मुख्य सामग्रीवर वगळा

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश


करगणी (ता. आटपाडी):
करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले
ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचे अभिजीत जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.
राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
करगणी जिल्हा परिषद गटात या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा रंगली आहे. भाजपचे 'व्होट बँक' समजल्या जाणाऱ्या भागालाच भगवे खिंडार पडल्याने विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. एकाच दिवसात दोन गट फुटल्याने करगणीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, याचा थेट परिणाम आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर दिसून येणार आहे.
याप्रसंगी करगणीतील प्रमुख पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते