मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तिर्थक्षेत्र आघाडीचा आटपाडीत घरोघरी प्रचार

पायाखालची वाळू सरकल्यानेच मंत्र्यांचा ताफा आटपाडीत - तानाजीराव पाटील

आटपाडीकरांनो भाजपाला संधी द्य:ा दादासाहेब हुबाले

भाजपाला संधी द्या : दादासाहेब हुबाले यांचे अहवान

आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत सर्वसामान्य कुटुंबातील उच्चशिक्षित भाजपाचे उमेदवार यु.‌ टी. जाधव आणि सर्व प्रभागातील उमेदवारांना मतदान करून परिवर्तन घडविण्याचे अहवान भाजपाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले यांनी केले.       केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. स्थानिक पातळीवर आटपाडीतही भाजपची सत्ता असेल तर विकास कामांची एक्स्प्रेस सुसाट वेगाने धावत सुटते. कामांना निधी मिळण्यात कोणतीच अडचण येत नाही. सत्तेतील एक नंबरचा पक्ष आणि दोन नंबरचा यामध्ये मोठा फरक असतो. आमदार गोपीचंद पडळकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासाठी यु. टी. जाधव आणि नगरसेवकसाठी सक्षम उमेदवार मैदानात उतरवले आहेत. आटपाडीकरांनी भूलथापांना आणि आमिषाला बळी न पडता भाजपाकडे सत्ता देण्याचे अहवान श्री. हुबाले यांनी केले आहे.

आटपाडीत तिर्थक्षेत्र आडीचा जनशक्तीच्या जोरावर धनशक्तीच्या विरोधात लढा

आटपाडीत शिवसेनेने केला करेक्ट कार्यक्रम

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार सुहास बाबर यांच्यावर गंभीर आरोप

आटपाडीचा दुष्काळ मोदी फडवणीस यांनीच घालवला

'तीर्थक्षेत्र' आघाडीचा झाडून प्रचार

आटपाडी जिल्हा केंद्राच्या दिशेने नेणार

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत आत्ता एक डिसेंबर पर्यंत प्रचार करता येणार

  निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान सुरु होणार असून प्रचार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता बंद करण्यात यावे ; प्रचार बंद झाल्याच्या वेळेपासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी, प्रसारण देखील बंद करावे, असे सुधाारीत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील उमेदवारांनी आयोगाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाजपानेच दुष्काळग्रस्तांची दुष्काळातून कायमची मुक्तता केली

आटपाडी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीच दुष्काळी भागाला पाणी देऊन कायमचा दुष्काळ घालवण्याचे काम केले आत्ता नगरपंचायत भाजपाकडे द्या शहराचा कायापालट करू असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी मालक आमच्याकडे असल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढला. येथे नगरपंचायत निवडणुक प्रचार सभेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर,अमरसिंह देशमुख, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, ब्रह्मानंद पडळकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यु.टी. जाधव आणि नगरसेवकचे उमेदवार उपस्थित होते. मंत्री श्री. पाटील म्हणाले," 2014 मध्ये नरेंद्र मोदी झाल्यावर पहिल्या टप्प्यात मूलभूत सुविधा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अकरा कोटी शौचालय, तीन कोटी घरकुले दिली. 25 कोटी माणसं दारिद्र्यरेषेच्या वर आणली. 2019 ते 24 या दुसऱ्या टप्प्यात स्वाभिमानाचया गोष्टीं केल्या.राम मंदिर उभारले. 370 कलम रद्द केले. 2024 पासून तिसऱ्या टप्प्यात बेरोजगारी संपून देश आर्थिक महासत्ता बनवण्याचे काम सुरू...

आटपाडीत चंद्रकांतदादांनी 'या' उपमुख्यमंत्र्याचा 'असा'काढला चिमटा

आटपाडीत चंद्रकांतदादांनी 'या' मुख्यमंत्र्यला "असा"काढला चिमटा

  आटपाडीत नगरपंचायतीच्या निवडणुक प्रचार सभेत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या भाषणात मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न दिसणारा पण न सोसणारा बारीक चिमटा काढला. "राजाच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी मालक देवेंद्र फडवणीस आमच्याकडे आहे. कधी, कुठे, किती कशासाठी निधी द्यायचा ते ठरवतात." असा टोला मारला. केंद्रात आणि राज्यात भाजप राष्ट्रवादी शिवसेनेची युती आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथे युती नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी  एकमेकांना शिव्या देऊ नका, असं स्पष्ट सांगितल आहे. तरीही त्यांनी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे अस म्हटलं त्याला आम्ही तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे,अस म्हणून चिमटा काढला.

राज्यात पहिल्या दहा मध्ये आटपाडी नगरपंचायत बनवणार: तानाजीराव पाटील

आटपाडी : आटपाडी जिल्ह्याचे केंद्र बनवण्याच्या दृष्टीने व्यापक आराखड्याची रचना बनवली आहे. राज्यात पहिल्या दहा नगरपंचायतीमध्ये आटपाडी नगरपंचायत विकास कामात आणणार असल्याचा निर्धार जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी केला.    आटपाडी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ मापटेमळा येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी अमोल मोरे माजी उपसभापती भागवत माळी नगराध्यक्ष उमेदवारावसाहेब सागर राजेश सातारकर पंढरीनाथ नागणे आप्पासाहेब माळी बिरदेव खांडेकर दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले,"सांगली जिल्ह्यात सांगली नंतर सर्वाधिक क्षेत्रफळ आटपाडी नगरपंचायतीचे आहे. आटपाडी मापटेमळ आणि भिंगेवाडी एवढा मोठा पसारा कोणत्याही नगरपालिका, नगरपरिषदेला नाही. भविष्यात आटपाडी जिल्ह्याचे केंद्र करण्याचे माझे ध्येय आहे.  दृष्टीने जिल्हा उपरुग्णालय, नाट्यगृह, 84 कोटीची सौरऊर्जावरची पाणी योजना यासारखी कामे उभारली आहेत. शहराला जोडणारे चारही बाजूचे प्रशस्त मोठे रस्ते बनवलेत. भव्य पोलीस ठाणे पंचायत समिती आणि बांधकाम विभागाची टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. नगरपंचायत ...

आटपाडीचा पहिला नगराध्यक्ष सौरभच होणार

आटपाडी जिल्ह्याचे केंद्र बनवण्याच्या दृष्टीने आराखड्याची रचना : तानाजीराव पाटील

आटपाडी जिल्ह्याचे केंद्र बनवण्याच्या दृष्टीने व्यापक आराखड्याची रचना बनवली आहे,,,,,,, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील.    सांगली जिल्ह्यात सांगली नंतर सर्वाधिक क्षेत्रफळ आटपाडी नगरपंचायतीचे आहे. आटपाडी मापटेमळ आणि भिंगेवाडी एवढा मोठा पसारा कोणत्याही नगरपालिका, नगरपरिषदेला नाही. भविष्यात आटपाडी जिल्ह्याचे केंद्र करण्याच्या दृष्टीने जिल्हा उपरुग्णालय, नाट्यगृह, पाणी योजना यासारखी कामे उभारली आहेत. शहराला जोडणारे चारही बाजूचे प्रशस्त रस्ते बनवलेत. येलो झोन ग्रीन झोन बनवले आहे. माझ्या स्वतःच्या मालमत्तेवर सात ठिकाणी आरक्षण पडले आहे. आरक्षण थोड्या जागेवर पडेल मात्र त्यातून होणाऱ्या विकास कामामुळे राहिलेल्या जागेचे पाच ते दहा पट मूल्य वाढते. मला आटपाडी नगरपंचायत राज्यात पहिल्या दहा मध्ये बनवायची आहे.-- तानाजीराव पाटील.

तिर्थक्षेत्र संयुक्त आघाडीच सक्षम पर्याय -- देशमुख, पाटील

आटपाडी - भाजपाकडे शिव्या देणारी तर शिवसेनेकडे नगराध्यक्षासाठी अर्ज भरू देणारी दमबाजी करणारी मंडळी आहेत. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जाणारी तीर्थक्षेत्र संयुक्त आघाडीने सक्षम चागला पर्याय दिल्याने संयुक्त आघाडीचीच नगरपंचायतीवर सत्ता येणार असल्याचा दावा माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि भारत पाटील यांनी केले.                     तीर्थक्षेत्र संयुक्त विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौरभ पाटील यांना सोबत घेऊन माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी घर टू घर प्रचार सुरू केला आहे. शिवाय सौरभ पाटील यांनी भिंगरी लावून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालला आहे. त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.    या दरम्यान, माजी आमदार श्री. देशमुख यांनी माध्यमाशी बोलताना आम्ही वर महायुतीत असलो तरी खाली भाजप आणि शिवसेनेची जुळत नाही. भाजपचे कार्यकर्ते शिव्या देणारे तर व्यापाऱ्याला दमबाजी करून उमेदवारी अर्ज भरू न देणारी सेना असल्याचे सांगितले.  तर भारत पाटील यांनी विरोधकांनी निवडणूक खिलाडू वृत्तीने खेळा...

विरोधकांनी केलील काम सांगावीत : तानाजीराव पाटील

आटपाडी---- विरोधकाकडे सांगण्यासारख एकही काम नाही म्हणून दिशाभूल करून निवडणूक दुसरीकडे वळवण्याचा केविलवाना प्रयत्न होतोय. पाच वर्ष घरात बसायचं. कामावर न बोलता लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी केला. भिंगेवाडी येथे नगराध्यक्ष उमेदवार रावसाहेब सागर आणि नगरसेवकाच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते. यावेळी बाळासाहेब हजारे, सोमनाथ भिंगे, राहुल हजारे, मनोज मरगळे, बिरुदेव खांडेकर आदी उपस्थित होते. श्री. पाटील यांनी तीन वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले ,"माझा पक्ष सत्तेत आहे म्हणून घरात बसून विकास होत नसतो. त्यासाठी रात्रीचा दिवस करून रक्त आटवून प्रयत्न करावा लागतो. ते आम्ही केल्याने आज काम दिसतात. विरोधक शुद्ध पाणी देऊ, नाट्यगृह उभारू अशी आश्वासन देतात पण आम्ही 84 कोटीची पाणी योजना, नाट्यगृह मंजूर करून काम अंतिम टप्प्यात आली तरी त्यांना माहीती नाही.चालू असलेल्या कामांची आश्वासने देत सुटलेत.‌बद पडलेली पेठ काम केल्याने चालू झाली" ते म्हणाले,"पाच वर्ष घरात बसायचं. निवडणुका आल्यावर बाहे...

आटपाडी नगरपंचायतीचा प्रचार टिपेला

विरोधकाकडे सांगण्यासारखे एकही काम नाही : तानाजीराव पाटील

भाजप -शिवसेनेला तीर्थक्षेत्र संयुक्त आघाडी सक्षम पर्याय

आटपाडी जिल्ह्याचे केंद्र बनवण्याच्या दृष्टीने रचनात्मक आराखडा बनवला : तानाजीराव पाटील

आटपाडीत "या" पक्षाच्या जिल्हाध्यक्षांने शिवसेनेला दिला पाठिंबा

आटपाडीत शुक्रवारी "या" भाजप मंत्र्याची तोफ धडाडणार

आटपाडी-- आटपाडीचा पहिला नगराध्यक्ष भाजपाचाच करण्यासाठी उद्या शुक्रवारी दुपारी बारा वाजता भाजपची तोफ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची धडाडणार आहे. ते काय बोलणार याकडे आटपाडीकरांच्या नजरा लागल्या आहेत. आटपाडी नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक लागली आहे. पहिला मानाचा नगराध्यक्ष करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि संयुक्त विकास आघाडी यांच्यात मोठी रस्सीखेच लागली आहे. भाजपाने नगराध्यक्ष पदासाठी शिक्षक पदाचा राजीनामा देऊन यु. टी. जाधव यांना आखाड्यात उतरवले आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख दोघेही एकत्र आल्याने भाजपाची ताकद वाढली आहे. निवडणुकीत आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडू लागल्या आहेत. मानाचा पहिला नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपाची दोन नंबरची फळी उद्यापासून मैदानात उतरणार आहे. उद्या शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचार सभेचे आयोजन केले आहे. त्यांची आटपाडीत तोफ धडाडणार आहे. त्यानंतर शनिवारी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रचार सभेचे आयोजन केले आहे. भाजपाच्या या दोन दिग्गज मंत्...

आटपाडीत चक्क नगराध्यक्षपदाच्या उमेदवारानेच शिवसेनेला दिला पाठिंबा

आटपाडी ता.27- आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. काहींनी पाठिंबा दिला पण चक्क नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या गुरुप्रसाद कवडे याने प्रचाराच्या मध्यावर शिवसेनेला पाठिंबा दिला. शिवसेनेने खेळलेल्या खेळीने विरोधकांना जबर धक्का बसला. आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक अनेक कारणाने सुरुवातीपासून चर्चेत राहिली आहे. बाजार समितीचे माजी संचालक पंढरीनाथ नागणे, दी. बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सूर्यकांत दौडे, सोमनाथ भिंगे, प्रदीप देशमुख, पंडितराव देशमुख, सोमनाथ भिंगे, नितीन सागर अशा अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित गलांडे यांनी विकास कामात शिवसेना आघाडीवर असल्याने शिवसेनेला नगरपंचायत निवडणुकी पाठिंबा दिला. या घडामोडीनंतर भिंगेवाडीत मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम समाजाने चक्क तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. मुस्लिम समाजाचे तेराशेवर मतदान संख्या आहे. शिवसेनेने खेळलेल्या या खेळीने विरोधकांना बरेच बॅकफूटवर घालवले आहे. एवढ्यावरच श...

आटपाडी, पंढरपूर मध्ये भाऊ-बहीण एकाच वेळी नगराध्यक्षपदाच्या रिंगणात

 आटपाडी ता.25- असे म्हणतात युद्धात, प्रेमात आणि निवडणुकीच्या आखाड्यात सर्वकाही माप असत. त्याचीच प्रचिती आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत काही प्रभागात आली आहे. अनेक प्रभागात रक्ताची नाती असलेले सख्खे चुलत भाऊ, सख्खी चुलत सासु- सून, चुलत जावा--जावा आणि चुलत चुलते- पुतणे यांनी एकमेकांच्या विरोधात शडडु ठोकला आहे. रक्ताच्या नात्यातील या लढतीने शहराचे लक्ष वेधले आहे.                    आटपाडी नगरपंचायत निवडणूकीचा आखाडा रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. नगरपंचायतीची ही निवडणूक भाजप, शिवसेना आणि तीर्थक्षेत्र विकास संयुक्त आघाडी अशी तिरंगी लागली आहे. सर्वच पक्षानी प्रत्येक प्रभागात उमेदवारी देताना अनेक गोष्टी तपासून दिल्या आहेत. एकमेकांच्या विरोधात तेवढ्याच ताकदीचे, त्याच त्या समाजाचे आणि त्यातही रक्ताचे नातं असलेल्या काही कुटुंबात परस्पराच्या विरोधात उमेदवारी दिली आहे.‌ उमेदवारी देताना तिन्ही गटाने डावाला डाव दिला आहे. त्यामुळे निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे.                         शिव...

खरसुंडी श्री सिद्धनाथाच्या मंदिरात डाळिंबाची आरास

आटपाडी--श्री. क्षेत्र खरसुंडी येथे सिद्धनाथ मंदिरात प्रथमच डाळिंबाची आरास करण्यात आली. श्री नाथ जन्मोत्सव मंगळवार दि.५ रोजी संपन्न होणार आहे.त्या निमित्त मंदिरात श्रीनाथ जन्माष्टमी सप्ताह सुरू असून या सप्ताहाचे निमित्त साधून श्री सिद्धनाथांच्या पूजेस डाळिंबांची   आकर्षक आरास करण्यात आली .यावेळी श्री सिद्धनाथांची सफेद रंगाच्या पोशाखात केलेली अश्वारूढ पूजा आकर्षक दिसत होती .तर देवी मातेस डाळिंबी रंगाची साडी परिधान करण्यात आली होती .माणदेशचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  श्री सिद्धनाथांना प्रथमच डाळिंबाचा अभिषेक केल्याची भावना भक्तगणातून व्यक्त होत होती . या पूजेसाठी आटपाडीतील मंगलमूर्ती फ्रुट कंपनीचे पंढरीनाथ नागणे यांनी दर्जेदार डाळिंबाचा पुरवठा केला . ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या पूजेसाठी श्रीपूजक किशोर पुजारी, अॅड. प्रतीक पुजारी, गणेश पुजारी,जीवन पुजारी. प्रमोद पाटील, प्रथमेश अमित पुजारी, निलेश पोमधरणे ,ज्ञानेश्वर पाटील, सतीश भांगे,प्रदिप  पुजारी,सत्यम टांकसाले आग्नेन पुजारी आदी श्रीपुजकांचे सहकार्य लाभले .ही पूजा पाहून भाविकांनी समाधान व्यक...