊस जेमतेम झाला. त्यावर रब्बी ज्वारीच्या पेरणी केल्या. तर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी हरभरा आणि गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. रब्बी पिकांना थंडीची आवश्यकता असते मात्र अचानक गेली तीन दिवस अवकाळी पावसाने आटपाडी तालुक्याला पुरते झोडपून काढले आहे. यंदा पिकांना कसलीही थंडी मिळालेली नाही. पहिल्या दिवसाच्या पावसाने फारसे नुकसान झाले नव्हते. काही ठिकाणी तो उपयुक्त ठरणार होता मात्र पावसात सातत्य राहिल्याने याचा रब्बी पिकांना जबर फटका बसला आहे. तीन दिवसात आटपाडी करगणी दिघंची झरे आणि खरसुंडी परिसरात शंभर मिलिमीटरवर पाऊस पडला आहे. पावसासोबत वादळी वारे होते. त्यामुळे आगाप रब्बी ज्वारी भोईसपाट झाली तर नुकताच पेरणी केलेला गहू आणि हरभऱ्याची जमीन सलग पावसामुळे कठीण येणार आहे. त्याचा उगवण क्षमतेवर परिणाम होणार आहे. हरभरा पिकाला जास्त पाऊस चालत नाही. तीन दिवसाच्या पावसामुळे हरभरा पिके उनमळून गेली आहेत.  रब्बी पिकांना थंडीची आवश्यकता असते मात्र ती नसल्यामुळे त्याचा प्रतिकूल परिणाम पिकावर झाला आहे. राजेवाडी, पुजारवाडी आणि निंबवडे भागात 70 ते 90 दिवस द्राक्षाचा हंगाम धरून झालेल्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षामध्ये द्राक्षमणी तडकणे आणि सडण्याचे प्रमाण वाढले आहे. तर नुकत्याच धरलेल्या बागेत भुरी आणि दावण्याने धुमाकूळ घातला आहे. सलग तीन दिवस पडलेला पाऊस, वाढलेली उष्णता आणि आद्रतेमुळे डाळिंब बागांत तेल्या रोगाचे प्रमाण वाढले आहे. तसेच विक्रीसाठी आलेल्या बागांत फळकुजीने प्रवेश केला आहे. सलग तीन दिवस पडलेल्या पावसामुळे बहुतांश सर्व शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. फळबागा वाचवण्यासाठी आवश्यक फवारणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे.                            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते