मुख्य सामग्रीवर वगळा

तिर्थक्षेत्र संयुक्त आघाडीच सक्षम पर्याय -- देशमुख, पाटील

आटपाडी - भाजपाकडे शिव्या देणारी तर शिवसेनेकडे नगराध्यक्षासाठी अर्ज भरू देणारी दमबाजी करणारी मंडळी आहेत. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जाणारी तीर्थक्षेत्र संयुक्त आघाडीने सक्षम चागला पर्याय दिल्याने संयुक्त आघाडीचीच नगरपंचायतीवर सत्ता येणार असल्याचा दावा माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि भारत पाटील यांनी केले.                     तीर्थक्षेत्र संयुक्त विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौरभ पाटील यांना सोबत घेऊन माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी घर टू घर प्रचार सुरू केला आहे. शिवाय सौरभ पाटील यांनी भिंगरी लावून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालला आहे. त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.    या दरम्यान, माजी आमदार श्री. देशमुख यांनी माध्यमाशी बोलताना आम्ही वर महायुतीत असलो तरी खाली भाजप आणि शिवसेनेची जुळत नाही. भाजपचे कार्यकर्ते शिव्या देणारे तर व्यापाऱ्याला दमबाजी करून उमेदवारी अर्ज भरू न देणारी सेना असल्याचे सांगितले.  तर भारत पाटील यांनी विरोधकांनी निवडणूक खिलाडू वृत्तीने खेळावी मात्र पराभव दिसू लागल्यामुळे दमबाजी आणि दादागिरीचा प्रयत्न चालवला आहे. सुरू असलेली कामे अत्यंत निकृष्ट करून भ्रष्टाचार चालला रस्त्याच्या कामात मुरमा ऐवजी गाळ भरला आहे. भ्रष्टाचार हद्यपार करून पारदर्शी कारभार आमचे ध्येय आहे. विकास आराखड्याच्या नावाखाली सूडबुद्धीने सर्वसामान्यांच्या मालमत्तेवर आरक्षण टाकले आहे. विरोधकांनी नगरसेवकसाठी कुणबी मधून अगोदर अर्ज भरला त्यामुळे आमच्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. सर्व जाती धर्मा आणि अल्पसंख्याक लोकांना सोबत घेऊन जाण्याची आमची मूळची भूमिका आहे. विरोधकासारखी अन्याय करणारी नाही." यावेळी सौरभ पाटील , आनंदराव पाटील , मुरलीधर पाटील ,अशोक लवटे आदी उपस्थित होते .        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते