आटपाडी ता.3- लेंगरेवाडी ता. आटपाडी येथे काल मध्यरात्री आज्ञा चोरट्यानी धुमाकूळ घातला. तीन ठिकाणी घरफोडीत महिलांना चाकूचा धाक दाखवून चार लाखाचा सोन्याचा ऐवज आणि ऐंशी हजार रुपयावर डल्ला मारला. या घरफोडीने गावात खळबळ उडाली. तपासात श्वानपथक घटनास्थळीच घुटमुळले. या चोरीची आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. लेंगरेवाडी ता. आटपाडी येथे शेटफळे ते आटपाडी रस्त्यालगत लेंगरेवाडी पाटी जवळ आनंदा लेंगरे पत्नी, आई आणि मुलासोबत राहतात. काल मध्यरात्री अडीच वाजता मित्राकडे दिलेली मेंढी व्यायला झाल्यामुळे ते गेले. ते पाऊण तासात घरी परतले तेवढ्या कालावधीत ही चोरीची घटना घडली. त्यांच्या आई बाहेर सोप्यात झोपल्या होत्या तर पत्नी आत मध्ये होत्या. चोरट्यांची हालचाल कानावर पडल्याने जागे झालेल्या पत्नीला चोरट्यानी चाकूचा धाक दाखवून आणि मुलांना मारण्याची धमकी दाखवून शांत परत झोपायला सांगून चोरी केली. यामध्ये गंठण, बोरमाळ, नेकलेस, लहान मुलांचे दागिने, सोन्याची चैन असे साडेतीन लाखाचे 70 ग्रॅम सोने चोरीला गेले. तसेच डाळिंबाच्या बागेसाठी वर खताचा डोस देण्यासाठी आणलेले ऐंशी हजार रुपयावर ही चोरट्यानी डल्ला मारला. तेथून जवळच असलेली रामहरी शिंदे आणि हौसाबाई लेंगरे यांचीही घरे फोडी केली. तिथे पंधरा ग्रॅम सोने आणि काही रक्कम चोरट्यांच्या हाती लागली. चोरीच्या तपासासाठी श्वान पथक मागवले होते मात्र ते घराच्या भोवती घुटमुळे. या घटनेने लेंगरेवाडीत खळबळ उडाली आहे.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा