मुख्य सामग्रीवर वगळा

ज्येष्ठांच्या पेन्शनसाठी आटपाडीत रस्ता रोको

आटपाडी.- साठ वर्षावरील ज्येष्ठांना केंद्र आणि राज्य सरकारने  अडीच हजार प्रमाणे प्रत्येकी पाच हजार रुपये मासिक पेन्शन द्यावी, या मागणीसाठी येथील पंढरपूर ते कराड राज्य मार्गावर साई मंदिर चौकात रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलन एक तास चालले. यावेळी आंदोलकांनी पंधरा दिवसांत निर्णय न घेतल्यास लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला.                                साठ वर्षावरील ज्येष्ठांना केंद्र सरकारने अडीच आणि राज्य सरकारने अडीच, अशी पाच हजार रुपये पेन्शन द्यावी, या मागणीसाठी जनता दलाचा गेली बारा वर्षे लढा सुरू आहे. या लढ्याचे केंद्र आटपाडी बनले आहे. आटपाडी शेजारचे सांगोला, माण, खटाव आणि मंगळवेढा तालुक्यात आंदोलने केली आहेत. गेल्या दोन महिन्यापासून पुन्हा नव्याने आंदोलने सुरू केली आहे. यात आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा आणि नंतर जेलभरो आंदोलन केले होते. त्याची दखल न घेतल्यानेआज रस्ता रोको आंदोलन केले. दुपारी बारा वाजता पंढरपूर ते कराड राज्य मार्गावर साई मंदिर चौकात रस्ता रोको आंदोलन केले. जनता दलाचे तालुका अध्यक्ष आबासो सागर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले होते.यात ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. आंदोलनाण जनता दलाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष समिती पाटील, दिगंबर मुळीक, सोमनाथ अनुसे, माणिक  पांढरे, बजरंग पाटील, तुकाराम अनुसे, विलास जाधव, रामचंद्र कोळेकर आदी सहभागी झाले होते.   पंधरा दिवसात पेन्शन संदर्भात शासनाने निर्णय न घेतल्यास लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलनाचा निर्णय आंदोलकांनी आज घेतला. यात 16 ऑगस्टला खासदार संजय पाटील, 30 ऑगस्टला आमदार सुमनताई पाटील,  9 सप्टेंबरला आमदार अनिल बाबर, 13 सप्टेंबरला आमदार गोपीचंद पडळकर, 27 सप्टेंबरला आमदार शहाजी पाटील, 4 ऑक्टोबरला आमदार विश्वजीत कदम  आणि 11 ऑक्टोबरला पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.              फोटो-१) आटपाडी येथे साठ वर्षावरील जेष्ठांना पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी जनता दलाने रस्ता रोको आंदोलन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते