मुख्य सामग्रीवर वगळा

आटपाडी नगरपंचायतीची मतमोजणी कशी होणार,,,, ते वाचा

आटपाडी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत एकूण 17 प्रभागांच्या सदस्य व थेट नगराध्यक्ष पदांकरिता मतदान दि.02/12/2025 रोजी सुरळीत पार पडले. मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मतमोजणी दि 21/12/2025 रोजी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालय, आटपाडी येथे होणार आहे. मतमोजणी प्रतिनिधी करिता ओळखपत्र नगरपंचायत कार्यालय येथे देण्यात येणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी एकूण 15 टेबल असतील त्यामध्ये एक टेबल वर पोस्टल मतमोजणी होइल व उर्वरित 14 टेबल वर EVM मशीनवरील मत मोजणी होईल. सुरुवातीला टपाली मतपत्रीकांची मतमोजणी सुरु होणार आहे. त्यांनतर प्रत्येक टेबलवर एक अशा पहिल्या 14 प्रभागांची मतमोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर ज्या प्रभागात दोन मतदान केंद्रे आहेत अशा प्रभागातील दुसऱ्या मतदान केंद्रांची मतमोजणी त्याच टेबलवर होणार आहे. एकूण 25 मतदान केंद्रावर 16410 इतके मतदान झाले होते. सदरची मतमोजणीकरिता सर्वसाधारणपणे 75 अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सदर अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मत मोजणीस सकाळी ठीक दहा वाजता सुरुवात होईल. एकूण 02 फेऱ्या मध्ये मतमोजणी होईल. नगराध्यक्ष पदाची मतमोजणी ही पूर्ण 17 मतमोजणीच्या प्रभागांची मतमोजणी झाल्यानंतर अंतिम होईल. तसेच मतमोजणीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार आहे. सदर ठिकाणी मतमोजणी कामाच्या कर्तव्यावर असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना मोबाइल वापरणेस बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात येणार आहे. सर्व उमेदवार/प्रतिनिधी/राजकीय प्रतिनिधी यांना सूचना देण्यात येते की मतमोजणी वेळी ठीक 9 वाजता मतमोजणी ठिकाणी ओळखपत्रासह उपस्थित राहावे. ओळखपत्राशिवाय कोणासही प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी कक्षामध्ये कोणतेही डीजीटल डिव्हाइस, मोबाइल यांस प्रवेश असणार नाही याची नोंद घ्यावी. मतमोजणी दिवशी मतमोजणी ठिकाणच्या आजूबाजूचा भाग हा Pedestrian zone म्हणून घोषित करण्यात येणार आहे. पत्रकारांकरिता देखील एक कक्ष तयार करण्यात आला आहे. मतमोजणीची माहिती तहसिल कार्यालयाबाहेर उपस्थित असलेल्या नागरिकांना ऐकू जाईल अशा प्रकारे ध्वनीक्षेपकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व फेऱ्या झाल्यावर निकाल प्रसिद्ध केला जाईल व लगेच सर्व विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते