मुख्य सामग्रीवर वगळा

स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता निखारा- क्रांतिसिंह

स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता निखारा -क्रांतीसिंह नाना पाटील;म्हणजेच स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील धगधगता अंगार. जुलमी ब्रिटिश राजवटीला अहवान देणारे नाव म्हणजेच क्रांतिसिंह नाना पाटील. त्यांच्या लढ्याची आजच्या तरुण पिढीला माहिती व्हावी आणि त्यातून प्रेरणा मिळाली यासाठीच हा लेखन प्रपंच मांडला आहे. ब्रिटीशांना सळो की पळो करून नीरा काठ पासून ते कृष्णा, वारणा नद्यांचा खोऱ्यात प्रतिसरकार अर्थात पत्री सरकार स्थापन केले. प्रतिसरकार अर्थात पत्री सरकार म्हणजे ब्रिटिशांचे सरकार मान्य नसून इथल्या लोकांच्यासाठी ब्रिटिशांच्या विरोधात उभारलेले प्रति सरकार होते.गोऱ्यांच्या गुलमी आणि अत्याचारी कारभारा विरोधात देशात वणवा पेटला होता. त्यावेळी यात क्रांतिसिंह नाना पाटील आघाडीवर होते. ब्रिटिशच्या विरोधात 9 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीसिंह नाना पाटील यांनी आपल्या सवंगड्यांना आणि देशभक्तांना सोबत घेऊन प्रति सरकारची स्थापना केली. ज्याला आपण "पत्री सरकार" म्हणूनही ओळखतो. भूमीगत चळवळीच्या माध्यमातून ब्रिटिशांना त्यांनी आव्हान दिले होते. ब्रिटिशांनी उभारलेली संदेशाच्या देवाणघेवाणीची यंत्रणा उध्वस्त करणे, पोलीस ठाण्यावर हल्ले करणे यासारखे अनेक लढे दिले. खरेतर नानांना ब्रिटिशांनी नोकरी दिली होती मात्र त्यांनी या नोकरीला लाथ मारून स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. सांगली जिल्ह्यातील येडेमच्छिंद्रगड हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मगाव. 3 ऑगस्ट 1900 रोजी नाना पाटील यांचा जन्म. स्वातंत्र्यपूर्व काळात येडे मच्छिंद्रगड; गाव दक्षिण सातारा जिल्ह्यात होते. नाना पाटील भारदस्त आणी धिप्पाड शरीरयष्टी होती. ब्रिटिशांनी त्यांना मराठ्यांची नोकरीत दिली होती. 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी संबंध देशभर सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली होती.नाना पाटील यांनी आपल्या तलाठी पदाचा राजीनामा देऊन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. त्यानंतर 1942 पर्यंत क्रांतिसिंह नाना पाटील यांना आठ ते नऊ वेळा तुरूंगात जाव लागल.वारकरी संप्रदायाचा पगडा असणाऱ्या नाना पाटील यांच्याकडे लक्षवेधी वक्तृत्वशैली होती. त्या जोरावर ग्रामीण भागात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी जागृती केली. आपल्या भाषणातून गाव गाड्यातल्या प्रत्येकाला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास त्यांनी प्रेरित केले. त्यामुळे जुलमी ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढवय्ये नेतृत्व म्हणून नाना पाटील झाले. 1940 च्या दरम्यान संपूर्ण देशभरात क्रांतीची लाट उसळली होती. "चले जाव" चळवळ सुरू झाल्यावर देशातील अनेक नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. याच दरम्यान सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इंग्रज सरकारच्या जुलमी राजवटी विरोधात बंड पुकारले. ब्रिटिश सरकारला समांतर शासन यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेत "आपल्या देशाचा आणि आपला कारभार आपणच करू " या संकल्पनेतून 9 ऑगस्ट 1942 च्या दरम्यान नाना पाटील यांनी "प्रति सरकार"ची स्थापना केली. जवळपास नीरा नदी काठापासून ते कृष्णा वारणा या नद्यांच्या खोऱ्यात 1500 गावात प्रतिसरकारचा कारभार सुरू होता.त्यांनी ब्रिटिशांना आव्हान देण्यासाठी तुफान सेनेची स्थापना केली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी गावागावातला तरुण गोळा केला.प्रतिसरकारच्या माध्यमातून नाना पाटील दरोडेखोर, सावकारी करणारे जमीनदार, जुलमी ब्रिटिश आणि गावगुंडांच्या विरोधात लढण्यासाठी "तुफान सेने"ची सैन्य दल स्थापन केले. त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त केला जात. या शिवाय सरकारच्या रेल्वे, पोस्ट सेवांवर हल्ले करून नामोहरम केले. ब्रिटिश सरकारचा खजिना लुटण्याचे काम तुफान सेनेच्या माध्यमातून केले जात. त्यांना पकडण्यासाठी अनेक बक्षिसे ब्रिटिशांनी लावली होती मात्र क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पत्ता ब्रिटिशांना लागला नाही. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था निर्माण केली होती. अन्नधान्य पुरवठा असेल किंवा कोणत्याही स्वरूपाची मदत या प्रतिसरकारच्या माध्यमातून होत. त्यामुळे नाना पाटील यांना गावागावातून दीनदुबळ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यांच्या भूमिगत चळवळीला गावागावातून रसद मिळत. इतकेच नव्हे तर नाना पाटील यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने अनेक बक्षीसही जाहीर केली. पण कोणत्याही प्रकारची माहिती ब्रिटिश सरकारला नाना पाटलांची मिळू शकली नाही. नानाचे घर आणि जमीन ब्रिटिशांनी जप्त केले होते. 1942 ते 1946 पर्यंत क्रांतिसिंह नाना पाटील ते भूमिगत होते. त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने जंगजंग पछाडले. पण त्यांना ब्रिटिश पकडू शकले नाहीत.---लेखक नागेश गायकवाड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते