मुख्य सामग्रीवर वगळा

आटपाडी बाजार समितीचे नूतन कारभारी विकासाचे शिवधनुष्य उचलणार?

आटपाडी बाजार समितीत स्थापनेपासून यावेळी पहिल्यांदाच मतदारांनी सत्तांतर घडवली आहे. स्वच्छ, पारदर्शी कारभाराबरोबरच बाजार समिती विकसित करण्याच्या अपेक्षाचे शिवधनुष्य नवीन कारभाऱ्यांकडे आले आहे.                                                           खानापूर पासून स्वतंत्र करून आटपाडी बाजार समिती स्थापन झाल्यापासून यावेळी पहिल्यांदाच ऐतिहासिक मतदारांनी सत्तांतर घडवली आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याकडून जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि काँग्रेस व रासपकडे सत्तांतर झाले आहे. निवडणूक अटीतटीची झाली. बाजार समितीचे सभापती आणि उपसभापतींच्या निवडी पार पडल्या. सत्तांतरानंतरचा आनंदोत्सव साजरा केला. आत्ता नवीन कारभाऱ्यांना कामाला लागावं लागणार आहे. कारण त्यांच्याकडून मतदारांच्या अपेक्षा असल्यामुळे मतदारांनी सत्तेवर बसवला आहे.                       आटपाडी बाजार समिती डाळिंबाचा सौदे बाजार,शेळ्या मेंढ्याचा आठवडा बाजार आणि खिलार जनावरांची यात्रा यासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. बाजार समितीचे करगणी, दिघंची, झरे आणि खरसुंडी येथे उपबाजार केंद्र आहेत. दोन पेट्रोल पंप ही आहेत. बाजार समितीचे चांगले उत्पन्न आहे. आटपाडीची बाजार समिती विकसित करण्याची मोठी संधी आणि वाव आहे. निवडणुकीच्या प्रचारात तात्कालीन सत्ताधाऱ्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. त्यामुळे लोकात यावर चर्चाही झाल्या. आत्ता नवीन सत्ताधाऱ्यांना स्वच्छ आणि पारदर्शी कारभार पहिल्यांदा करून दाखवावा लागणार आहे. विकासाच्या दृष्टीने राज्य शासन आणि पणन महामंडळाच्या विविध योजनेतून बाजार समिती विकसित करावी लागणार आहे. आटपाडीचे मटण प्रसिद्ध आहे. शेळ्या मेंढ्यांची मोठी संख्या आहे. शेळ्या मेंढ्याच्या बाजाराच्या जागेचा प्रश्न गंभीर आहे. त्यावर योग्य तोडगा काढण्याची गरज आहे. सध्या तिथे शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची कसलीही सोय नाही. ती उभारण्याची गरज आहे. या आटपाडीच्या चवदार मटणाचा "ब्रँड" करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत यावर अभ्यास करून काम करण्याची गरज आहे.                        डाळिंबाचा सौदे बाजाराचा नावलौकिक आहे मात्र लिलावात खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. परिणामी खरेदीसाठी स्पर्धा कमी होऊन भाव कमी मिळतो. पहिल्यांदा मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बेंगलोर आशा भागातील व्यापाऱ्यांना डाळिंब खरेदीसाठी प्रोत्साहन देऊन आणावं लागणार आहे. शेतकऱ्यासाठी निवासस्थान नाही. शेतकऱ्यासाठी पहिल्यांदा सर्व सोयी सुविधा नियुक्त निवासस्थान उभारण्याची गरज आहे. तसेच डाळिंब घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी  माफक दरात भोजन केंद्राचीही गरज आहे. याशिवाय बाजार समितीच्या आवारही विकसित करण्याची गरज आहे.         आटपाडी तालुक्यात खिल्लार जनावरांच्या वर्षातून तीन यात्रा होतात. दिवसेंदिवस या यात्रा मोडकळीस येऊ लागले आहेत. त्यांना पुन्हा उर्जित अवस्थात आणण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.                याबाबत सभापती संतोष पुजारी म्हणाले,"मतदारांनी ज्या अपेक्षेने सत्ता दिली आहे. ती 100% पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करू. बाजार समितीमध्ये निश्चित मोठा बदल शेतकऱ्यांना दिसेल."            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते