मुख्य सामग्रीवर वगळा

विरोधकांनी केलील काम सांगावीत : तानाजीराव पाटील

आटपाडी---- विरोधकाकडे सांगण्यासारख एकही काम नाही म्हणून दिशाभूल करून निवडणूक दुसरीकडे वळवण्याचा केविलवाना प्रयत्न होतोय. पाच वर्ष घरात बसायचं. कामावर न बोलता लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी केला. भिंगेवाडी येथे नगराध्यक्ष उमेदवार रावसाहेब सागर आणि नगरसेवकाच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते. यावेळी बाळासाहेब हजारे, सोमनाथ भिंगे, राहुल हजारे, मनोज मरगळे, बिरुदेव खांडेकर आदी उपस्थित होते. श्री. पाटील यांनी तीन वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले ,"माझा पक्ष सत्तेत आहे म्हणून घरात बसून विकास होत नसतो. त्यासाठी रात्रीचा दिवस करून रक्त आटवून प्रयत्न करावा लागतो. ते आम्ही केल्याने आज काम दिसतात. विरोधक शुद्ध पाणी देऊ, नाट्यगृह उभारू अशी आश्वासन देतात पण आम्ही 84 कोटीची पाणी योजना, नाट्यगृह मंजूर करून काम अंतिम टप्प्यात आली तरी त्यांना माहीती नाही.चालू असलेल्या कामांची आश्वासने देत सुटलेत.‌बद पडलेली पेठ काम केल्याने चालू झाली" ते म्हणाले,"पाच वर्ष घरात बसायचं. निवडणुका आल्यावर बाहेर पडणार. त्यामुळे सांगण्यासारखं त्यांच्याकडे एक सुद्धा काम नाही. म्हणून विकासा आराखडा किंवा काही तरी सांगून लोकांची दिशाभूल करायचं काम चालल आहे. सांगली नंतर आटपाडीचे क्षेत्रफळ सर्वाधिक आहे. जिल्हा डोळ्यासमोर ठेवून रिंग रोड, अंशी,साठ आणि वीस फुट रस्ते, असा आराखडा बनवला. माझ्याही जागेवर सात ठिकाणी आरक्षण पडल आहे. जिल्हास्तरावरची कामे उभारताना कुठेतरी आरक्षण पडणार. पण कामामुळे राहिलेल्या जागांची पाच दहा पट किंमत वाढणार आहे. विरोधकांच्या दिशाभूलीला बळी न पडता मी स्वतः नगराध्यक्ष आणि नगरसेवकचा उमेदवार असल्याचे समजून मतदान करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष सत्यजित गलांडे यांनी सेनेला पक्षाचा पाठिंब्याचे पत्र दिले तर भिंगेवाडी येथील मुस्लिम बांधवांनी सेनेत प्रवेश केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते