आटपाडी ता.27- आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. काहींनी पाठिंबा दिला पण चक्क नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या गुरुप्रसाद कवडे याने प्रचाराच्या मध्यावर शिवसेनेला पाठिंबा दिला. शिवसेनेने खेळलेल्या खेळीने विरोधकांना जबर धक्का बसला. आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक अनेक कारणाने सुरुवातीपासून चर्चेत राहिली आहे. बाजार समितीचे माजी संचालक पंढरीनाथ नागणे, दी. बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सूर्यकांत दौडे, सोमनाथ भिंगे, प्रदीप देशमुख, पंडितराव देशमुख, सोमनाथ भिंगे, नितीन सागर अशा अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित गलांडे यांनी विकास कामात शिवसेना आघाडीवर असल्याने शिवसेनेला नगरपंचायत निवडणुकी पाठिंबा दिला. या घडामोडीनंतर भिंगेवाडीत मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम समाजाने चक्क तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. मुस्लिम समाजाचे तेराशेवर मतदान संख्या आहे. शिवसेनेने खेळलेल्या या खेळीने विरोधकांना बरेच बॅकफूटवर घालवले आहे. एवढ्यावरच शिवसेना थांबली नसून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केलेले सादिक खाटीक यांना उमेदवारी माघारी घेऊन पाठिंबा मिळवण्यात यश श्री. खाटीक यांनी शिवसेनेची विकासाची भूमिका पटल्याने पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नगराध्यक्षपदाची अपक्ष निवडणूक लढत असलेले गुरुप्रसाद कवडे यांचा पाठिंबा मिळवून दोन्ही विरोधकांना जबर धक्का दिला आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नगराध्यक्ष उमेदवारानेच शिवसेनेला पाठिंबा दिल्याची आश्चर्यकारक घटना आटपाडीत घेतली आहे. त्याची एक चर्चा रंगली आहे.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा