मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खरसुंडीत अजित पवार यांना शिवसेनेकडून श्रद्धांजली

आटपाडी ता.१- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल खरसुंडी येथे शिवसेनेने शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीला उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण केली.              खरसुंडी येथे शिवसेनेच्या कार्यालयात हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जयदीप भोसले यांच्या हस्ते अजित पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ. मनीषा पुजारी, डॉ. उमेश पुजारी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे प्रमुख उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर आणि केलेल्या कामावर प्रकाश टाकून मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यावेळी विनोद पुजारी, जहांगीर शेख,दुर्वाआप्पा देठे, ओटीवाडी विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष बापुराव खाडे,मा जी उपसरपंच मच्छिंद्र भोसले, सुमंत पुजारी,शरद पेडकर, ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.         फोटो -१) खरसुंडी ता. आटपाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेनेकडून श्र...

खरसुंडती भाजपाची प्रचारात जोरदार मुसंडी

आटपाडी - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत खरसुंडी गटात खरसुंडीसह नेलकरंजी, चिचाळे, कानकात्रेवाडी आणि गोमेवाडी गावांनी आज राजकीय भूमिका स्पष्ट करत ‘कमळ’लाच मत देण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराने या गावांमध्ये अक्षरशः राजकीय वादळ निर्माण केले असून, विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे. खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार चंद्रकांतभाऊ भोसले आणि खरसुंडी पंचायत समिती गणातील उमेदवार सौ. लता पुजारी व नेरकंजी गणाच्या उमेदवार पौर्णिमा महारगुडे यांच्या प्रचारासाठी चिंचाळे खरसुंडी आवटेवाडी धावडेवाडी नेलकरंजी गोमेवाडी आधी गावात उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी आणि बैठकी घेतल्या. महिला, युवक, शेतकरी व ज्येष्ठ नागरिकांचा लोंढा उसळला. विशेष म्हणजे, यावेळी प्रचाराची सूत्रे महिलांनीच हाती घेतली असून, महिलांचा अभूतपूर्व सहभाग हा या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरत आहे. प्रचारादरम्यान ग्रामस्थांनी थेट शब्दांत सांगितले की, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्व बाबींमध्ये भाजपच्या उमेदवारांनी सातत्याने प...

करगणीत राजकीय भूकंप, विरोधी तीन सदस्यानंतर आता उपसरपंचाच्या भावाचा शिवसेनेला पाठिंबा

करगणी -करगणीत भाजपाला रोज धाक्यावर धक्के बसत आहेत. अनेकांनी भाजपाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपाच्या तब्बल तीन ग्रामपंचायत सदस्य नंतर आता विद्यमान उपसरपंच साहेबाराव खिलारी यांचे  बंधू प्रसिद्ध गलाई व्यावसायिक अंकुश खिलारी यांनी महायुतीचे उमेदवार विनायकराव मासाळ आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पाठिंबा जाहीर केला. यापूर्वी अभिजित जाधव,रूपाली कांबळे, उत्तम माने, या ग्रामपंचायत सदस्यांनी सेनेचा भगवा खांद्यावर घेतला होता. बड्या नेत्यांचे पक्षांतर आणि पाठिंबा: साहेबाराव खिलारी आणि  त्यांचे बंधू अंकुश खिल्लारी हे करगणी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच असून त्यांचा गावात मोठा जनसंपर्क आहे.  त्यांच्यासोबतच गलाई व्यवसायातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अंकुश खिलारी यांनीही शिवसेनेची धुरा हाती घेण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीच्या ताकदीत मोठी वाढ झाली आहे. विनायकराव मासाळ आणि दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.विजयाचा निर्धार: यावेळी बोलताना अंकुश खिलारी म्हणाले की, भागाच्या विकासासाठी आण...

नेलकरंजीत शिवसेनेला अभूतपूर्व प्रतिसाद

नेलकंरजी:'एकच ध्यास, खरसुंडी गटाचा विकास' हे ब्रीदवाक्य घेऊन निघालेल्या प्रचार दौऱ्याला नेलकंरजी गावात ग्रामस्थांनी उदंड आणि अभुतपुर्व प्रतिसाद दिला. आज पार पडलेल्या या दौऱ्यानिमित्त आयोजित सभेत जनसागराचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला, ज्यामुळे आगामी निवडणुकीतील विजयाचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रचार दौऱ्यादरम्यान उपस्थित प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी श्री. जयदीप भैय्या भोसले, डॉ. मीनाक्षी उमेश पुजारी, आणि सौ. सुनीता दत्तात्रेय सरगर यांच्यासह मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

विद्या मोटे यांच्यासाठी लाडक्या बहिणींची वज्रमूठ; तरुणाईच्या सहभागामुळे परिवर्तनाचे वारे

आटपाडी ता. 1- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निंबवडे जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असून, शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांच्या पाठीशी महिला, सुशिक्षित मतदार आणि युवक मोठ्या ताकतीने उभे राहिल्याचे चित्र आहे. या गटातील प्रचाराची धुरा खुद्द महिला आणि तरुणांनीच आपल्या खांद्यावर घेतल्याने यंदा निंबवडे गटात ऐतिहासिक परिवर्तन अटळ मानले जात आहे. विद्या मोटे यांनी गेल्या चार वर्षांपासून निंबवडे गटात विविध सामाजिक उपक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी केली आहे. त्यांच्या या कार्याचा प्रभाव तरुणांवर आणि महिलांवर मोठ्या प्रमाणावर पडला असून, त्याचाच सकारात्मक परिणाम या निवडणुकीत दिसून येत आहे. गटातील दिशा भरकटलेल्या तरुणांना प्रबोधनातून योग्य वाट दाखवण्याचे काम मोटे यांनी केले, ज्यामुळे आज सुशिक्षित युवक त्यांच्या प्रचारात अग्रभागी आहेत*लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त सहभाग* या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, सांगली जिल्ह्यात सर्वाधिक महिलांची गर्दी विद्या मोटे यांच्या प्रचारात पाहायला मिळत आहे. विशेषतः सर्वसामान्य कुटुंबातील महिला आण...

शेटफळेत आचारसंहिता संपल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवणार - विनायक मासाळ

शेटफळेत आचारसंहिता संपल्यावर वीस पंचवीस दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वखर्चाने पुतळा बसवणार असल्याचा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार विनायक मासाळ यांनी दिले. शेटफळे येथे प्रचार सभेत ते म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शेटफळे सारख्या सुसंस्कृत गावात पुतळा बसविण्याची संधी मिळणार आहे. हे माझे खरोखर भाग्य समजतो."विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे, मी शब्द दिला आहे आणि तो मी पाळणारच. त्यामुळे तुम्ही उद्याच लगेच दुसरा एखादा शब्द देऊन लोकांची दिशाभूल करू नका. मला फक्त आचारसंहिता संपल्यानंतर २० ते २५ दिवसांचा अवधी द्यावा. जर या विहित काळात मी पुतळा बसवला नाही, तर तुम्ही खुशाल तो बसवावा.

जोगेश्वरी मंदिरासाठी आम्हीच निधी दिला - हर्षवर्धन देशमुख यांचा दावा

शेटफळेतील जोगेश्वरी मंदिराच्या सभागृहासाठी तात्कालिक खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून आम्ही निधी दिला आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी यासाठी खास प्रयत्न केला होता.  कामाचे उद्घाटन कोणीही केले असले तरी निधी हा आम्हीच दिला आहे. त्यासाठी आमचें प्रयत्न होते, असा दावा माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी शेटफळे येथे प्रचार सभेत केला.

निंबवडते शिवसेनेच्या विद्या मोटेे यांचा अनोखा प्रचार

नावीन्यपूर्ण प्रचाराने निंबवडेत विद्याताई मोटेंना उत्स्फूर्त प्रतिसाद; पथनाट्याच्या माध्यमातून दाखवली विकासाची दिशा* निवडणूक प्रचारात नावीन्यपूर्ण उपक्रमांचा वापर करत शिवसेना उमेदवार ॲड. विद्याताई सचिन मोटे यांनी निंबवडे गावात वेगळा उपक्रम राबवला. लोकसंपर्कासाठी पथनाट्याचा प्रभावी वापर करण्यात आला. ‘इंद्र–नारद’ संवादाच्या माध्यमातून विकासाची दिशा मांडण्यात आली. या हटके संकल्पनेमुळे प्रचाराला वेगळीच ओळख मिळाली. सभा, पदयात्रा आणि कोपरा सभांसोबत हा उपक्रम राबवण्यात आला. पथनाट्याने उपस्थितांवर सकारात्मक प्रभाव टाकला. नागरिक आणि मतदारांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी या प्रयोगाचे कौतुक केले. निंबवडेतील कार्यक्रमानंतर विद्याताई मोटे मुडेवाडी येथे दाखल झाल्या. त्यांच्यासोबत पंचायत समिती गणाचे उमेदवार सचिन मोटे उपस्थित होते. कार्यकर्ते, मतदार आणि ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. स्वागतामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. दिवेलागणीची वेळ असूनही महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी विद्याताईंनी महिलांशी थेट संवाद साधला. महिलांनी आपले विचार आणि अपेक्षा मांडल्...

निंबवडे गट दहशतमुक्त आणि स्वाभिमानी समाज निर्मातीसाठी सेनेला साथ द्या - अँड. विद्या मोटे

आटपाडी -लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासोबतच निंबवडे गट दहशतमुक्त आणि स्वाभिमानी समाज निर्मातीसाठी शिवसेनेला सोबत साथ द्यावी, असे आवाहन अँड. विद्या मोटे यांनी केले. त्यांनी बनपुरी, बाळेवाडी आदी गावांचा दौरा केला. त्याच्या सोबत माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील आदी होते. शिक्षण, रोजगार, आरोग्याचया प्रश्नांसाठी निंबवडे जिल्हा परिषद गटाची प्रतिनिधी म्हणुन मी प्रामाणिक योगदान देणार आहे. माझ्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी व्हावा, अशी माझी भुमिका आहे. निंबवडे गटातील सर्व जनता परिवर्तनासाठी शिवसेनेसोबत आहे, असा विश्वास निंबवडे जिल्हा परिषद गटातील शिवसेना उमेदवार विद्याताई मोटे यांनी व्यक्त केला.  मतदारांना स्वाभिमानी समाज निर्मीतीसाठी शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन केले. साध्य फौडेशनच्या माध्यमातुन अनेकांना मदतीचा हात देत आम्ही शिक्षण, नोकरीची दारे खुली केली आहेत. वृक्षारोपण चळवळ, वैद्यकीय मदत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राव्दारे आम्ही लोकहिताचा नवा अध्याय निर्माण केला. समाजाला द...

करगणीत भाजपाच्या तीन ग्रामपंचायत सदस्याचा शिवसेनेत प्रवेश, भाजपाला पडले खिंडार

आटपाडी ता. 28- निवडणुकीच्या रणधुमाळीत करगणीत भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील भाजपाच्या तीन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आज शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे करगणीत शिवसेनेची बाजू अधिक भक्कम झाली आहे.यांनी केला शिवसेनेत प्रवेश: सलग तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले गावातील प्रभावी नेते उत्तम माने, विद्यमान सदस्य अभिजित जाधव, आणि आण्णा कांबळे व त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्या सौ. रूपाली आण्णा कांबळे यांनी भाजपला रामराम ठोकला. नाराजीचे नेमके कारण काय? "ग्रामपंचायत आणि वरिष्ठ स्तरावर भाजपमध्ये कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याकडे सरपंच आणि पक्षाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे," असा आरोप प्रवेशकर्त्या सदस्यांनी केला आहे. विकासाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या या तीव्र नाराजीमुळेच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.महायुतीच्या उमेदवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचे करगणी जिल्हा परिषद गटाचे उम...

खरसुंडती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेनेकडून श्रद्धांजली

 आटपाडी -- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या प्रचार शुभारंभ रद्द करण्यात आला.  त्यानंतर खरसुंडीतील पक्ष कार्यालयामध्ये जयदीप भोसले यांच्या हस्ते अजित पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पंचायत समितीच्या उमेदवार डॉ मनीषा पुजारी, डॉ उमेश पुजारी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे, विनोद पुजारी जहांगीर शेख,दुर्वाआप्पा देठे,औटेवाडी चेअरमन बापुराव खाडे,माजी उपसरपंच मच्छिंद्र भोसले, सुमंत पुजारी,शरद पेडकर ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी यांच्यासह मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयदीप भोसले यांचा तळेवाडीतून प्रचाराचा झंजावत

आटपाडी ता. 28- खरसुंडी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार जयदीप भोसले यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ तळेवाडी येथील श्री. सिद्धनाथ आणि विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन उत्साहात केला. यावेळी जिल्हा परिषदेचे उमेदवार जयदीप भोसले आणि पंचायत समितीच्या उमेदवार सौ. सुनीता सरगर प्रामुख्याने उपस्थित होत्या. विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचा कौल मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर खरसुंडी गटात आता तळेवाडी, काळेवाडी आणि गोमेवाडी या गावांचा नव्याने समावेश झाला आहे. या नवीन गावांमध्ये जयदीप भोसले यांचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले. शिवसेनेच्या माध्यमातून या भागात झालेली विकासकामे आणि स्वर्गीय मोहनराव पाटील (काका) यांचे या परिसराशी असलेले जुने जिव्हाळ्याचे नाते आठवत ग्रामस्थांनी दोन्ही उमेदवारांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवलाउर्वरित कामांसाठी शिवसेनेला साथ द्या: तानाजी पाटील काळेवाडी येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, "या परिसराच्या विकासासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. राहिलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी आणि विकासाच...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटातील उमेदवारांची अंतिम यादी

टेंभूत भाजप नव्हे तर युती आणि अनिलभाऊंचा सिंहांचा वाटा

टेंभू सोबत सामान्य माणसानेच स्वर्गीय आमदार अनिल भाऊंचा नाव जोडलं आहे. त्यांनीच योजना मांडण्यापासून 2014 नंतर गती देऊन पाणी देण्याचे काम केलं आहे आणि राज्यात फक्त भाजपाची सत्ता नव्हती सोबत शिवसेना होती, असे प्रत्युत्तर आमदार सुहास बाबर यांनी विरोधकांना दिले. यावेळी त्यांनी युतीची सत्ता आणि स्वर्गीय आमदार अनिलभाऊ यांचाच टेंभू योजनेत सिंहांचा वाटा असल्याचा प्रबळ दावा केला.               नेलकरंजी ता. आटपाडी येथे प्रचार सभेनंतर झालेल्या पत्रकार बैठकीत आमदार सुहास बाबर यांनी टेंभू संदर्भात भाजप नेतेमंडळीकडून टेंभू योजना भाजपानेच मार्गी लावल्याचा दावा केला जात असल्याच्या प्रश्नावर मत व्यक्त केले. टेंभू सोबत स्वर्गीय आमदार अनिलभाऊ यांचे सर्वसामान्य माणसांनीच नाव जोडले आहे. कोणत्याही गावातील कोणत्याही माणसाला विचारलं तर टेंभू आणि अनिल भाऊ असंच तोंडातून नाव येत. कारण त्यांनीच योजना मांडली आणि गती देऊन पूर्णत्वाकडे नेहली. सांगलीत भाजपात प्रवेश केलेल्या मंडळींमध्ये अपवाद एखादा वगळता शिवसेनेचा कोणीही नव्हता. जे आमच्या विरोधात भूमिका घेत होते अशीच...

बाळेवाडीत शिवसेनेचा ‘वनवे’ निर्धार; माजी सभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती भगवा

आटपाडी (प्रतिनिधी): सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळेवाडी (ता. आटपाडी) गावाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. बाळेवाडीतील माजी महिला व बालकल्याण सभापती, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच आणि विविध सोसायट्यांच्या अध्यक्षांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेचा 'भगवा' हाती घेतला आहे. या जंगी पक्षप्रवेशामुळे बाळेवाडी गाव पूर्णपणे ‘भगवामय’ झाले असून निवडणुकीत शिवसेनेला गावातून ‘वनवे’ मतदान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जनसंवाद मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी हा राजकीय धडाका पाहायला मिळाला. यावेळी निंबवडे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. विद्याताई मोटे आणि निंबवडे पंचायत समिती गणाचे उमेदवार सचिन मोटे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला. *यांनी केला शिवसेनेत प्रवेश*: जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण व समाजकल्याण सभापती सौ. संगिता गणपतराव खरात, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बायनाबाई श्रीमंत खताळ, विद्यमान सदस्य कासाबाई भिमराव भुते, माजी चेअरमन रामचंद्र कारंडे, माजी चेअरम...

स्व. मोहनकाकांची मिनी मंत्रालयात प्रभावी कामगिरी

जयदीप भोसले यांच्या प्रचारासाठी नारीशक्ती एकवटली

खरसुंडी ( प्रतिनिधी)- खरसुंडी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण तापत चालले असून, शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार जयदीप भोसले आणि खरसुंडी गणातील उमेदवार डॉ. मीनाक्षी पुजारी यांच्या प्रचारासाठी आता महिला शक्ती एकवटली आहे. गावभेटी आणि पदयात्रांच्या मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या आहेत.   जयदीप भोसले यांच्या समर्थनार्थ महिला कार्यकर्त्यांनी तनपुरवाडी, घुलेवाडी आणि कानकात्रेवाडी या गावांत जोरदार प्रचार फेरी काढली. या फेरीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. फेरीनंतर महिलांनी घरोघरी जाऊन इतर महिला मतदारांशी संवाद साधला. संवाद साधताना महिला कार्यकर्त्यांनी स्वर्गीय मोहनराव (काका) बाबर, माजी आमदार स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली कामे, तसेच विद्यमान आमदार सुहास बाबर आणि सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात झालेल्या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली. "विकासाची ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी शिवसेनाच हवी," अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. जयदीप भोसले यांना गावागावातून आणि विशेषतः महिला मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळ...

नेलकरंजी--शिवसेनेचे जयदीप भोसले यांनी मतदारांशी साधला संवाद

आटपाडी (प्रतिनिधी):खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार जयदीप भोसले यांनी निवडणूक प्रचारार्थ मिटकी गावाच्या नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले असून, आगामी काळात त्यांच्या पाठीशी ठाम राहण्याची ग्वाही दिली आहे. *बाळूमामांचे दर्शन घेऊन प्रचाराचा श्रीगणेशा* जयदीप भोसले यांनी दौऱ्याची सुरुवात मिटकी येथील संत बाळूमामा मंदिरात दर्शन घेऊन केली. देवदर्शनानंतर त्यांनी गावातील प्रमुख चौक आणि वस्त्यांवर जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या.    *मोहनकाकांच्या विकासकामांना उजाळा* यावेळी झालेल्या कोपरा सभा आणि संवादादरम्यान ग्रामस्थांनी माजी आमदार स्वर्गीय मोहनराव पाटील (मोहनकाका) यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांच्या आठवणींना उजाळा दिला. "काकांच्या काळात झालेली कामे आजही आमच्या स्मरणात आहेत आणि त्याच विकासाची परंपरा पुढे नेण्यासाठी आम्ही जयदीप भोसले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू," असा विश्वास ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला. या संवाद दौऱ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कटरे, सचिन गुर...

माधवी पडळकर यांचा "होम टू होम" प्रचाराचा झंझावात

निंबवडे ( विशेष प्रतिनिधी) - निंबवडे जिल्हा परिषद गटातील  भाजपाच्या उमेदवार माधवीकाकी पडळकर यांनी आपला प्रचाराचा वेग प्रचंड वाढवला असून, त्यांनी 'पायाला भिंगरी' लावून संपूर्ण गट पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. घर टू घर गाठीभेटी आणि महिलांशी थेट संवाद यावर भर दिल्याने पडळकर यांना मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या या सक्रियतेने विरोधकांच्या गोटात मात्र धडकी भरली आहे.                  *प्रत्येक उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यावर भर* माधवीकाकी यांनी प्रत्येक गाव, वाडी आणि वस्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. नुकत्याच त्यांनी विभुतवाडी, पारेकरवाडी, झरे आणि कुरुंदवाडी या गावांचा दौरा केला. केवळ सभांमधून भाषणे न देता, त्या प्रत्येक कुटुंबाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचत आहेत. घरातील महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत आहेत. महिलांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला असून, गावागावातील ज्येष्ठ महिलांचे आशीर्वाद त्यांना मिळत आहेत. *तरुण आणि महिला शक्तीची मोठी साथ* पडळकर यांच्या प्रचा...

विनायक मासाळ यांच्या 'संवाद फेरी'ला शेटफळेत प्रचंड प्रतिसाद; ज्येष्ठ नागरिकांचे घेतले आशीर्वाद

शेटफळे (प्रतिनिधी) करगणी जिल्हा परिषद गटातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार विनायक मासाळ यांच्या प्रचारार्थ शेटफळे गावात काढण्यात आलेल्या 'संवाद फेरी' आणि 'संवाद बैठकी'ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावातील प्रमुख चौक आणि वस्त्यांवर विनायक मासाळ यांनी स्वतः जाऊन मतदारांशी संवाद साधला. प्रचाराचा भाग म्हणून गावात भव्य संवाद फेरी काढण्यात आली होती. यावेळी विनायक मासाळ यांनी कार्यकर्त्यांसोबत बाजार पटांगण, नेताजी चौक, जोगेश्वरी चौक, करगणी कॉर्नर आणि अकरावर अशा विविध भागांत थांबून नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. विशेषतः कट्ट्यांवर आणि चौकांमध्ये बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी ज्येष्ठांनीही मासाळ यांना मोलाच्या सूचना आणि शुभेच्छा दिल्या. *पाटील मळा येथे रंगली संवाद बैठक* संवाद फेरीनंतर शेटफळे येथील पाटील मळा येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विनायक मासाळ यांनी गावकऱ्यांसमोर विकासाचा 'रोडमॅप' मांडला. "गावाचा सर्वांगीण विकास आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे हेच आमच...

विनायकराव मासळा यांच्या शेटफळेतील संवाद फेरीतील निवडक फोटो

शिवसेनेच्या अ‍ॅड. विद्यताईा मोटे यांचा ‘डोअर टू डोअर’ प्रचाराने झंझावात

निंबवडे ( विशेष प्रतिनिधी) - निंबवडे जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या उमेदवार अ‍ॅड. विद्याताई मोटे यांनी आपला प्रचाराचा वेग प्रचंड वाढवला असून, त्यांनी 'पायाला भिंगरी' लावून संपूर्ण गट पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. घर टू घर गाठीभेटी आणि महिलांशी थेट संवाद यावर भर दिल्याने अ‍ॅड. मोटे यांना मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या या सक्रियतेने विरोधकांच्या गोटात मात्र धडकी भरली आहे.                                                *प्रत्येक उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यावर भर* निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यापासून अ‍ॅड. विद्या मोटे यांनी प्रत्येक गाव, वाडी आणि वस्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. नुकत्याच त्यांनी विरोधाचा गड समजल्या जाणाऱ्या झरे गावांचा दौरा केला. त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. केवळ सभांमधून भाषणे न देता, त्या प्रत्येक कुटुंबाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचत आहेत. घरातील महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत आहेत. म...

माधवीताई पडळकरांच्या प्रचाराचा झंझावात; 'घरोघरी भेटी'तून मतदारांशी साधला थेट संवाद

आटपाडी (प्रतिनिधी):निंबवडे जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार माधवीताई पडळकर यांनी प्रचाराचा वेग वाढवला असून, पारेकरवाडी येथे त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. याभेटींच्या माध्यमातून त्यांनी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवतींशी मनमोकळा संवाद साधला. गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या या 'कोअर' प्रचार पद्धतीची सध्या संपूर्ण निंबवडे गटात जोरदार चर्चा रंगली आहे.                *महिला आणि तरुणांच्या प्रश्नांवर चर्चा*                  गृहभेटी दरम्यान पारेकरवाडीतील महिलांनी पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, रस्ते आणि स्वच्छतेच्या समस्या मांडल्या. यावर बोलताना माधवीताईंनी महिला बचत गटांना प्रोत्साहन आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तर, गावातील युवतींनी शिक्षण आणि कौशल्य विकासाबाबत आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. ज्येष्ठ नागरिकांनीही त्यांच्या अनुभवातून गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. *पडळकर कुटुंबाच्या कार्यावर मतदारांचा विश्वास* यावेळी ...

विद्यार्थ्यांसाठी केलेले कामच विद्याताईची खरी ओळख; आटपाडीत शिवसेना-राष्ट्रवादी युतीची अधिकृत घोषणा!

आटपाडी ( प्रतिनिधी). "निंबवडे जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या उमेदवार अँड. विद्याताई मोटे यांचे काम केवळ राजकीय नसून ते सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकीतून उभे राहिले आहे. उच्चशिक्षित असलेल्या विद्याताईंनी विशेषतः विद्यार्थी वर्गासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय असून, त्यांचे हे कार्यच त्यांची खरी ओळख आहे," असे ठाम प्रतिपादन आमदार सुहास बाबर यांनी येथे केले. आटपाडी येथे शिवसेनेच्या मेळाव्यात नंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत आमदार बाबर बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत युतीची घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. *कर्तृत्ववान आणि सुशिक्षित चेहरा*.                 विद्याताई मोटे यांच्या कार्याचा गौरव करताना आमदार बाबर म्हणाले की, "ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, शैक्षणिक मदत पुरवणे आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी सातत्याने जमिनीवर राहून काम केले आहे. शिक्षण, आरोग्य आणि स्थानिक समस्या सोडवण्याचा त्य...

शेटफळे पंचायत समिती गणातील उमेदवारांची यादी

निंबवडे पंचायत समिती गणातील उमेदवारांची यादी

माडगुळे पंचायत समिती गणातील उमेदवारांची यादी

नेलकरंजी पंचायत समिती गणातील उमेदवारांची यादी

घरनिकी ी पंचायत समिती गणातील उमेदवारांची यादी

खरसुंडी पंचायत समिती गणातील उमेदवारांची यादी

करगणी जिल्हा परिषद गटातील वैद्य झालेल्या उमेदवारांची यादी

खरसुंडी जिल्हा परिषद गटातील उमेदवारांची यादी

निंबवडे जिल्हा परिषद गटातील वैद्य उमेदवारांची यादी

दिघंची जिल्हा परिषद गटातील वैद्य झालेल्या उमेदवारांची यादी

आटपाडीच्या राजकारणात मोठी उलथापालथ: आमदार सुहास बाबर आणि राजेंद्रअण्णा देशमुख यांची 'महायुती' जाहीर; भाजपसमोर तगडे आव्हान!

आटपाडी (प्रतिनिधी): आटपाडी तालुक्याच्या राजकारणात आज एक अत्यंत खळबळजनक आणि महत्त्वाची घडामोडी घडली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आमदार सुहास बाबर (शिवसेना) आणि माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी ऐतिहासिक युतीची घोषणा केली आहे. या नव्या समीकरणामुळे तालुक्यात भाजपसमोर मोठे राजकीय आव्हान उभे ठाकले असून राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. *विकासासाठी आणि प्रगतीसाठी एकत्र: आमदार सुहास बाबर* यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले की, "तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रीतसर परवानगी घेऊनच ही युती करण्यात आली आहे. एकत्र काम केल्याने तालुक्याची प्रगती अधिक वेगाने होईल. आम्ही ही युती केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न ठेवता, अगदी ग्रामपंचायत स्तरापर्यंत कायम ठेवण्याचा प्रयत्न करू." विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना बाबर पुढे म्हणाले, "आमच्यावर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्यांना तसा कोणताही नैतिक अधिकार नाही. राजकारणात वयाप...

*पारेकरवाडीचे उपसरपंच लालासाहेब डोंबाळे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; ब्रम्हानंद पडळकर यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न*

पारेकरवाडी (ता. आटपाडी) गावचे उपसरपंच लालासाहेब डोंबाळे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला. लालासाहेब डोंबाळे यांच्या भाजप प्रवेशामुळे पारेकरवाडी परिसरात पक्षाची ताकद वाढली असून, स्थानिक पातळीवर भाजप अधिक मजबूत झाली आहे. यावेळी ब्रम्हानंद पडळकर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आणि गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते बंडू कातुरे, मदन कातुरे, उत्तम बरकडे, आप्पा बरकडे, अंकुश डोंबाळे, सचिन खिलारी, दशरथ चवरे, सुरेश भानुसे, मारुती पाटील यांच्यासह विविध स्तरांतील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशानंतर लालासाहेब डोंबाळे यांनी बोलताना सांगितले की, "पक्षाची ध्येयधोरणे आणि ब्रम्हानंद पडळकर साहेबांचे नेतृत्व मानून आपण जनसेवेसाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे." या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

*माणुसकीचा 'पायगुण'! बाळेवाडीच्या आजींनी विद्याताईंना दिला काळजाला भिडणारा आशीर्वाद*

आटपाडी-"लोक म्हणतात देव कुठे दिसत नाही, पण खरा देव अशा साध्या माणसांच्या रूपातच रस्त्यावर उभा असतो," याची प्रचिती नुकतीच बाळेवाडी भागात जनसंपर्कासाठी जात असताना सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई यांना आली. भरउन्हात रस्त्याकडेला मदतीच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या एका आजींना लिफ्ट देऊन विद्याताईंनी केवळ कर्तव्यच पार पाडले नाही, तर एका वृद्ध माऊलीचा निखळ आशीर्वादही मिळवला. *नेमकी घटना काय* करगणीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बाळेवाडी फाट्यावर एक वृद्ध आजी उन्हात वाकून गाडीला हात दाखवत उभ्या होत्या. बाळेवाडी हे आटपाडी तालुक्यातील दुर्गम गाव असून, तिथे एसटी बसची सोय नसल्याने ग्रामस्थांना खाजगी वाहनांचा किंवा लिफ्टचा आधार घ्यावा लागतो. बाळेवाडीच्या दिशेने जात असताना विद्याताईंनी आपली गाडी थांबवली आणि आजींना सन्मानाने गाडीत बसवले. माझ्या मुलीसारखी धावून आलीस गं! गाडीत बसल्यावर आजींनी गप्पांना सुरुवात केली. "मघापासनं लय गाड्यांस्नी हात केलं वं, पर कुणी बी थांबवली न्हाय... तुमी माझ्या मुलीसारखी धावून आला वं," असे म्हणताना आजींच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे भाव हो...