आटपाडी जिल्ह्याचे केंद्र बनवण्याच्या दृष्टीने व्यापक आराखड्याची रचना बनवली आहे,,,,,,, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील. सांगली जिल्ह्यात सांगली नंतर सर्वाधिक क्षेत्रफळ आटपाडी नगरपंचायतीचे आहे. आटपाडी मापटेमळ आणि भिंगेवाडी एवढा मोठा पसारा कोणत्याही नगरपालिका, नगरपरिषदेला नाही. भविष्यात आटपाडी जिल्ह्याचे केंद्र करण्याच्या दृष्टीने जिल्हा उपरुग्णालय, नाट्यगृह, पाणी योजना यासारखी कामे उभारली आहेत. शहराला जोडणारे चारही बाजूचे प्रशस्त रस्ते बनवलेत. येलो झोन ग्रीन झोन बनवले आहे. माझ्या स्वतःच्या मालमत्तेवर सात ठिकाणी आरक्षण पडले आहे. आरक्षण थोड्या जागेवर पडेल मात्र त्यातून होणाऱ्या विकास कामामुळे राहिलेल्या जागेचे पाच ते दहा पट मूल्य वाढते. मला आटपाडी नगरपंचायत राज्यात पहिल्या दहा मध्ये बनवायची आहे.-- तानाजीराव पाटील.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा