मुख्य सामग्रीवर वगळा

मराठा आरक्षणावर प्रश्नी गार्डीत रस्त्यावर टायर पेटवले

विटा--मराठा आरक्षणाचा प्रश्नी खुद्द सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदाराच्या गावांतच आज सोमवारी जाळपोळ करण्यात आली. सांगली जिल्ह्या तील शिवसेना शिंदे गटाचे एकमेव आमदार अनिलराव बाबर यांच्या गार्डी (ता. खानापूर) येथे "एक मराठा,लाख मराठा," "जय भवानी- शिवाजी", "आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे," आरक्षण द्या नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणाबाजीत जालन्यामध्ये सरका रातील ज्यांनी लाठीमारीचा आदेश दिला त्यांचा राजीनामा घ्या, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
जालना येथे झालेल्या मराठा समाजाच्या आंदो लनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार अनिलराव बाबर यांच्या गार्डी (ता. खानापूर) येथे फलटण ते सांगली राज्य महामार्गावरील रस्त्यावर टायर्स पेटवून रस्ता रोको करण्यात आला. यावेळी थोडा तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजूंकडे काही काळ वाहनांची रांग लागली. या आंदोलना दरम्यान दस्तुरखुद्द आम दार बाबर यांचे पुतणे राहुल बाबर, सौरभ बाबर, अजित बाबर, उपसरपंच विक्रम बाबर, बालाजी बाबर, कुलदीप बाबर, ऋतुराज बाबर, विशाल साळुंखे, प्रदीप कुंभार, हर्षवर्धन पाटील, सुशांतच चव्हाण यांच्यासह शेकडो तरुण रस्त्यावर उतरले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते