मुख्य सामग्रीवर वगळा

मराठी साहित्य परिषदेचा उत्कृष्ट शाखा पुरस्कार आटपाडी शाखेला प्रदान

आटपाडी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येथील शाखेला पुणे येथे साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून "राजा फडणीस उत्कृष्ट शाखा" या पुरस्काराने सन्मानित केले.  महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे अध्यक्ष विवेक सावंत, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येथील शाखेने अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना प्रदान केला.                                         पुणे येथे डॉ. माधवराव पटवर्धन सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी नामवंत लेखक अच्युत गोडबोले , साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलींद जोशी, डॉ. शमशुद्दीन तांबोळी, साहित्यिक सुभाष कवडे आणि वाचन आकलन उपक्रमाचे कार्यवाह दिनेश देशमुख उपस्थित होते.  महाराष्ट्रात साहित्य परिषदेच्या 350 वर शाखा असून यातून उत्कृष्ट शाखा पुरस्कार म्हणून आटपाडी शाखेची निवड करूध गौरव करण्यात आला. साहित्य संमेलन, विविध पुस्तक प्रकाशने, दरवर्षी अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचे मार्गदर्शनपर व्याख्यान असे अनेक साहित्यिक उपक्रम राबवले जातात. तसेच यंदा श्रीमंत कै. बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त "एक लाख पुस्तके वाचन व आकलन" उपक्रम प्रभावीपणे राबवला होता. त्याची दखल घेऊनच पुरस्काराने गैरव केला.  'दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे', ही म्हण आटपाडी शाखेने प्रभावीपणे प्रत्यक्षात राबवली आहे. समाजाचा तळ जागृत व सुसंस्कारित करण्यासाठी केलेले काम महाराष्ट्राला दिशा देईल असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. " पुण्यात साहित्य शारदेच्या प्रांगणात झालेला हा सन्मान गदीमा, शंकरराव खरात ,व्यंकटेश तात्या या साहित्य शिरोमणीचां वारसा पुढे नेणारा आहे. हे काम इथुन पुढे देखील जोमाने पुढे घेऊन जाणार असल्याचे मत अमरसिंह देशमुख यांनी व्यक्त केले. कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यांनी आभार मानले.            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते