मुख्य सामग्रीवर वगळा

भाजपानेच दुष्काळग्रस्तांची दुष्काळातून कायमची मुक्तता केली

आटपाडी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीच दुष्काळी भागाला पाणी देऊन कायमचा दुष्काळ घालवण्याचे काम केले आत्ता नगरपंचायत भाजपाकडे द्या शहराचा कायापालट करू असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी मालक आमच्याकडे असल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढला. येथे नगरपंचायत निवडणुक प्रचार सभेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर,अमरसिंह देशमुख, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, ब्रह्मानंद पडळकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यु.टी. जाधव आणि नगरसेवकचे उमेदवार उपस्थित होते. मंत्री श्री. पाटील म्हणाले," 2014 मध्ये नरेंद्र मोदी झाल्यावर पहिल्या टप्प्यात मूलभूत सुविधा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अकरा कोटी शौचालय, तीन कोटी घरकुले दिली. 25 कोटी माणसं दारिद्र्यरेषेच्या वर आणली. 2019 ते 24 या दुसऱ्या टप्प्यात स्वाभिमानाचया गोष्टीं केल्या.राम मंदिर उभारले. 370 कलम रद्द केले. 2024 पासून तिसऱ्या टप्प्यात बेरोजगारी संपून देश आर्थिक महासत्ता बनवण्याचे काम सुरू केल". ते म्हणाले,"राज्यातील रखडलेल्या सिंचन योजनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट निधी देऊन सिंचन योजना मार्गी लावल्या. नगरपंचायतींना कचरा प्रक्रिया आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मिळतील." आमदार गोपीचंद पडळकर यांनी टेंभूला क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवाडी यांचे नाव देण्याची आणि आटपाडी तलावावर पर्यटन स्थळ बनवण्याची मागणी केली. विरोधकांनी लोकांच्या मालमत्तेवर अन्यकारक आरक्षणे टाकलीत.ती रद्द करण्याची ग्वाही दिली. अमरसिंह देशमुख यांनी भाजपमुळेच दुष्काळी भागाला पाणी मिळाल्याचा दावा केला. आटपाडी पासून शंभर किलोमीटर अंतरावर चार वेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते. त्यांनां दुष्काळ दिसला नाही. पण नागपुरातील देवेंद्र फडणवीस यांना दुष्काळ दिसला आणि तो संपवला. पाणी देऊन न्याय दिल्याने भाजप सोबत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी उमेदवार यु. टी.जाधव, राजेंद्र खरात यांची भाषणे झाली. यावेळी विलासराव काळेबाग , महेश देशमुख, रमेश कातुरे , दादासाहेब हुबाले , चंद्रकांत दौडे, विनायक पाटील आदी उपस्थित होते. चौकट -नगरपंचायत जिंकल्याचा आनंद आहेच पण त्याहीपेक्षा गोपीचंद आणि अमरसिंह दोघे एकत्र आल्याचा मला मोठा आनंद झाला आहे. भल्या भल्या माणसांचे प्रश्न सोडवण्याची मला देवी देणगी मिळाली आहे. दोघांनाही पुण्यात एकत्र बोलून पहिल्याच बैठकीत दोघांचा प्रश्न सुटला. नाहीतर विरोधकाने मिरवणूक काढली असती, असे देशमुख पडळकर यांच्या एकत्र येण्यावर मत व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते