मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

टेंभूच्या पाण्याची मागणी नोंदवण्याचे अहवान

आटपाडी ता. 29- टेंभू योजनेचे खरीप आवर्तन सुरू झाले असून ज्या भागात शेतकऱ्यांना पाणी हवे आहे त्यांनी रितसर लेखी पाणी मागण्याची नोंदणी करावी, असे आवाहन टेभूचे उपविभागीय अधिकारी एस.बी.गियकवाड यांनी केले आहे.                     यंदा कोयनेतील पाणीसाठा लवकर कमी झाल्यामुळे उन्हाळी आवर्तन लवकर बंद केले होते. त्यामुळे अनेक भागातील तलाव आणि ओढ्यावरील बंधारे मागणी करूनही टेंभूच्या पाण्याने भरता आले नव्हते. त्यामुळे पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या चार दिवसापासून टेंभू योजनेचे पंप सुरू केले आहेत. योजनेचे खरीप आवर्तन सुरू केले आहे. टेंभू योजनेतून खानापूर, आटपाडी, सांगोला, कवठेमंकाळ, तासगाव या तालुक्यात पाणी जाते. ज्या भागात तलावात आणि बंधाऱ्यात पाण्याची मागणी होईल त्या मागणीच्या क्रमाने सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कार्यालयात पाण्याची लेखी मागणी करावी, असे आवाहन टेंभू विभागाने केले आहे. ज्या भागातून लवकर मागणी होईल त्या क्रमाने पाणी सोडले जाणार आहे.

पारेकरवाडी ग्रामपंचायत मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत चार हजार टाकणार

आटपाडी ता.29- पारेकरवाडी ता. आटपाडी ग्रामपंचायतीने गावातील वर्षभरात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नावाने प्रत्येकी चार हजार रुपये "सुकन्या समृद्धी योजनेत" टाकण्याचा  ऐतिहासिक निर्णय मासिक बैठकीत घेतला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुवर्णा कोकरे होत्या. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.                                          ग्रामीण भागात मुलीच्या जन्मानंतर अजूनही काही पालकात नाराजी पसरते. मुलगी ही पालकांना ओझं वाटते. मुलीचे शिक्षण आणि विवाहाचा खर्च याच सर्वात मोठा कोडे पालकाच्या समोर असतात. त्यामुळेच पारेकरवाडी ग्रामपंचायतीने मुलीच्या विवाहाचे ओझे पालकावरचे कमी व्हावे आणि मुलीच्या जन्माचे स्वागत करावे या हेतूने वर्षभरात गावात नवीन जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावाने "सुकन्या समृद्धी योजनेत" चार हजार रुपये टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत सर्व सदस्यांनी घेतला आहे सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच ...

प्रा. नारायण खरजे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रोजगार व स्वयंरोजगार समन्वयक पदी निवड

आटपाडी ता.२८- आटपाडीचे सुपुत्र प्रा. नारायण खरजे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश रोजगार व स्वयंरोजगार समन्वयक पदी निवड जाहीर केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र दिले.                                   मुंबई येथील राष्ट्रवादी भवन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या काही नूतन निवडी जाहीर केल्या.  यामध्ये प्रा. नारायण खरजे यांची निवड जाहीर केली. त्यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रा. खरजे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक सरचिटणीस राजू जानकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव म्हणून संघटनेत प्रा. खरजे दोन वर्षे काम करत होते. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची संघटनेच्या वरिष्ठ पदावर निवड केली आहे. प्रा. खरजे यांच्या निवडीबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.            ...

श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्यपदाचा डॉ. शिवाजीराव भोसले यांनी पदभार स्वीकारला

आटपाडी ता.२५- येथील दि. आटपाडी शिक्षण संस्थेच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचा नुतन प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांनी प्राचार्यपदाचा कार्यभार स्वीकारला. रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय ते अर्थशास्त्र विभागाचे प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निवडीबद्दल  महाविद्यालयाने स्वाग सोहळ्याचे आयोजन केले होते.  प्रभारी प्राचार्य डाॅ.विजय लोंढे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. गेली सात वर्षे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून डाॅ.विजय लोंढे यांनी कार्यभार सांभाळला होता. याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक डाॅ.शिवाजीराव विभुते यांनी केले.  यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले  बोलताना म्हणाले की, आटपाडी शिक्षण संस्थेचे आणि माझे ऋणानुबंध मैत्रीपूर्ण स्वरूपाचे असून मी याच संस्थेचा व महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात गेली छत्तीस वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली. श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचा शिवाजी विद्यापीठात ना...

लेंगरेवाडीतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दोस्ती इंग्लिशची उपक्रम

आटपाडी ता.२५- लेंगरेवाडी ता. आटपाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये  "दोस्ती इंग्लिशी" हा सकाळ माध्यम समूहाचा शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी असलेला उपक्रम प्रभावीपणे राबवला जातोय. यामुळे लेंगरेवाडीतल्या पोरांचे इंग्रजी विषय असलेली भीती कमी होत चालली आहे.     लेंगरेवाडी ता. आटपाडी येथे  आटपाडी शिक्षण संस्थेचे 'न्यू. इंग्लिश स्कूल' माध्यमिक विद्यालय सुरू आहे. लेंगरेवाडीतील अनेक जण मेंढपाळ आणि ऊस तोडीसाठी स्थलांतर करत असतात. त्यांची मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी विषय भीती असते. या विद्यार्थ्यांची भीती दूर करून इंग्रजी विषय चांगला व्हावा या दृष्टिकोनातून सकाळ माध्यम समूहाने दैनिक सकाळ पेपरमधून "दोस्ती इंग्लिशी"हा उपक्रम सुरू केला आहे. तोच उपक्रम  मुख्याध्यापक डी आर मोहिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच्या मनातून इंग्रजी विषय असलेली भीती काढून टाकण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. "रायटिंग, स्पिकिंग लर्निंग" या धरतीवर हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या...

विद्यार्थ्यांसाठी "त्यांनी" बनवला स्वखर्चातून रस्ता

आटपाडी ता.२१- मासाळवाडी ते माडगूळे हा जुना रस्ता चिलार झाडानी व्यापल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते उद्योजक विनायक मासाळ यांनी स्वखर्चातून रस्ता चिलार मुक्त करून वाहतुकीसाठी खुला करून दिला. त्यांच्या या सामाजिक कार्याचे गावकऱ्यांनी विशेष कौतुक केले.                  मासाळवाडी ते माडगूळे हायस्कूल पर्यंत जुना रस्ता तीन किलोमीटर अंतराचा होता. मासाळवाडीतील विद्यार्थी गदिमा हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी रोज या रस्त्यावरून ये-जा करतात. या रस्त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा चिलारझाडी उगवली होती. ही चिलारीची झाडे मोठी झाली होती. चिलार झाडीमुळे संपूर्ण रस्ताच व्यापला होता. या चिलारीतून वाट काढत शालेय विद्यार्थ्यांना रोजची ये-जा करावी लागत होती. गावातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक विनायक मासाळ यांची भेट घेऊन रस्त्याचा प्रश्न मांडला. विनायक मासाळ यांचा राजकीय नेते मंडळी जवळचा संपर्क आहे. त्या माध्यमातून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी गावक...

टेंभू योजना दोन दिवसात सुरू होणार- आमदार अनिल बाबर

आटपाडी -खानापूर व आटपाडी तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता टेंभू उपसा सिंचन योजना दोन दिवसांत चालू करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीत घेतल्याची माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली आहे.आमदार बाबर म्हणाले, सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्यामुळे या तालुक्यात सिंचनासाठी पाण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या तालुक्यातही पुरेसा पाऊस झालेला नाही. परिणामी शेती पिकांचे विशेषतः ऊस, द्राक्ष आणि डाळिंब पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने टेंभू उपसा जलसिंचन योजना सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्याबाबत काल गुरुवारी, सायंकाळी २० जुलै कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे पार पडली. यांत पुढच्या दोन दिवसात टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस आपल्यासह मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, खासदार संजय पाटील, जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील, आमदार अरुण लाड, आमदार विश्वज...

ब्रेकिंग..! सकाळी स्मार्टफोनवर आलेला 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका कशासाठी होता?वाचा,,,,

⚡ ब्रेकिंग..! सकाळी स्मार्टफोनवर आलेला 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका कशासाठी होता? 💁🏻‍♂️ आज सकाळी 10.20 वाजेच्या सुमारास अनेक लोकांच्या स्मार्टफोनवर एक इमर्जन्सी अलर्ट आला. हा अर्लट पाहून अनेकांनी घाबरून आपला स्मार्टफोन रिस्टार्ट देखील केला. पण घाबरण्याची गरज नाही. 🧐 ...हा 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका आला कोठून? ● हा 'इमर्जन्सी अलर्ट' केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून जारी करण्यात आला होता. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. 🤔 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका कशासाठी होता? ● देशातील आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये तसेच कोणत्याही आपत्तीच्यावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी हा 'इमर्जन्सी अलर्ट' पाठवण्यात आला होता.  एकंदरीत, भविष्यात अशी कोणतीही परिस्थिती निर्माण झाल्यास देशातील सर्व नागरिकांना अशा पद्धतीने 'इमर्जन्सी अलर्ट' मिळणार आहे. स्त््त्््

आटपाडी तलावात विद्युत पंप सोडण्यासाठी गेलेल्या दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

आटपाडी ता.२०- आटपाडी तलावात विदयुत पंप पाण्यात सोडण्यासाठी गेलेल्या दोघांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज गुरूवारी दुपारी तीन वाजता आटपाडी तलावावर घडली. अनिकेत अमृत विभूते वय.२७ रा. माडगुळे आणि विलास मारूती गुळदगड वय.४७. रा. शेवते ता. पंढरपूर असे मयताचे नाव आहे.                                                         याबाबत अधिक माहिती अशी की, माडगुळे येथील अमृत विभूते यांच्या माडगुळे येथील शेतीला आटपाडी तलावातून पाइपलाइन करून पाणी नेहले आहे. तलावात पाणी कमी झाल्यासमुळे विदयुत पंप उघडा होत होता. त्यामुळे खोल पाण्यात पंप सोडण्यासाठी म्हणून अनिकेत आटपाडी तलावावर गेला होता. दरम्यान, शेवती  ता. पंढरपूर येथील दोन नातेवाईक आले होते.  आटपाडी तलावावर जाताना या दोन पाहुण्यांना अनिकेत सोबत घेऊन गेला होता. एकजण तलावावर पाण्याच्या बाहेर थांबला होता तर अनिकेत आणी विलास विद्युत मोटार पाण्यात आतमध्ये सोडण्य...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतून वीस शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळाली विमा भरपाई

आटपाडी ता. 19 -- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतून गत दोन वर्षात तालुक्यातील विविध अपघातात मरण पावलेल्या वीस शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रती कुटुंब दोन लाख रुपये प्रमाणे चाळीस लाख रुपये विमा रक्कम मिळाली आहे. याने घरच्या कर्त्या पुरुषाचा अपघातात मृत्यू झालेल्या निराधार कुटुंबाला मोठा हातभार लावला आहे. तर नव्याने सुरू केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदानाचे सात प्रस्ताव अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच त्यांनाही अनुदान मिळणार आहे.                             2019 मध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विविध प्रकारच्या अपघातात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईच्या माध्यमातून आर्थिक आधार देण्याच्या दृष्टिकोनातून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत वय 10 ते 75 मधील शेतकरी योजनेला पात्र होतो. यामध्ये मोटरसायकल, बस आणि रेल्वे अपघात, सर्पदंशाने मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, विजेचा शॉक, रस्ते अपघात, उंचावरून पडून मृत्यू झाल्यास विमा भरपाईला शेतकरी पात्र होतो. नव्य...

आटपाडी बाजार समितीत "ड्रॅगन फ्रुट" चा सुरू झाला सौदे बाजार

आटपाडी ता.१९- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळसौदे बाजारात डाळिंब, पेरू, चिकू आणि सीताफळा पाठोपाठ ड्रॅगन फ्रुटचाही लिलाव बाजार सुरू झाला. आडतदार पंढरीनाथ नागणे यांच्या मंगलमूर्ती फ्रुट अडतीवर झालेल्या ड्रॅगन फ्रुटच्या लिलावात उच्चांकी प्रति किलो 121 रुपये भाव मिळाला.             येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सौदे बाजारात गेली पंधरा वर्षे डाळिंबाचा सौदे बाजार सुरू आहे. सुरुवातीला आठवड्यातून तीन वेळा डाळिंबाचा सौदे बाजार होत होता. आवक वाढत गेल्याने यामध्ये बदल करून आठवड्यातील शनिवार वगळता सहा दिवस बाजार सुरू केला. व्यापाऱ्यांची संख्याही वाढत गेली. त्यामुळे मंगलमूर्ती फ्रुट सेंटरचे मालक पंढरीनाथ नागणे यांनी सफरचंदाचा लिलाव बाजार सुरू केला. साधारण हा बाजार डाळिंबाबरोबरच तीन महिने चालतो. गेल्या दोन-तीन वर्षात डाळिंब आणि सफरचंदाच्या जोडीला चिक्कू, पेरू आणि सीताफळाचाही बाजार सुरू केला आहे. तालुक्यात टेंभूचे पाणी आल्यामुळे इतर फळबागांचे क्षेत्र वाढत चालले आहे. त्यामुळे त्या फळाच्या विक्रीची समस्या निर्माण होण्याअगोदरच आटपाडीच्या बाजार समि...

आटपाडी तालुक्यातील रस्त्यासाठी पाच कोटी- आमदार गोपीचंद पडळकर

आटपाडी ता.19 - महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये आटपाडी तालुक्यातील मुख्य तीन रस्त्यासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.        महाराष्ट्र शासनाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाली आहे यामध्ये पहिल्याच दिवशी कोट्यावधीच्या पुरवणी मागण्याला अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे. यात आटपाडी तालुक्यातील रस्त्यांसाठी पाच कोटी रुपये निधीला मंजुरी दिली आहे. या रस्त्याच्या कामासाठी निधी देण्याची मागणी आणि पाठपुर्वता विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता.  यामध्ये शुकाचार्य ते गोमेवाडी - अर्जुनवाडी ते खरसुंडी या रस्ता दुरुस्तीसाठी  तीन कोटी रुपये निधीला मंजुरी दिली आहे. तसेच नेलकरंजी ते बाळेवाडी, मिटकी ते मुडेवाडी या रस्त्यासाठी एक कोटी रुपये तर राजमार्ग 143 ला जोडणारा रस्ता ते झरे, खरसुंडी, नेलकरंजी या रस्त्यासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याचे श्री. पडळकर यांनी सांगितले.               गेल्या वर्षभरात शिं...

आटपाडी तालुक्यातील "या" गावातून झाली चारा डेपोची मागणी

आटपाडी ता.१८-यंदा पाऊस नसल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांचा मुख्य कणाच असलेल्या लाख मोलाचं जित्राब वाचवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पंधरा दिवसात चारा डेपो सुरू करावा, अशी मागणी शेटफळे ता. आटपाडी येथील पाणी संघर्ष समिती, ग्रामस्थ आणि ग. दि. माडगूळकर स्मारक समितीने केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने बेमुद ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.                                                                                 यंदा पाऊस नसल्यामुळे खरिपाच्या कसल्याही पेरण्या झालेल्या नाहीत. दुसरीकडे गत चार वर्षे चांगला पाऊस झाल्यामुळे आणि टेंभू योजनेचे पाणी आल्यामुळे चारा लागवडीखालील क्षेत्र वाढले होते. स्वतःच्या शेतात चारा उपलब्ध होऊ लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुण शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसाय सुरू केला आहे. त्यातच डाळिंबाच्या बागा पिन आणि मर रोगाने...

आटपाडीतील गवंड्याची पोर झाली पोलीस उपनिरीक्षक

आटपाडी- घरात अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या आणि  शिक्षणाचा कवडसाही नसलेल्या गवंड्याच्या पोरीने कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय आणि खाजगी शिकवणी शिवाय स्पर्धा परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. तिचे नाव जोशना बाबा खरात आहे. तिचे स्पर्धा परीक्षेतील यश इतर विद्यार्थ्यांना दिशादर्शक आणि मार्गदर्शन करणारे ठरले आहे.      बाबा खरात येथील साठे नगरात आपल्या कुटुंबासोबत पत्र्याच्या दोन खोल्यांमध्ये राहतात. घरात यापूर्वी वडील आणि भाऊ आणि स्वतः त्यांचा शिक्षण अशी कसलाच संबंध नव्हता. ते गवंड्याचे काम करतात. त्या कामातूनच पत्नी दोन मुली आणि दोन मुले अशा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरात शेजारी आणि गल्लीत कसलंही शैक्षणिक वातावरण नसलेल्या त्यांच्या मुलीने नुकतीच स्पर्धा परीक्षेत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. जोशनाचे प्राथमिक शिक्षण तिच्या गल्लीत असलेल्या साठे नगरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेल्या तर माध्यमिक शिक्षण आटपाडीतील श्रीमती वत्सलादेवी देसाई गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने घरातूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...

करगणीच्या सुपुत्राची फ्रान्समधील पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी

आटपाडी ता.१६ - फ्रान्समधील पॅरिस येथे पार पडलेल्या पॅरा ऍथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप (पॅरा ऑलिंपिक) स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना गोळा फेक प्रकारात नवा जागतिक विक्रम नोंदावत करगणीच्या सचिन सर्जेराव खिलारीने सुवर्णपदकाला गवसणी घातली. आगामी पॅरा एशियन स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. त्याच्या या कामगिरीचा करगणीत जल्लोष साजरा केला.                फ्रान्समधील पॅरिस येथे जागतिक प्यारा ऍथलेटिक्स स्पर्धा पार पडल्या. यामध्ये सचिन खिलारी याने भारताचे प्रतिनिधित्व करताना गोळा फेक स्पर्धेत सहभाग घेतला होता. तो करगणी ता. आटपाडी गावचा युवक असून आटपाडी बाजार समितीचे माजी सभापती तथा कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सर्जेराव खिलारे यांचा सुपुत्र आहे. तसेच बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. सचिन खिलारी याने पॅरिस येथे नुकत्याच पार पडलेल्या पॅरा ऍथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत 16.2 मीटर गोळा फेक केली. हा त्यांचा नवा जागतिक विक्रम घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार य...

आटपाडीतील वाडी- वस्त्यावर नळ कनेक्शन आणि स्टेट लाईटची अनिता पाटील यांची मागणी

आटपाडी ता.१२- आटपाडी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाड्यावस्तीवर नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन देऊन पाण्याची आणि  स्ट्रीट लाईटची सुविधा तातडीने द्यावी, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष अनिता पाटील आणि महिलांनी मुख्यअधिकारी यांच्याकडे केली. अनिता पाटील आणि महिलांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकाऱी पवन मेहेत्रे यांची भेट घेऊन आटपाडी नगरपंचायती अंतर्गत येणाऱ्या वाडी वस्तीवरील नागरिकांच्या विविध समस्या आणि प्रश्नावर चर्चा केली. अनेक वाडी वस्तीवरील लोकांना नळ कनेक्शन नाहीत. त्यांना नळाचे कनेक्शन देऊन पाण्याची सोय केली जावी, अशी मागणी केली. या मागणीचे निवेदनही दिले.  यावेळी सुलक्षणा गेळे, ललिता गेळे ,सुरेखा गेळे ,गंगुबाई गेळे  ,सुमित्रा गेळे, सोनम गेळे ,मंगल गेळे , सुरेखा गेळे ,आशाताई कदम , शालन चव्हाण उपस्थित होत्या.               

लेंगरेवाडीत मुंबईच्या "आई" प्रतिष्ठानकडून झकास काम

आटपाडी ता.१२-  लेंगरेवाडी ता. आटपाडी येथील न्यू. इंग्लिश स्कूलच्या मैदानावर मुंबई येथील "आई" प्रतिष्ठान आणि शिवशक्ती इंजिनिअरिंग कंपनीने संयुक्तपणे वड, पिंपळ आणि चिंच या प्रकारच्या शंभर झाडाचे वृक्षारोपण केले. यावेळी "आई" प्रतिष्ठानचे शरद कोरडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.                                   शरद कोरडे हे "आई" प्रतिष्ठान आणि शिवशक्ती इंजिनिअरिंग कंपनीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवतात. कोरोनाच्या काळात शेटफळे ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या मिनी कोविड सेंटरला मोफत औषध साठा पुरवला होता. गतवर्षी धावडवाडीत रस्त्याच्या दुतर्फा 1000 लहान वृक्षाचे रोपन केले होते. यंदा पावसाळ्याच्या तोंडावर त्यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम सुरू केला आहे. त्याची सुरुवात लेंगरेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर वृक्षारोपण करून केली. यामध्ये त्यांनी पाच ते सात फूट उंचीचे पिंपळ, वड, चिंच आणि बेलाच्या झाडाचे वृक्षारोपण केले. जेसीबीच्या साह्याने वृक्षारोपणासाठी खड्डे...

साहित्य संमेलनातील उपस्थिती चिंताजनक- डॉ.शंकरराव खरात साहित्य संमेलनातील सुर

आटपाडी-- साहित्यातून लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न पुढे येतात. साहित्य आणि साहित्य संमेलने केवळ मनोरंजन नव्हे तर दिशादर्शक आणि प्रबोधनाचे काम करतात मात्र अलीकडे साहित्य संमेलनातील उपस्थिती चिंताजनक झाली असल्याची भावना माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी व्यक्त केली.                                    येथे डॉ. शंकरराव खरात यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त तांबडा मारुती मंदिराच्या सभागृहात साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठानने याचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. डॉ. शंकरराव खरात यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते केले. स्वागत आणि प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव विलास खरात यांनी केले. यावेळी जेष्ठ साहित्यिक प्रा. कृष्णा इंगवले, साहित्यिक सुभाष कवडे, डॉ. सयाजीराजे मोकाशी, जेष्ठ नेते रावसाहेब पाटील,माजी सरपंच शिवाजीराव पाटील, डॉ. रवींद्र खरात,सचिन खरात आदी उपस्थित होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष राजेंद्रअण्णा देशमुख यांनी ग्रामीण भा...

आटपाडी तालुक्यातील 'या'शाळेला तीन वर्षे शिक्षक नसल्यामुळे पालकांनी आज शाळाच उघडली नाही

आटपाडी--पांढरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला सतत मागणी करूनही रिक्त असलेल्या जागी शिक्षक दिला जात नसल्यामुळे आणि मॉडेल स्कूल अंतर्गत मंजूर झालेल्या नवीन खोल्याचे बांधकाम सुरू केले जात नसल्यामुळे संतप्त पालकांनी आज शाळेला टाळे ठोकले. यामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. अधिका-यांनी दोन दिवसात शिक्षक देण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारनंतर शाळा सुरू झाली.                                                          याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी अंतर्गत पांढरेवाडीची वस्ती येते. तिथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. यामध्ये 90 विद्यार्थी आहेत. त्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांच्या पाच जागा आहेत. पैकी दोन जागा गेली तीन वर्षे रिक्त आहे तर एका जागेवर मुख्याध्यापक असून त्यांच्याकडे केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त भार आहे. त्यांच्याकडे केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पदाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना ज्ञानदानासाठी वेळ मिळत ...

दुर्लक्ष कराल तर महागात पडेल,,,, केंद्र आणि राज्य सरकारला आटपाडीत यांनी दिला इशारा

आटपाडी -- आमच्या संयमाचा अंत पाहू नका. आमची ही राज्यात पंचवीस टक्केवर लोकसंख्या आहे. तेव्हा आमच्याकडे दुर्लक्ष कराल तर महागात पडेल. केंद्र आणि राज्य सरकारने या आठवड्यानंतर सुरू होणाऱ्या अधिवेशनात साठ वर्षांवरील शेतकऱ्यांना मासिक पाच हजार पेन्शन देण्याचा निर्णय घ्यावा नाही तर दोन्ही सरकारला घरी घालवणार असा खणखणीत  इशारा जनता दलाने आज तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चात ज्येष्ठांनी दिला. तसेच अधिवेशनात दहा दिवसांत निर्णय न झाल्यास 25 तारखेला सहा तालुक्यात जेलभरो आणि 31 तारखेला पुन्हा आटपाडीत महाजेलभरो आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला.                                  साठ वर्षावरील ज्येष्ठ शेतकरी महिला आणि पुरुषांना केंद्र शासनाने अडीच आणि राज्य सरकारने अडीच असे पाच हजार रुपये मासिक पेन्शन देण्याच्या मागणीसाठी जनता दलाचे तालुका अध्यक्ष आबासो सागर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बस स्थानकापासून मोर्चाची सुरुवात झाली. मुख्य पेठेतून घोषणा देत पक्षाचा झेंडा फडकवत ज्ये...

डॉ. शंकरराव खरात यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी आटपाडीत साहित्य संमेलन

आटपाडी ता.१०- 'तराळ अंतराळ' कार साहित्यिक डॉ. शंकरराव  खरात यांच्या 101 व्या जयंती निमित्त येथे एक दिवसीय साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठानचे‌ सचिव विलास खरात यांनी दिली. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.  मंगळवार ता. 11 जुलै  रोजी तांबडा मारुती मंदिरात साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे.  सकाळी १०:३० वाजता डॉ. शंकरराव खरात यांचे प्रतिमेचे पुजन, अभिवादन केले जाणार आहे. त्यानंतर  " डॉ. शंकरराव खरात कार्य आणि कर्तृत्व" यावर परिसंवाद आयोजित केला आहे. परिसंवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख असून प्रमुख पाहुणे आणि वक्ते प्रा. डॉ. कृष्णा इंगोले, प्रा. डॉ. सयाजीराजे मोकाशी, सुभाष कवडे, बा.ना. धांडोरे (पंढरपूर) आहेत. ते या परिसंवादात सहभागी होणार आहेत.      दुसरे सत्र कवि संमेलनाचे होणार आहे. कवी संमेलनाचे अध्यक्ष  ज्ञानेश डोंगरे आहेत. तर मुख्य सूत्रसंचालक सुनिल दबडे करणार आहेत. या साहित्य संमेलनामध्ये आटपाडी, सांगोला, माण, खटाव, पंढरपूर, जत या भागातून नाम...

लेखा परीक्षक सतीश बारवकर यांचे आकस्मित निधन

आटपाडी ता.१९- सहकार क्षेत्रातील नामवंत लेखापरीक्षक सतीश पंडित बारवकर वय. 50 यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या अकस्मित निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. आटपाडी शहरातील विविध पतसंस्था आणि इतर सहकारी संस्थाचे ते लेखा परीक्षण करत होते. आटपाडी, खानापूर, जत, सांगोला, माण या तालुक्यात त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या पश्चात आई-वडील , पत्नी एक मुलगा, आणि एक मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार ता.12 रोजी सकाळी अकरा वाजता बनपुरी येथे त्यांच्या गावी होणार आहे.              

,,, अन्यथा सूतगिरण सुध्दा सहकारी करू--तानाजीराव पाटील

  आटपाडी ---माणगंगा साखर कारखाना नूतन संचालक मंडळाने बँकेकडून 'लिव इन लायसन' मधून पाच वर्षे चालवण्यासाठी करारावर ताब्यात घेतला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. कारखाना सुरू करण शेतकरी आणि कामगाराच्या हिताच्या आहे मात्र विरोधकाकडून तक्रारी करून विघ्न आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्ही बँकेकडून आणलेला कारखाना त्यांनी अजूनही सहकारी तत्त्वावर चलवावा मात्र घाणेरडे उद्योग बंद करावेत अन्यथा खाजगी केलेली सूतगिरण पुन्हा बँकेच्या ताब्यात  घेण्यासह कारखान्यातील उद्योग उघड्यावर आणण्याची वेळ आमच्यावर आणून देऊ नका, असा इशारा आणि आवाहन केले.                                  जिल्हा बँकेच्या ताब्यातून माणगंगा साखर कारखाना नूतन संचालक मंडळाने चालविण्यासाठी करारावर घेतला असल्यासची माहिती देण्यासाठी तानाजीराव पाटील यांनी पत्रकार बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी दत्तात्रय पाटील, साहेबराव पाटील, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, बाळासाहेब होनराव, उपसभापती राह...

खानापूर मतदारसंघात अजित पवाराच्या गळाला "'बडा मासा'

  राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून सत्तेत सहभाग घेतल्याचे राजकीय पडसाद खानापूर विधानसभा मतदारसंघापर्यंत उमटले आहेत. मतदारसंघातून घाटमाथ्यावरील मातब्बर युवा नेत्यांने अजित पवार यांची भेट घेतली आहे. राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या चार दिवसात समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन अजित पवाराच्या गटात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.                                                                         राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करून भाजपसोबत हात मिळवणी करून सत्तेत सहभागी झाले आहेत. त्याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. तुलनेत सांगली जिल्ह्यात या राजकीय घटनेचा फारसा परिणाम जाणवला नव्हता. मात्र दोन दिवसापासून खानापूर विधानसभा मतदारसंघात लोकांच्या उलट सुलट रंगतदार चर्चा रंगली आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघातील काही...

खानापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला फुटीचे गृहण?

    राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यामुळे राजकीयदृष्टया संवेदनशील असणाऱ्या खानापूर विधानसभा मतदारसंघात देखील राजकीय भूकंप घडण्याचे संकेत मिळत आहेत. माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र कार्यकर्त्यांनी सतेत येण्यासाठी अजितदादा पवार यांची कास धरू, असा तगादा लावल्यामुळे भूमिका बदलण्यावरून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.         माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांनी कदम गटाच्या मतदारसंघातील राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून सन 2020 मध्ये काँग्रेसला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ताकद देण्याऐवजी पाटील गटाकडे डोळेझाक केली आहे. मागच्या चार वर्षांत राष्ट्रवादीत असून देखील अजितदादा पवार यांचा अपवाद वगळता विकासकामांसाठी कोणाकडूनही अपेक्षित मदत झालेली नाही. तर दुसरीकडे माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी अ...

आटपाडीचा महसूल विभाग "ॲक्शन मोडवर", एकाच रात्री तीन वाहनावर केली कारवाई

   आटपाडी ता.6- माणगंगा नदी पात्रातून वाळूची चोरी करून त्याची वाहतूक करताना बोबेवाडी ते माडगूळ रस्त्यावर दोन ट्रॅक्टर आणि एका टेम्पोवर आटपाडी महसूल विभागाने कारवाई केली. या कारवाईत तीनही वाहने आणि त्यामधील चार ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे.                                                    बोबेवाडी येथून जाणाऱ्या माणगंगा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केली जाते. याकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे. इथे होणाऱ्या वाळू तस्करीच्या अनेक तक्रारी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचल्या आहेत तरीही नदीतील वाळू चोरी थांबवण्यात महसूल प्रशासनाला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही.                                      सध्या आटपाडी महसूल विभाग ॲक्शन मोडवर आला आहेत. आटपाडीच्या तहसीलदार बी.एस. माने यांच्या आदेशाने आटपाडीचे तलाठी सुधाकर केंगार यांच्या ...

माणगंगा कारखान्याच्या निवडणुकीचे गुपित तानाजीराव पाटील यांनी उघड केले

आटपाडी ता.६- तात्कालीन सत्ताधारी पाच वर्षे कारखाना सुरू करण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे माण, सांगोला आणि आटपाडी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांनी भेटून कारखान्याची निवडणूक लढवण्याचा प्रचंड आग्रह आणि दबाव टाकल्यामुळे निवडणूक लढवल्याचे कारण जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी शेटफळे येथे बोलताना सांगितले.                                            शेटफळे ता. आटपाडी येथे माणगंगा साखर कारखान्याच्या नूतन संचालकाचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, माणगंगेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, किसनराव गायकवाड, सोमनाथ गायकवाड,उपसभापती राहुल गायकवाड, संचालक सागर ढोले आदी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले,'माणगंगा कारखाना निवडणक लढवण्याचा डोक्यात विचार नव्हता. सांगोला तालुक्यातील अनेक जण माझ्याकडे कामानिमित्त येत होते. त्यानी माझ्या कामाची पद्धत जवळून बघितली होती. त्यामुळे माण आणि सांगोला तालुक्यातील शेतकरी ...

हुकलेल्या मुख्यमंत्रिपदापासून ते पाचव्या उपमुख्यमंत्रिपदापर्यंत अजितदादाचा प्रवास

अब तक अजित पवार  अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करून एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर इतर 8 जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.‘अजित पवार नॉट रिचेबल’ ते ‘अजित पवार बंड करणार’ अशा बातम्या काही महिन्यांनी माध्यमांत झळकत असतात. शरद पवारांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर अजित पवारांकडे पक्षाची धुरा सोपवणार असल्याचीही जोरदार चर्चा झाली. मात्र, शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतल्यानं या चर्चा थांबल्या. अजित पवार झपाटलेपणानं काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. राजकीय रणनीतीतला बेभरवशी वृत्ती दाखवणारे, तर कधी उघडपणे नाराजी दाखवून पक्षालाच सारवासारव करायला लावणारे अजित पवार हे सर्वांनाच चांगलेच परिचित आहेत. एवढं असतानाही अजित पवार या माणसाचा अनेकांना थांग पत्ता लागत नाही. या सर्व गोष्टींचा उगम अजित पवारा यांच्या राजकीय प्रवासात पाहायला मिळतो का?, हे आपण आज पाहणार आहोत. अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जि...

आटपाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ठरले,,,

             आटपाडी ता.३- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हिच आमची खरी राष्ट्रवादी काँग्रेस असून त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला.                                                         येथील शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष अनिता पाटील, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सुरज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादीक खाटीक,  ज्येष्ठ नेते विष्णुपंत चव्हाण, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष अश्विनी कासार यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सध्या...

भर अधिवेशनात शरद पवारांनी वसंतदादाच सरकार अस पाडल,,,,,,

सन१९७८ मध्ये राज्यात वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना अधिवेशनात शरद पवारांनी 40 आमदारांना सोबत घेऊन सरकार पाडले. आणि वयाच्या 38 व्या वर्षी पुलेदचे सरकार स्थापन करून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले . शरद पवारांच्या या बंडाची गोष्ट आपण जाणून घेऊया. आणीबाणीनंतर महाराष्ट्रात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्त्वात 1978 साली सरकार स्थापन झालं. रेड्डी काँग्रेसकडून वसंतदादा मुख्यमंत्री, तर इंदिरा काँग्रेसकडून नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले. सरकार स्थापनेनंतर या दोन्ही काँग्रेसमध्ये धुसफुशी सुरू झाल्या. या दोन्ही काँग्रेसमध्ये धुसफुशी सुरू असतानाच, 1978 साली ऐन पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षात असलेले शरद पवार त्यांच्या 40 समर्थक आमदारांना घेऊन विरोधी बाकांवर जाऊन बसले आणि वसंतदादांचं सरकार कोसळलं. परिणामी शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा केला आणि पहिल्यांदा मुख्यमंत्रीही बनले. त्यावेळी पवारांचं वय होतं 38 वर्षं. शरद पवारांच्या या बंडाची बिजं इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीत सापडतात. त्यामुळए तिथूनच सुरुवात करू आणि पवारांचं हे बंड जाणून घेऊ. पवारांच्या बंडाची बिजं आण...

अलनिनोचा जुलैमध्येही प्रभाव राहणार

मुंबई- यंदा दक्षिण पश्चिम मान्सूनने ट्रेंड खूपच बदलला आहे. ज्या वेगाने पाऊस पडायला हवा होता तो आत्ता पर्यंत तरी दिसलेला नाही. तज्ज्ञानी या गोंधळाला हवामान बदल किंवा चक्रीवादळ बिपरजॉयला जबाबदार धरलं आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यातही अपेक्षित पाऊस दिसत नाही, तसा अंदाज व्यक्त केला आहे ‌                         मान्सूनचा कल किती बदलत चालला आहे. रविवारी मान्सूनचे दिल्ली आणि मुंबईत एकाच वेळी आगमन झाले, असे होत नाही पण ते यंदा झाल. 21 जून 1961 नंतर यंदा रविवारीच मान्सूनने दोन्ही महानगरात आगमन केले. यंदा मान्सून दोन दिवस आधीच दिल्लीत दाखल झाला, तर मुंबईत जवळपास दोन आठवडे उशीर आला. आता प्रतीक्षा आहे ती संपूर्ण देशात मान्सूनने येण्याची.  खरी चिंता जुलैची आहे, ज्यामध्ये एल-निनो येण्याचा धोका आहे. आजपर्यंत, मान्सूनची उत्तर सीमा पोरबंदर, अहमदाबाद, उदयपूर, नारनौल, फिरोजपूरमधून जातो. IMD म्हणते की तो पंजाब, गुजरात, राजस्थानचा आणखी काही भाग, हरियाणाचा उर्वरित भाग आणि त्याच्या लगतचा भाग व्यापण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात प...

मृत्यूचा सापळा बनलेल्या समृद्धी महामार्गावरच्या अपघातात 25 जणांचा मृत्यू

बुलढाणाः समृद्धी महामार्गवर अपघातांचे सत्र अद्याप सुरूच आहे. महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वात भिषण अपघात सिंदखेडराजानजीक घडला आहे. ट्रॅव्हल्सपटली होऊन जागीच पेट घेतला. या अपघातात बसमध्ये झोपलेल्या 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने अख्खा महाराष्ट्रच हळहळला.  अपघातात ट्रॅव्हल्स बस दुभाजकाला धडकली.  नंतर ती पलटी झाली. त्यानंतर ट्रॅव्हलने पेट घेतला. अपघातात बसमध्ये बसलेले प्रवाशी झोपेत होते. त्यांना काय झालं ते समजण्याआगोदर गाडी पलटी होऊन आगीने घेरली होती. आगीमध्ये होरपळून प्रवाशाचा मृत्यू झाला. तब्बल एक ते दीड तास चाललेल्या या अग्नीतांडवात 25 जणांनी जीव गमावला आहे. रात्रीची वेळ असल्याने त्यांना वाचवायला त्यांच्यापर्यंत कोणीही पोहोचू शकले नाही. ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये बसलेले काही जण आणि काही प्रवासी यात बचावले आहे. गाडीच्या काचा फोडून जे बाहेर आले ते सात ते आठ जण वाचले आहेत. मध्यरात्री 2 च्या सुमारास हा अपघात घडला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या पर्यंत मदतही वेळेत पोहोचली नाही. अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याला निघा...