आटपाडी- प्राथमिक शिक्षक संघ व माडगुळे येथील गदिमा प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे १५ शिक्षकांना गदिमा गुणवंत शिक्षक सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले. प्रत्येक केंद्रातून १४ प्राथमिक शिक्षक, एका माध्यमिक शिक्षकाच्या गुणवत्तापूर्ण योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.
काही वर्षांपासून प्राथमिक शिक्षक संघाकडून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. गुणवंत शिक्षकांना गदिमा स्मृती पुरस्कार देण्यात येतो.
यंदा रामचंद्र दुंडप्पा हुक्केरी (जिल्हा परिषद शाळा, पुकळेवस्ती, करगणी केंद्र), मनीषा रमेश सूर्यवंशी (जि. प.
माडगुळे प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १५ शिक्षकांना गदिमा सन्मान पुरस्काराने सन्मानित केले,
शाळा, गोदिरा, माडगुळे केंद्र), सचिन पोपट गायकवाड (जि. प. शाळा, रानमळा, शेटफळे केंद्र), विष्णू पांडुरंग कांबळे (जि. प. शाळा, हिवतड, गोमेवाडी केंद्र), पंकज रामचंद्र चांडवले (जि. प. शाळा, शेगदारमळा, आटपाडी केंद्र), अंकुश नामदेव माळी (जि. प. शाळा, खटकाळमळा, देशमुखवाडी
केंद्र), सायरा लतिफ आत्तार (जि. प. शाळा, राजेवाडी, लिंगीवरे केंद्र), राजू रामू गवळी (जि. प. शाळा, गुलालकी, नेलकरंजी केंद्र), धनाजी लक्ष्मण केंगार (जि. प. शाळा, खरसुंडी क्र. १, खरसुंडी केंद्र), पवन नरेश सोनटक्के (जि. प. शाळा, घरनिकी, घरनिकी केंद्र), नामदेव लिंगण्णा झरीवाड (जि. प. शाळा,
Sangli, Main 18/12/2026 Page No. 5
कोकरेखोरा, निंबवडे केंद्र), मालती श्रीरंग गोंजारी (जि. प. शाळा, शेरेवाडी, विठलापूर केंद्र), मंदाकिनी जालिंदर सादिगले (जि. प. शाळा मानेवाडी, झरे केंद्र), आनंद हरिदास यादव (जि. प. शाळा, दिघंची क्र. १, दिघंची केंद्र), भीमराव लिंगाप्पा पाटील (घाणंद हायस्कूल, घाणंद) यांना गदिमा पुरस्कार
प्रदान करण्यात आला.
ग्रामीण साहित्यिक इंद्रजित घुले, सुमित्र माडगुळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. मॉडर्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष टी. ए. चव्हाण, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष असिफ मुजावर, समाधान ऐवळे, अजिनाथ बुधावले, सुनील गायकवाड, नितीन वाघमारे, भरत कदम, सचिन त्रिगुणे, महेश गोंजारी, विकास पाल्सांडे, रवी भोसले, विजय पवार, समाधान ऐवळे, बिरूदेव मुढे, आकाराम कोळपे, सागर नागणे, अंकुश बुधावले, ज्ञानेश्वर खिलारी, शामसुंदर वनारसे, संतोष क्षीरसागर, अमोल भोसले, अक्षय थोरात, सतीश करडे, शैलेश वाघ, पुष्पा धूम, गायत्री चांडवले, गायत्री कुलकर्णी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा