मुख्य सामग्रीवर वगळा

खरसुंडी श्री सिद्धनाथाच्या मंदिरात डाळिंबाची आरास

आटपाडी--श्री. क्षेत्र खरसुंडी येथे सिद्धनाथ मंदिरात प्रथमच डाळिंबाची आरास करण्यात आली. श्री नाथ जन्मोत्सव मंगळवार दि.५ रोजी संपन्न होणार आहे.त्या निमित्त मंदिरात श्रीनाथ जन्माष्टमी सप्ताह सुरू असून या सप्ताहाचे निमित्त साधून श्री सिद्धनाथांच्या पूजेस डाळिंबांची   आकर्षक आरास करण्यात आली .यावेळी श्री सिद्धनाथांची सफेद रंगाच्या पोशाखात केलेली अश्वारूढ पूजा आकर्षक दिसत होती .तर देवी मातेस डाळिंबी रंगाची साडी परिधान करण्यात आली होती .माणदेशचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  श्री सिद्धनाथांना प्रथमच डाळिंबाचा अभिषेक केल्याची भावना भक्तगणातून व्यक्त होत होती .
या पूजेसाठी आटपाडीतील मंगलमूर्ती फ्रुट कंपनीचे पंढरीनाथ नागणे यांनी दर्जेदार डाळिंबाचा पुरवठा केला . ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या पूजेसाठी श्रीपूजक किशोर पुजारी, अॅड. प्रतीक पुजारी, गणेश पुजारी,जीवन पुजारी. प्रमोद पाटील, प्रथमेश अमित पुजारी, निलेश पोमधरणे ,ज्ञानेश्वर पाटील, सतीश भांगे,प्रदिप  पुजारी,सत्यम टांकसाले आग्नेन पुजारी आदी श्रीपुजकांचे सहकार्य लाभले .ही पूजा पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते