आटपाडी-- आटपाडीचा पहिला नगराध्यक्ष भाजपाचाच करण्यासाठी उद्या शुक्रवारी दुपारी बारा वाजता भाजपची तोफ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची धडाडणार आहे. ते काय बोलणार याकडे आटपाडीकरांच्या नजरा लागल्या आहेत. आटपाडी नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक लागली आहे. पहिला मानाचा नगराध्यक्ष करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि संयुक्त विकास आघाडी यांच्यात मोठी रस्सीखेच लागली आहे. भाजपाने नगराध्यक्ष पदासाठी शिक्षक पदाचा राजीनामा देऊन यु. टी. जाधव यांना आखाड्यात उतरवले आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख दोघेही एकत्र आल्याने भाजपाची ताकद वाढली आहे. निवडणुकीत आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडू लागल्या आहेत. मानाचा पहिला नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपाची दोन नंबरची फळी उद्यापासून मैदानात उतरणार आहे. उद्या शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचार सभेचे आयोजन केले आहे. त्यांची आटपाडीत तोफ धडाडणार आहे. त्यानंतर शनिवारी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रचार सभेचे आयोजन केले आहे. भाजपाच्या या दोन दिग्गज मंत्र्यांची तोफ कोण कोणता दारूगोळा उडवणार याची उत्सुकता लागली आहे.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा