मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रोम जळत होता,तेव्हा निरो फिडल वाजवत होता

   रोम  जळत होतं, तेव्हा निरो फिडल वाजवत होता…” रोमन सम्राट निरो बाबतची ही म्हण प्रसिद्ध आहे. रोममध्ये जाणीवपूर्वक आग लावण्याचा आरोप निरोवर केला जातो. फिडल हे एक तंतुवाद्य आहे. आपली आई, सावत्र भाऊ आणि पत्नींची हत्या घडवून आणणारा आणि दरबारातल्या किन्नरांसोबत लग्न करणारा एक क्रूर राज्यकर्ता अशी इतिहासात निरोची नोंद आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी निरो आईच्या प्रयत्नांमुळे राजगादीवर आला. साल होतं इसवी सन 54. या साम्राज्याच्या सीमा स्पेनपासून ते उत्तरेला ब्रिटन आणि पूर्वेला सीरियापर्यंत पोहोचलेल्या होत्या. निरोची आई अग्रिपीना हिला सत्तेची लालसा होती. कटकारस्थानं करत तिने निरोला सत्ता मिळवून दिली. अग्रिपीनाने तिचा काका सम्राट क्लॉडियसशी विवाह केला आणि त्याच्या लेकीशी निरोचं लग्न लावून दिलं. त्यामुळे निरो राजघराण्याचा सदस्य तर झालाच पण सोबतच राजाला स्वतःचा मुलगा असूनही निरो सम्राट क्लॉडियसचा उत्तराधिकारीही ठरला. अग्रिपीनाने सम्राट क्लॉडियसला विषारी मश्रूम म्हणजे अळंबी खायला घालून ठार केलं, असं म्हटलं जातं. पण यामध्ये कितपत तथ्य आहे, हे सिद्धं होऊ शकलेलं नाही

पराभवाच्या राखेतून दत्तात्रय पाटील यांची फिनिक्स भरारी

आटपाडी ता. 11- करगणी ग्रामपंचायती थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत निसटता पराभवाच्या राखेतून सावरून दत्तात्रय पाटील यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीत तब्बल २८९५ मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवत फिनिक्स भरारी घेतली. तर करगणीला ज्येष्ठ नेते कै. अण्णासाहेब पत्की, कै. विजयसिंह पाटील आणि कै. सर्जेराव खिलारी यांच्या पश्चात चांगले सर्वसमावेशक नेतृत्व मिळाले.  ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने विरोधकांनी दत्तात्रय पाटील यांच्या राजकीय कारकीर्दवर शंका उपस्थित केली होती. मात्र, 'राजकारणात पराभव हा शेवट नसतो' हे पाटील यांनी सिद्ध केले. या विजयामुळे त्यांचे राजकीय वजन केवळ करगणी गणातच नव्हे तर संपूर्ण आटपाडी तालुक्यात वाढले आहे. भाजपचे तगडे उमेदवार संभाजी पाटील यांना केवळ ४२८२ मतांवर समाधान मानावे लागले. तर दत्तात्रय पाटील यांना मिळालेला ७१७७ मतांचा कौल दिला. ् या निवडणुकीतील सर्वाधिक मतांपैकी एक विजय मानला जात आहे. राजकीय समीकरणांमध्ये बदल दत्तात्रय पाटील यांचा हा विजय केवळ एक जागा जिंकण्यापुरता मर्यादित नसून, तो आगामी काळातील तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरण...

खरसुंडी जिल्हा परिषद गटाची गावनिहाय मतदान यादी

दिघंची जिल्हा परिषद गटातील गावनिहाय मतदान

घरनिकी ी पंचायत समिती गणातील गावनिहाय मते

निंबवडे जिल्हा परिषद गटातील गावनिहाय मतदार यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते

करगणी गणात गावनिहाय उमेदवारांना पडलेली मते

पहिल्या फेरी खरसुंडी गटात कोण आघाडीवर

पहिल्या फेरीत खरसुंडी जिल्हा परिषद गटात पडलेली खालील प्रमाणे मते जयदीप भोसले-- 4958 चंद्रकांत भोसले -3118----1840 चे मताधिक्य जयदीप भोसले यांना

आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद ा निवडणुकीची अशी होणारा मतमोजणी

आटपाडी ता. 8- आटपाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांसाठी पार पडलेल्या मतदानाची मोजणीची  जय्यत तयारी पूर्ण केली असून 19 टेबल्सवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये एका टेबलावर टपाली आणि इतर 18 टेबलावर ईव्हीएम मशीन मतदानाची मोजणी केली जाणार आहे.  साधारण चार तासात सर्व निकाल स्पष्ट होतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी  समाधान शेंडगे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शीतल बंडगर यांनी दिली.  मतमोजणीसाठी एकूण 19 टेबल्सची व्यवस्था केली आहे. यापैकी 18 टेबल्सवर ईव्हीएम  मशीनमधील मतांची मोजणी होईल, तर एक टेबल टपाली मतपत्रिकेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. संपूर्ण चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीची मतमोजणी प्रक्रिया एकूण 11 फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे.  खरसुंडी जिल्हा परिषद गटात पासून मतमोजणीची सुरूवात केली जाणार. त्यानंतर अनुक्रमे करगणी, दिघंची आणि  सर्वात शेवटी निंबवडे गटांची मतमोजणी केली जाईल. साधारण एका गटाची मतमोजणी चार फेऱ्यात पूर्ण होईल. त्यासाठी एक तास वेळ जाऊ शकतो. चारही गटाची मतमोजणी दुपारी दोन पर्यंत पूर्ण होईल, असा प्राथ...

दिघंची गटातील प्रत्येक गावचा प्राथमिक अंदाज

आटपाडी ता. 5- आटपाडी तालुक्यातील दिघंची जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीने सध्या संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या गटात शिवसेनेचे दिग्गज नेते व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील आणि भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य कलाप्पा कुटे यांच्यात थेट आणि चुरशीची लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपापल्या परीने ताकद लावल्याने निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. *गावनिहाय राजकीय गणिते आणि मतदारांचा कल:* मतदारांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या गटातील गावांमध्ये संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. काही गावांमध्ये शिवसेनेचे पारडे जड दिसत आहे, तर काही ठिकाणी भाजपाला कौल मिळताना दिसत आहे. * शिवसेनेची (पृथ्वीराज पाटील) मजबूत पकड*: शिवसेनेसाठी कौठुळी, पुजारवाडी (आटपाडी) , पुजारवाडी ( दिघंची )आणि आवळाई या गावांमध्ये चांगले मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पळसखेल मध्ये मध्यम स्वरूपाची आघाडी मिळताना दिसत आहे. तानाजीराव पाटलांचा दांडगा जनसंपर्क आणि पृथ्वीराज पाटलांची तरुणांमधील क्रेझ याचा फायदा शि...

पिंपरी खुर्द मध्ये 'या' दिग्गज नेत्यानेे शिवसेना राष्ट्रवादीला दिला पाठिंबा

आटपाडी ता. 4- पिंपरी खुर्द आणि आंबेवाडीत आज खळबळ उडणारी राजकीय घटना घडली. गावचे माजी उपसभापती व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे खंदे कार्यकर्ते रुपेश पाटील आणि आंबेवाडीचे सुनील पुजारी यांनी राष्ट्रवादी–शिवसेना महायुतीचे उमेदवार विनायक मासाळ आणि रामदास सूर्यवंशी यांना आपला खणखणीत पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे पिंपरी आणि आंबेवाडी परिसरात विरोधकांच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. कार्यकर्त्यांचा निर्धार; प्रचारातही आघाडीवर केवळ पाठिंबा देऊन न थांबता, स्वतः प्रचारात आघाडीवर राहून विनायक मासाळ आणि रामदास सूर्यवंशी यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार रूपेश पाटील आणि सुनील पुजारी यांनी व्यक्त केला. या घडामोडींमुळे राजकीय पटलावर मोठी खळबळ उडाली असून महायुतीचे पारडे जड झाले आहे.                                                          पिंपरी खुर्दमध्ये 'भरती'; अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रवेश याचवेळी अमित कद...

करगणी जिल्हा परिषद गटाचा गावनिहाय प्राथमिक अंदाज,,,,

आटपाडी (प्रतिनिधी) जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करगणी गटातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून गावनिहाय प्राथमिक अंदाज समोर येत आहेत. या गटात शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट आणि चुरशीची लढत पाहायला मिळत असून, मतदारांचा कौल कोणाकडे झुकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.                                 *शिवसेनेचे 'वर्चस्व' आणि मताधिक्याची गावे * प्राथमिक अंदाजानुसार, शिवसेनेची पकड अनेक महत्त्वाच्या गावांमध्ये मजबूत दिसत आहे. विशेषतः करगणी, शेटफळे, मासाळवाडी, खानजोडवाडी आणि यपावाडी या गावांमध्ये शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पिंपरी गावात मध्यम स्वरूपाचे, तर माळेवाडी आणि तडवळे गावांतून थोड्या मताधिक्याचा कल शिवसेनेच्या बाजूने दिसत आहे. * भाजपाचीची या गावावर भिस्त* दुसरीकडे, भारतीय जनता पक्षालाही बोंबेवाडी गावात भाजपला मोठे मताधिक्य मिळण्याचे संकेत आहेत. माडगुळे गावात मध्यम स्वरूपाचे तर लेगरेवाडी आणि आंबेवाडी या गावांतून भाजपला निसटती आघाडी मिळण्याची च...

माजी मंत्री महादेव जानकर यांनी शिलेदारासाठी वाडीवस्ती पिंजून काढली

आटपाडी ता. ४-आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापला असून, आपल्या एकनिष्ठ सहकाऱ्यांच्या विजयासाठी माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कंबर कसली आहे. आपल्या शिलेदारांना जिल्हा परिषदेत पाठवण्यासाठी त्यांनी तालुक्यातील गावे आणि वाड्यावस्त्या पिंजून काढल्या असून, एका माजी मंत्र्याची आपल्या कार्यकर्त्यासाठीची ही धडपड पाहून मतदार अक्षरशः भारावून गेले आहेत .                              *रासपाच्या उमेदवारांसाठी मैदानात* खरसुंडी जिल्हा परिषद गटातून सत्यवान गलांडे, दिघंची गटातून संदेश खटके आणि करगणी गटातील रासपाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ जानकर यांनी स्वतः मैदानात उतरून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. "प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी द्या," असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वाड्यावस्त्यांवर थेट संवाद: महादेव जानकर यांनी आपल्या दौऱ्यात तळेवाडी, काळेवाडी, हिवतड, मानेवाडी, मेटकरवाडी, गोमेवाडी, अर्जुनवाडी, लेंगरेवाडी, मासाळवाडी,...

खरसुंडीत भाजपाचे जोरदार शक्ती प्रदर्शन

  खरसुंडी, ता. आटपाडी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. चंद्रकांतभाऊ भोसले तसेच खरसुंडी पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ. लताताई अर्जुन पुजारी सावकार यांच्या प्रचारार्थ ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह बापूसाहेब देशमुख, सरपंच धोंडीराम इंगवले, माजी सरपंच अर्जुन पुजारी, राहुल गुरव, सुभाष चोपडे, भाऊसाहेब गायकवाड, धनंजय पुजारी, नंदकुमार झंजे, विजय पुजारी, किरण पुजारी, बादशाह इनामदार, अतुल मोहिते, किरण सावकार, विक्रम भिसे, रणधीर गुरव यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नेते, कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच खरसुंडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पश्चिम भागातील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जयदीप भोसले यांना झेडपीत पाठवा-- आमदार सुहास बाबर

आटपाडी ता.4-आटपाडी पश्चिम भागातील खरसुंडीचे श्री. सिद्धनाथ, घोडेखूर,जकाईदरा, भिमाशंकर आणि शुकाचार्य या पवित्र देवस्थानच्या भरीव विकासासाठी जयदीप भोसले यांना जिल्हा परिषदेत पाठवा, असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केले. खरसुंडी गटाचे शिवसेनेचे उमेदवार जयदीप भोसले पंचायत समितीच्या उमेदवार डॉ. मिनाक्षी पुजारी, सुनिता सरगर यांच्या प्रचारार्थ तळेवाडी, काळेवाडी, गोमेवाडी, हिवतड, मानेवाडी, अर्जुनवाडी आदी गावांचा आमदार सुहास बाबर यांनी दौरा करून प्रचार सभा घेतल्या. त्यांच्या सोबत जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, तीर्थक्षेत्र आघाडीचे भारत पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, हरीभाऊ माने आदी सोबत होते. यावेळी आमदार श्री. बाबर यांनी खरसुंडीचे श्री. सिद्धनाथ देवस्थानला चारही बाजूने जोडणाऱ्या रस्त्यासाठी 177 कोटी रुपये देऊन कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. खानापूर मतदार संघात सर्वाधिक नेलकरंजी परिसराला मोठी धार्मिक स्थळाचे भाग्य लाभले आहे. त्याचा कायापालट केला जाईल. शेतीसाठी पाणी आले आहे आता विजेची गरज आहे. 50% भागात दिवसा वीज देण्याचा प्रयोग सुरू केला आहे. उर्व...

महिला आणि तरुणांचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी अँड. मोटेनाचा संधी द्या- आमदार सुहास बाबर

आटपाडी ता. 4- महिला आणि तरूणांचे  उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी विद्या मोटे यांनाच जिल्हा परिषदेला संधी द्या, अशी साद आमदार सुहास बाबर यांनी घातली.              निबवंडे जिल्हा परिषद गटाची निवडणुक प्रचार सभेचे घरनिकी आणि बनपुरी येथे आयोजन केले होते. यावेळी आमदार श्री. बाबर बोलत होते. यावेळी उमेदवार अँड. विद्या मोटे, तानाजीराव पाटील, अनिल पाटील, अहिल्या पुकळे प्रमुख उपस्थित होते. आमदार श्री. बाबर यांनी गावात, तालुक्यात आणि मतदार संघात केलेल्या कामांचा आढावा मांडला. ते म्हणाले,'पन्नास टक्के खानापूर मतदार संघात शेतीसाठी दिवसा वीज दिली आहे.काही दिवसातच भाडेतत्त्वावर जमिनी घेऊन सौरऊर्जा प्रकल्प उभारून शेतीला दिवसा वीज देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सांगली जिल्हात सर्वात जास्त चांगली जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आरोग्य सुविधाची गुणवत्ता सुधारून रस्त्यांची कामे केली आहेत. आम्ही केलेली आणि करणारी कामे सांगून मतदान मागतो. तर विरोधकांकडे सांगण्यासारखे कामच नाही. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून बाहेरून पोरं आणून गाड्यांची तोडफोड सुरू केली आहे...

धनगर तरुण समाजाचा बनतोय "कोहिनूर"

आटपाडी -मेंढपाळी आणि शेतीच्या कष्टाळू वारशातून पुढे येत, सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील धनगर समाजाने आता प्रगतीचे नवे शिखर गाठले आहे. एकेकाळी अशिक्षितपणा आणि अंधश्रद्धेच्या सावटाखाली असलेल्या या समाजातील तरुण पिढी आज उच्च शिक्षण, भव्य उद्योग साम्राज्य आणि सामाजिक भान जपत तालुक्याचा 'कोहिनूर हिरा' ठरू लागली आहे. *पारंपरिक व्यवसायाकडून आधुनिकतेकडे* आटपाडी तालुक्यात धनगर समाजाची लोकसंख्या मोठी आहे. पिढ्यानपिढ्या मेंढपाळी आणि शेती हाच या समाजाचा मुख्य आधार राहिला आहे. मात्र, बदलत्या काळानुसार समाजातील तरुण वर्गाने शिक्षणाचे महत्त्व ओळखले आहे. केवळ पदव्या न घेता, हा तरुण वर्ग आता सामाजिकदृष्ट्या जागरूक झाला असून प्रशासकीय सेवा, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक क्षेत्रांत स्वतःचा ठसा उमटवत आहे.  उद्योजकतेचे नवे क्षितिज: तालुक्यातील अनेक तरुणांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचे उद्योग सुरू केले आहेत. अनेक तरुणांनी मोठ्या शहरांत जाऊन शून्यातून विश्व उभे केले असून आज ते मोठ्या उद्योग साम्राज्याचे मालक आहेत. विशेषतः गलाई व्यवसायात आणि इतर व्यापारी क्षेत...

धनगर समाजाचे "कोहिनूर"

नेलकरंजी गणात विकासापुढे विरोधकाची तटबंदी ढासळल,ी सुनिता सरगर यांच्या परड्यात जनमताचे भरभरून दान

आटपाडी ता. 3- नेलंकरजी पंचायत समिती गणात शिवसेनेच्या उमेदवार सुनिता सरगर यांनी प्रचारात  आघाडी घेतली असून, त्यांचा झंझावात कायम आहे. तळेवाडी, गोमेवाडी, मानेवाडी आणि नेलकरंजी यांसारख्या गावांतून मिळालेला अभुतपुर्व प्रतिसादामुळे त्यांच्या विक्रमी मताधिक्यावर आता शिक्कामोर्तब झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयदीप भोसले आणि तळेवाडी गणाच्या उमेदवार सुनिता सरगर यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर, तानाजीराव पाटील, भारत पाटील आणि अनिल पाटील यांनी गावोगावी झंझावाती सभा घेतल्या आहेत.             *गावकरी शिवसेनेच्या पाठीशी* गेल्या चार दिवसांपासून तळेवाडी गणातील प्रत्येक गावात सुनिता सरगर यांच्याबद्दल सहानुभूती आणि पाठिंबा वाढत चालला आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेने गेल्या काही काळात केलेल्या विकासकामांना पाहुन विरोधकांच्या हक्काच्या मतदारांनीही आता शिवसेनेचा रस्ता धरला आहे. प्रचारादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केल्याने युतीची ताकद द्विगुणित झाली आहे.शिवसेनेच्या वाढत्या प...

विकासकामाची पोचपावती: शेटफळे येथील रानमळ्यातील मतदारांचा शिवसेना-राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा

शेटफळे ता. 2- शेटफळे (ता. आटपाडी) येथील रानमळा परिसरातील सर्व मतदारांनी एकत्र येत जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे. परिसरातील ५०० ते ७०० मतदारांनी घेतलेल्या या सामूहिक निर्णयामुळे महायुतीच्या उमेदवाराचे मताधिक्य मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विकासाच्या शब्दाला जागले तानाजीराव पाटील काही दिवसांपूर्वी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी रानमळा परिसरातील नागरिकांना भेट देऊन रस्ते विकासाचे आश्वासन दिले होते. केवळ आश्वासन न देता, त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आणि सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम नुकतेच पूर्णत्वास नेले. रानमळ्यातील वर्षानुवर्षांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी कृतज्ञता म्हणून महायुतीच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला आहेमहायुतीच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला आहे. एकमुखी निर्णयाने राजकीय समीकरणे बदलणार प्रभाग क्रमांक ३ मधील बहुतांश मतदार रानमळा परिसरात वास्तव्यास आ...

शिवसेनेच्या प्रचार गाडीवर विभूतवाडीत हल्ला

आटपाडी ता. 1- विभुतवाडी ता. आटपाडी येथे शिवसेनेचा प्रचार करणाऱ्या गाडीवर अज्ञात तरुणांनी हल्ला करून फोडली. या घटनेचे झरे गटात तणावाचे वातावरण बनले आहे. दरम्यान, समाज माध्यमावर हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी घडवण्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.                      सांगली जिल्ह्यात सर्वाधिक हॉट लढत निंबवडे जिल्हा परिषद गटात लागली आहे. तिथे भाजपातून समाज कल्याण चे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर तर शिवसेनेतून अँड. विद्या मोटे मैदानात उतरल्या आहेत. सकाळी 11 वाजता समाज कल्याणचे सभापती ब्रह्मानंद पडळकर यांची विभूतवाडी सभा होती.‌  यावेळी गावात शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांच्या प्रचाराची गाडी गावातून फिरत होती. यावेळी शिवसेनेच्या प्रचाराची गाडी जमलेल्या तरुणांनी अडवून गाडीवर दगड आणि काट्याने जोरदार हल्ला केला. गाडीवर हल्ला होता चालकाने स्वतःला वाचवण्यासाठी पळ काढला. त्यानंतर जमलेल्या अज्ञात तरुणांनी प्रचाराच्या गाडीची काच फोडली. या घटनेने निंबवडे जिल्हा परिषद गटात अधिक तणावाचे वातावरण बनले आहे...

निंबवडे येथील शेंडगे बंधूंचा शिवसेनेत प्रवेश,,,

निंबवडे येथे शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवून गावातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व नानाशेठ दगडू शेंडगे व विठ्ठलशेठ दगडू शेंडगे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेनेच्या ध्येयधोरणांवर व पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून हा प्रवेश करण्यात आला. या पक्षप्रवेशाप्रसंगी आमदार सुहास बाबर, उद्योजक राहुल हजारे तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या दोघांचे स्वागत केले. निंबवडे जिल्हा परिषद गटातील उमेदवार अ‍ॅड. विद्याताई सचिन मोटे यांना पाठबळ देण्यासाठी तसेच शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या उद्देशाने हा पक्षप्रवेश करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रवेशामुळे निंबवडे व परिसरात शिवसेनेला बळ मिळणार असून आगामी निवडणुकीत पक्ष अधिक सक्षमपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नवीन कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून जनहितासाठी व गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

खरसुंडीत अजित पवार यांना शिवसेनेकडून श्रद्धांजली

आटपाडी ता.१- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल खरसुंडी येथे शिवसेनेने शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीला उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण केली.              खरसुंडी येथे शिवसेनेच्या कार्यालयात हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जयदीप भोसले यांच्या हस्ते अजित पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ. मनीषा पुजारी, डॉ. उमेश पुजारी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे प्रमुख उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर आणि केलेल्या कामावर प्रकाश टाकून मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यावेळी विनोद पुजारी, जहांगीर शेख,दुर्वाआप्पा देठे, ओटीवाडी विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष बापुराव खाडे,मा जी उपसरपंच मच्छिंद्र भोसले, सुमंत पुजारी,शरद पेडकर, ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.         फोटो -१) खरसुंडी ता. आटपाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेनेकडून श्र...

खरसुंडती भाजपाची प्रचारात जोरदार मुसंडी

आटपाडी - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत खरसुंडी गटात खरसुंडीसह नेलकरंजी, चिचाळे, कानकात्रेवाडी आणि गोमेवाडी गावांनी आज राजकीय भूमिका स्पष्ट करत ‘कमळ’लाच मत देण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराने या गावांमध्ये अक्षरशः राजकीय वादळ निर्माण केले असून, विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे. खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार चंद्रकांतभाऊ भोसले आणि खरसुंडी पंचायत समिती गणातील उमेदवार सौ. लता पुजारी व नेरकंजी गणाच्या उमेदवार पौर्णिमा महारगुडे यांच्या प्रचारासाठी चिंचाळे खरसुंडी आवटेवाडी धावडेवाडी नेलकरंजी गोमेवाडी आधी गावात उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी आणि बैठकी घेतल्या. महिला, युवक, शेतकरी व ज्येष्ठ नागरिकांचा लोंढा उसळला. विशेष म्हणजे, यावेळी प्रचाराची सूत्रे महिलांनीच हाती घेतली असून, महिलांचा अभूतपूर्व सहभाग हा या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरत आहे. प्रचारादरम्यान ग्रामस्थांनी थेट शब्दांत सांगितले की, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्व बाबींमध्ये भाजपच्या उमेदवारांनी सातत्याने प...

करगणीत राजकीय भूकंप, विरोधी तीन सदस्यानंतर आता उपसरपंचाच्या भावाचा शिवसेनेला पाठिंबा

करगणी -करगणीत भाजपाला रोज धाक्यावर धक्के बसत आहेत. अनेकांनी भाजपाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपाच्या तब्बल तीन ग्रामपंचायत सदस्य नंतर आता विद्यमान उपसरपंच साहेबाराव खिलारी यांचे  बंधू प्रसिद्ध गलाई व्यावसायिक अंकुश खिलारी यांनी महायुतीचे उमेदवार विनायकराव मासाळ आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पाठिंबा जाहीर केला. यापूर्वी अभिजित जाधव,रूपाली कांबळे, उत्तम माने, या ग्रामपंचायत सदस्यांनी सेनेचा भगवा खांद्यावर घेतला होता. बड्या नेत्यांचे पक्षांतर आणि पाठिंबा: साहेबाराव खिलारी आणि  त्यांचे बंधू अंकुश खिल्लारी हे करगणी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच असून त्यांचा गावात मोठा जनसंपर्क आहे.  त्यांच्यासोबतच गलाई व्यवसायातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अंकुश खिलारी यांनीही शिवसेनेची धुरा हाती घेण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीच्या ताकदीत मोठी वाढ झाली आहे. विनायकराव मासाळ आणि दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.विजयाचा निर्धार: यावेळी बोलताना अंकुश खिलारी म्हणाले की, भागाच्या विकासासाठी आण...

नेलकरंजीत शिवसेनेला अभूतपूर्व प्रतिसाद

नेलकंरजी:'एकच ध्यास, खरसुंडी गटाचा विकास' हे ब्रीदवाक्य घेऊन निघालेल्या प्रचार दौऱ्याला नेलकंरजी गावात ग्रामस्थांनी उदंड आणि अभुतपुर्व प्रतिसाद दिला. आज पार पडलेल्या या दौऱ्यानिमित्त आयोजित सभेत जनसागराचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला, ज्यामुळे आगामी निवडणुकीतील विजयाचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रचार दौऱ्यादरम्यान उपस्थित प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी श्री. जयदीप भैय्या भोसले, डॉ. मीनाक्षी उमेश पुजारी, आणि सौ. सुनीता दत्तात्रेय सरगर यांच्यासह मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

विद्या मोटे यांच्यासाठी लाडक्या बहिणींची वज्रमूठ; तरुणाईच्या सहभागामुळे परिवर्तनाचे वारे

आटपाडी ता. 1- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निंबवडे जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असून, शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांच्या पाठीशी महिला, सुशिक्षित मतदार आणि युवक मोठ्या ताकतीने उभे राहिल्याचे चित्र आहे. या गटातील प्रचाराची धुरा खुद्द महिला आणि तरुणांनीच आपल्या खांद्यावर घेतल्याने यंदा निंबवडे गटात ऐतिहासिक परिवर्तन अटळ मानले जात आहे. विद्या मोटे यांनी गेल्या चार वर्षांपासून निंबवडे गटात विविध सामाजिक उपक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी केली आहे. त्यांच्या या कार्याचा प्रभाव तरुणांवर आणि महिलांवर मोठ्या प्रमाणावर पडला असून, त्याचाच सकारात्मक परिणाम या निवडणुकीत दिसून येत आहे. गटातील दिशा भरकटलेल्या तरुणांना प्रबोधनातून योग्य वाट दाखवण्याचे काम मोटे यांनी केले, ज्यामुळे आज सुशिक्षित युवक त्यांच्या प्रचारात अग्रभागी आहेत*लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त सहभाग* या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, सांगली जिल्ह्यात सर्वाधिक महिलांची गर्दी विद्या मोटे यांच्या प्रचारात पाहायला मिळत आहे. विशेषतः सर्वसामान्य कुटुंबातील महिला आण...

शेटफळेत आचारसंहिता संपल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवणार - विनायक मासाळ

शेटफळेत आचारसंहिता संपल्यावर वीस पंचवीस दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वखर्चाने पुतळा बसवणार असल्याचा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार विनायक मासाळ यांनी दिले. शेटफळे येथे प्रचार सभेत ते म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शेटफळे सारख्या सुसंस्कृत गावात पुतळा बसविण्याची संधी मिळणार आहे. हे माझे खरोखर भाग्य समजतो."विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे, मी शब्द दिला आहे आणि तो मी पाळणारच. त्यामुळे तुम्ही उद्याच लगेच दुसरा एखादा शब्द देऊन लोकांची दिशाभूल करू नका. मला फक्त आचारसंहिता संपल्यानंतर २० ते २५ दिवसांचा अवधी द्यावा. जर या विहित काळात मी पुतळा बसवला नाही, तर तुम्ही खुशाल तो बसवावा.

जोगेश्वरी मंदिरासाठी आम्हीच निधी दिला - हर्षवर्धन देशमुख यांचा दावा

शेटफळेतील जोगेश्वरी मंदिराच्या सभागृहासाठी तात्कालिक खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून आम्ही निधी दिला आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी यासाठी खास प्रयत्न केला होता.  कामाचे उद्घाटन कोणीही केले असले तरी निधी हा आम्हीच दिला आहे. त्यासाठी आमचें प्रयत्न होते, असा दावा माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी शेटफळे येथे प्रचार सभेत केला.

निंबवडते शिवसेनेच्या विद्या मोटेे यांचा अनोखा प्रचार

नावीन्यपूर्ण प्रचाराने निंबवडेत विद्याताई मोटेंना उत्स्फूर्त प्रतिसाद; पथनाट्याच्या माध्यमातून दाखवली विकासाची दिशा* निवडणूक प्रचारात नावीन्यपूर्ण उपक्रमांचा वापर करत शिवसेना उमेदवार ॲड. विद्याताई सचिन मोटे यांनी निंबवडे गावात वेगळा उपक्रम राबवला. लोकसंपर्कासाठी पथनाट्याचा प्रभावी वापर करण्यात आला. ‘इंद्र–नारद’ संवादाच्या माध्यमातून विकासाची दिशा मांडण्यात आली. या हटके संकल्पनेमुळे प्रचाराला वेगळीच ओळख मिळाली. सभा, पदयात्रा आणि कोपरा सभांसोबत हा उपक्रम राबवण्यात आला. पथनाट्याने उपस्थितांवर सकारात्मक प्रभाव टाकला. नागरिक आणि मतदारांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी या प्रयोगाचे कौतुक केले. निंबवडेतील कार्यक्रमानंतर विद्याताई मोटे मुडेवाडी येथे दाखल झाल्या. त्यांच्यासोबत पंचायत समिती गणाचे उमेदवार सचिन मोटे उपस्थित होते. कार्यकर्ते, मतदार आणि ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. स्वागतामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. दिवेलागणीची वेळ असूनही महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी विद्याताईंनी महिलांशी थेट संवाद साधला. महिलांनी आपले विचार आणि अपेक्षा मांडल्...

निंबवडे गट दहशतमुक्त आणि स्वाभिमानी समाज निर्मातीसाठी सेनेला साथ द्या - अँड. विद्या मोटे

आटपाडी -लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासोबतच निंबवडे गट दहशतमुक्त आणि स्वाभिमानी समाज निर्मातीसाठी शिवसेनेला सोबत साथ द्यावी, असे आवाहन अँड. विद्या मोटे यांनी केले. त्यांनी बनपुरी, बाळेवाडी आदी गावांचा दौरा केला. त्याच्या सोबत माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील आदी होते. शिक्षण, रोजगार, आरोग्याचया प्रश्नांसाठी निंबवडे जिल्हा परिषद गटाची प्रतिनिधी म्हणुन मी प्रामाणिक योगदान देणार आहे. माझ्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी व्हावा, अशी माझी भुमिका आहे. निंबवडे गटातील सर्व जनता परिवर्तनासाठी शिवसेनेसोबत आहे, असा विश्वास निंबवडे जिल्हा परिषद गटातील शिवसेना उमेदवार विद्याताई मोटे यांनी व्यक्त केला.  मतदारांना स्वाभिमानी समाज निर्मीतीसाठी शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन केले. साध्य फौडेशनच्या माध्यमातुन अनेकांना मदतीचा हात देत आम्ही शिक्षण, नोकरीची दारे खुली केली आहेत. वृक्षारोपण चळवळ, वैद्यकीय मदत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राव्दारे आम्ही लोकहिताचा नवा अध्याय निर्माण केला. समाजाला द...

करगणीत भाजपाच्या तीन ग्रामपंचायत सदस्याचा शिवसेनेत प्रवेश, भाजपाला पडले खिंडार

आटपाडी ता. 28- निवडणुकीच्या रणधुमाळीत करगणीत भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील भाजपाच्या तीन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आज शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे करगणीत शिवसेनेची बाजू अधिक भक्कम झाली आहे.यांनी केला शिवसेनेत प्रवेश: सलग तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले गावातील प्रभावी नेते उत्तम माने, विद्यमान सदस्य अभिजित जाधव, आणि आण्णा कांबळे व त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्या सौ. रूपाली आण्णा कांबळे यांनी भाजपला रामराम ठोकला. नाराजीचे नेमके कारण काय? "ग्रामपंचायत आणि वरिष्ठ स्तरावर भाजपमध्ये कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याकडे सरपंच आणि पक्षाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे," असा आरोप प्रवेशकर्त्या सदस्यांनी केला आहे. विकासाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या या तीव्र नाराजीमुळेच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.महायुतीच्या उमेदवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचे करगणी जिल्हा परिषद गटाचे उम...

खरसुंडती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेनेकडून श्रद्धांजली

 आटपाडी -- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या प्रचार शुभारंभ रद्द करण्यात आला.  त्यानंतर खरसुंडीतील पक्ष कार्यालयामध्ये जयदीप भोसले यांच्या हस्ते अजित पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पंचायत समितीच्या उमेदवार डॉ मनीषा पुजारी, डॉ उमेश पुजारी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे, विनोद पुजारी जहांगीर शेख,दुर्वाआप्पा देठे,औटेवाडी चेअरमन बापुराव खाडे,माजी उपसरपंच मच्छिंद्र भोसले, सुमंत पुजारी,शरद पेडकर ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी यांच्यासह मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयदीप भोसले यांचा तळेवाडीतून प्रचाराचा झंजावत

आटपाडी ता. 28- खरसुंडी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार जयदीप भोसले यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ तळेवाडी येथील श्री. सिद्धनाथ आणि विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन उत्साहात केला. यावेळी जिल्हा परिषदेचे उमेदवार जयदीप भोसले आणि पंचायत समितीच्या उमेदवार सौ. सुनीता सरगर प्रामुख्याने उपस्थित होत्या. विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचा कौल मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर खरसुंडी गटात आता तळेवाडी, काळेवाडी आणि गोमेवाडी या गावांचा नव्याने समावेश झाला आहे. या नवीन गावांमध्ये जयदीप भोसले यांचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले. शिवसेनेच्या माध्यमातून या भागात झालेली विकासकामे आणि स्वर्गीय मोहनराव पाटील (काका) यांचे या परिसराशी असलेले जुने जिव्हाळ्याचे नाते आठवत ग्रामस्थांनी दोन्ही उमेदवारांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवलाउर्वरित कामांसाठी शिवसेनेला साथ द्या: तानाजी पाटील काळेवाडी येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, "या परिसराच्या विकासासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. राहिलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी आणि विकासाच...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटातील उमेदवारांची अंतिम यादी

टेंभूत भाजप नव्हे तर युती आणि अनिलभाऊंचा सिंहांचा वाटा

टेंभू सोबत सामान्य माणसानेच स्वर्गीय आमदार अनिल भाऊंचा नाव जोडलं आहे. त्यांनीच योजना मांडण्यापासून 2014 नंतर गती देऊन पाणी देण्याचे काम केलं आहे आणि राज्यात फक्त भाजपाची सत्ता नव्हती सोबत शिवसेना होती, असे प्रत्युत्तर आमदार सुहास बाबर यांनी विरोधकांना दिले. यावेळी त्यांनी युतीची सत्ता आणि स्वर्गीय आमदार अनिलभाऊ यांचाच टेंभू योजनेत सिंहांचा वाटा असल्याचा प्रबळ दावा केला.               नेलकरंजी ता. आटपाडी येथे प्रचार सभेनंतर झालेल्या पत्रकार बैठकीत आमदार सुहास बाबर यांनी टेंभू संदर्भात भाजप नेतेमंडळीकडून टेंभू योजना भाजपानेच मार्गी लावल्याचा दावा केला जात असल्याच्या प्रश्नावर मत व्यक्त केले. टेंभू सोबत स्वर्गीय आमदार अनिलभाऊ यांचे सर्वसामान्य माणसांनीच नाव जोडले आहे. कोणत्याही गावातील कोणत्याही माणसाला विचारलं तर टेंभू आणि अनिल भाऊ असंच तोंडातून नाव येत. कारण त्यांनीच योजना मांडली आणि गती देऊन पूर्णत्वाकडे नेहली. सांगलीत भाजपात प्रवेश केलेल्या मंडळींमध्ये अपवाद एखादा वगळता शिवसेनेचा कोणीही नव्हता. जे आमच्या विरोधात भूमिका घेत होते अशीच...

बाळेवाडीत शिवसेनेचा ‘वनवे’ निर्धार; माजी सभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती भगवा

आटपाडी (प्रतिनिधी): सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळेवाडी (ता. आटपाडी) गावाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. बाळेवाडीतील माजी महिला व बालकल्याण सभापती, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच आणि विविध सोसायट्यांच्या अध्यक्षांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेचा 'भगवा' हाती घेतला आहे. या जंगी पक्षप्रवेशामुळे बाळेवाडी गाव पूर्णपणे ‘भगवामय’ झाले असून निवडणुकीत शिवसेनेला गावातून ‘वनवे’ मतदान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जनसंवाद मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी हा राजकीय धडाका पाहायला मिळाला. यावेळी निंबवडे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. विद्याताई मोटे आणि निंबवडे पंचायत समिती गणाचे उमेदवार सचिन मोटे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला. *यांनी केला शिवसेनेत प्रवेश*: जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण व समाजकल्याण सभापती सौ. संगिता गणपतराव खरात, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बायनाबाई श्रीमंत खताळ, विद्यमान सदस्य कासाबाई भिमराव भुते, माजी चेअरमन रामचंद्र कारंडे, माजी चेअरम...

स्व. मोहनकाकांची मिनी मंत्रालयात प्रभावी कामगिरी

जयदीप भोसले यांच्या प्रचारासाठी नारीशक्ती एकवटली

खरसुंडी ( प्रतिनिधी)- खरसुंडी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण तापत चालले असून, शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार जयदीप भोसले आणि खरसुंडी गणातील उमेदवार डॉ. मीनाक्षी पुजारी यांच्या प्रचारासाठी आता महिला शक्ती एकवटली आहे. गावभेटी आणि पदयात्रांच्या मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या आहेत.   जयदीप भोसले यांच्या समर्थनार्थ महिला कार्यकर्त्यांनी तनपुरवाडी, घुलेवाडी आणि कानकात्रेवाडी या गावांत जोरदार प्रचार फेरी काढली. या फेरीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. फेरीनंतर महिलांनी घरोघरी जाऊन इतर महिला मतदारांशी संवाद साधला. संवाद साधताना महिला कार्यकर्त्यांनी स्वर्गीय मोहनराव (काका) बाबर, माजी आमदार स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली कामे, तसेच विद्यमान आमदार सुहास बाबर आणि सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात झालेल्या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली. "विकासाची ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी शिवसेनाच हवी," अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. जयदीप भोसले यांना गावागावातून आणि विशेषतः महिला मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळ...

नेलकरंजी--शिवसेनेचे जयदीप भोसले यांनी मतदारांशी साधला संवाद

आटपाडी (प्रतिनिधी):खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार जयदीप भोसले यांनी निवडणूक प्रचारार्थ मिटकी गावाच्या नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले असून, आगामी काळात त्यांच्या पाठीशी ठाम राहण्याची ग्वाही दिली आहे. *बाळूमामांचे दर्शन घेऊन प्रचाराचा श्रीगणेशा* जयदीप भोसले यांनी दौऱ्याची सुरुवात मिटकी येथील संत बाळूमामा मंदिरात दर्शन घेऊन केली. देवदर्शनानंतर त्यांनी गावातील प्रमुख चौक आणि वस्त्यांवर जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या.    *मोहनकाकांच्या विकासकामांना उजाळा* यावेळी झालेल्या कोपरा सभा आणि संवादादरम्यान ग्रामस्थांनी माजी आमदार स्वर्गीय मोहनराव पाटील (मोहनकाका) यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांच्या आठवणींना उजाळा दिला. "काकांच्या काळात झालेली कामे आजही आमच्या स्मरणात आहेत आणि त्याच विकासाची परंपरा पुढे नेण्यासाठी आम्ही जयदीप भोसले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू," असा विश्वास ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला. या संवाद दौऱ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कटरे, सचिन गुर...