आटपाडी बाजार समितीच्या सभापती निवडीत कोण फुटला? आटपाडी बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीत भाजप आघाडीतील एक मत फुटल्याने सेना आघाडीने सत्ता मिळवली मात्र फुटलेला संचालक कोण याचं गुपित रहस्य उघडलेले नाही. भाजपच्या गोटात आणि लोकांत वेगवेगळी नावे चर्चेत आहेत. आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने 18 पैकी नऊ जागेवर विजय मिळवला होता तर विरोधी शिंदे गटाची शिवसेना, काँग्रेस आणि रासप आघाडीने नऊ जागा मिळवल्या होत्या. 18 पैकी सत्ताधारी आणि विरोधी गटाला समान नऊ नऊ जागा मिळाल्या होत्या. संचालक निवडीचे मतमोजणी झाल्यानंतर अवघ्या दोन तासात भाजप आघाडीने त्यांचे निवडून आलेले आठ संचालक अज्ञात स्थळी हलवले होते. सर्वांचे फोन बंद होते. संचालकावर इतरांचे बारीक लक्ष होते. सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी वेळी भाजप आघाडीचे सर्व नऊ सदस्य एका वेळी एक...
गर्जा जय जय महाराष्ट्र माझा.