मुख्य सामग्रीवर वगळा

आटपाडी, पंढरपूर मध्ये भाऊ-बहीण एकाच वेळी नगराध्यक्षपदाच्या रिंगणात

 आटपाडी ता.25- असे म्हणतात युद्धात, प्रेमात आणि निवडणुकीच्या आखाड्यात सर्वकाही माप असत. त्याचीच प्रचिती आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत काही प्रभागात आली आहे. अनेक प्रभागात रक्ताची नाती असलेले सख्खे चुलत भाऊ, सख्खी चुलत सासु- सून, चुलत जावा--जावा आणि चुलत चुलते- पुतणे यांनी एकमेकांच्या विरोधात शडडु ठोकला आहे. रक्ताच्या नात्यातील या लढतीने शहराचे लक्ष वेधले आहे.                    आटपाडी नगरपंचायत निवडणूकीचा आखाडा रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. नगरपंचायतीची ही निवडणूक भाजप, शिवसेना आणि तीर्थक्षेत्र विकास संयुक्त आघाडी अशी तिरंगी लागली आहे. सर्वच पक्षानी प्रत्येक प्रभागात उमेदवारी देताना अनेक गोष्टी तपासून दिल्या आहेत. एकमेकांच्या विरोधात तेवढ्याच ताकदीचे, त्याच त्या समाजाचे आणि त्यातही रक्ताचे नातं असलेल्या काही कुटुंबात परस्पराच्या विरोधात उमेदवारी दिली आहे.‌ उमेदवारी देताना तिन्ही गटाने डावाला डाव दिला आहे. त्यामुळे निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे.                         शिवाजी जाधव आणि ज्ञानू जाधव दोन नामवंत ठेकेदार सख्खे भाऊ आहेत. दोघांनीही त्यांच्या मुलांना एकमेकांच्या विरोधात उभा केले आहे. शिवाजी जाधव यांनी मुलगा अजित याला भाजपातून तर  ज्ञानू जाधव यांनी मुलगा दत्तात्रय यांला शिवसेनेतून प्रभाग तेरा मध्ये एकमेकांच्या विरोधात आखाड्यात उतरवले आहे. प्रभाग 14 मध्ये आशीच रंगतदार लढत लागली आहे. या प्रभागातील कधी काळी जिवलग मित्र असलेले अनिल पाटील आणि दत्तात्रय पाटील चुलत भाऊ आहेत. अनिल पाटील यांनी पत्नी संध्या यांना राष्ट्रवादीतून तर दत्तात्रय पाटील यांनी आई सुभद्रा यांना शिवसेनेतून उभा केले आहे. इथे चुलत सासू सूनेची लढत लागली आहे. दोघींनीही जोरदार प्रचार सुरू केला आहे.                  प्रभाग आठ मध्ये शिवसेनेने निशिगंधा शरद पाटील यांना तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीने जयश्री बाळासाहेब पाटील यांना एकमेकींच्या विरोधात उभा केले आहे. निशिगंधा पाटील आणि जयश्री पाटील या चुलत जावा आहेत.    तर प्रभाग तीन मध्ये  शिवसेनेने अमरसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर चुलत चुलते डॉ. श्रीनाथ पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून पुतण्याला आव्हान दिले आहे. या चुलत्या पुतण्याच्या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.       एकमेकांच्या विरोधात नात्यातील उमेदवार उभा राहिल्याने त्या प्रभागातील त्यांच्या नातेवाईकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. अनेक मतदारांना दोन्ही उमेदवारांशी तेवढेच जवळचे नाते आणि स्नेहसंबंध निर्माण केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते