मुख्य सामग्रीवर वगळा

आटपाडीत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजीपाला पिकाच्या बियाणाचे वापर

आटपाडी -  तालुक्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पंचायत समितीकडून नामवंत कंपन्यांचे भाजीपाला पिकांच्या बियाणाचे मोफत वाटप केले. गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार आणि कृषी अधिकाऱ्यांच्या हस्ते  बियाणांचे वाटप केले.                 केंद्र आणि राज्य सरकारने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे धोरण राबवले आहे. रासायनिक फवारे आणि खतांचा वापर कमी करून सेंद्रिय पद्धतीने शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवावा, यासाठी विविध धोरणे राबवून प्रोत्साहन दिले जात आहे. अती रासायनिकचा वापर केल्याने आरोग्याच्या समस्या गंभीर होत चालले आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे, खते, औषधे देण्याचे धोरण राबवले आहे. त्या अंतर्गत जिल्हा कृषी अधिकारी मनोज वेताळ यांच्या माध्यमातून आटपाडी पंचायत समितीला नामवंत कंपन्यांची मिरची, टोमॅटो, भेंडी, शेवगा, बीट, पालक, मेथी, कोथिंबीर आदी प्रकारची बियाणे प्राप्त झाली होती. या बियाणाचे वाटप सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार कृषी अधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते केले.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते