आटपाडीत नगरपंचायतीच्या निवडणुक प्रचार सभेत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या भाषणात मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न दिसणारा पण न सोसणारा बारीक चिमटा काढला. "राजाच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी मालक देवेंद्र फडवणीस आमच्याकडे आहे. कधी, कुठे, किती कशासाठी निधी द्यायचा ते ठरवतात." असा टोला मारला. केंद्रात आणि राज्यात भाजप राष्ट्रवादी शिवसेनेची युती आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथे युती नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांना शिव्या देऊ नका, असं स्पष्ट सांगितल आहे. तरीही त्यांनी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे अस म्हटलं त्याला आम्ही तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे,अस म्हणून चिमटा काढला.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा