आटपाडी : आटपाडी जिल्ह्याचे केंद्र बनवण्याच्या दृष्टीने व्यापक आराखड्याची रचना बनवली आहे. राज्यात पहिल्या दहा नगरपंचायतीमध्ये आटपाडी नगरपंचायत विकास कामात आणणार असल्याचा निर्धार जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी केला. आटपाडी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ मापटेमळा येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी अमोल मोरे माजी उपसभापती भागवत माळी नगराध्यक्ष उमेदवारावसाहेब सागर राजेश सातारकर पंढरीनाथ नागणे आप्पासाहेब माळी बिरदेव खांडेकर दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले,"सांगली जिल्ह्यात सांगली नंतर सर्वाधिक क्षेत्रफळ आटपाडी नगरपंचायतीचे आहे. आटपाडी मापटेमळ आणि भिंगेवाडी एवढा मोठा पसारा कोणत्याही नगरपालिका, नगरपरिषदेला नाही. भविष्यात आटपाडी जिल्ह्याचे केंद्र करण्याचे माझे ध्येय आहे. दृष्टीने जिल्हा उपरुग्णालय, नाट्यगृह, 84 कोटीची सौरऊर्जावरची पाणी योजना यासारखी कामे उभारली आहेत. शहराला जोडणारे चारही बाजूचे प्रशस्त मोठे रस्ते बनवलेत. भव्य पोलीस ठाणे पंचायत समिती आणि बांधकाम विभागाची टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. नगरपंचायत इमारतीसाठी पंधरा कोटी निधी मंजूर झाला असून व्हाईट हाऊस सारखा त्याचा आराखडा बनवला आहे. शहराभवती प्रशस्त रिंग रोड, त्यानंतर 80 फूट, साठ फूट आणि सर्वात लहान वीस फूट रस्त्याचा आराखडा बनवला आहे. प्रशस्त क्रीडांगण, गार्डन, बाजार, भाजीपाला मार्केट, मच्छी मार्केट उभारण्याच्या दृष्टीने आराखडा बनवला आहे. येलो झोन, ग्रीन झोन बनवले आहे. माझ्या स्वतःच्या मालमत्तेवर सात ठिकाणी आरक्षण पडले आहे. काही मोठ्या लोकांच्या किरकोळ जागेवर आरक्षण पडले आहे. आरक्षण थोड्या जागेवर पडेल मात्र त्यातून होणाऱ्या विकास कामामुळे राहिलेल्या जागेचे पाच ते दहा पट मूल्य वाढणार आहे. जुने विचार डोक्यातून काढून टाका आटपाडी प्रशस्त मोठे शहर बनवू. मला आटपाडी नगरपंचायत राज्यात पहिल्या दहा मध्ये बनवायची आहे. त्यासाठी सत्ता देण्याचे अहवान केले. ते म्हणाले,"झालेली कामे, सुरू असलेली आणि मंजूर असलेली कामे करण्याचे विरोधक भाषणातून आश्वासन देता आहेत. ते देत असलेली कामे कधीच मार्गी लागलेली आहेत याची त्यांना माहिती नाही. यावेळी नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार गुरूप्रसाद कवडे आणि रासपाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित गलांडे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा