मुख्य सामग्रीवर वगळा

मराठी साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट शाखा पुरस्कार या शाखेला

नागेश गायकवाड--- मराठी साहित्य क्षेत्रात सातत्यपूर्ण सक्रिय असलेल्या येथील मराठी साहित्य परिषद शाखेला राज्यस्तरीय उत्कृष्ट शाखा पुरस्कार आज जाहीर झाला. या शाखेने गतवर्षी _एक लाख पुस्तक वाचन आणि आकलन" या राबवलेल्या उपक्रमाची मराठी साहित्य परिषदेने दखल घेतली. आटपाडीला मराठी साहित्य आणि साहित्याची मोठी परंपरा आणि वारसा लाभलेला आहे. आटपाडीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, ना.स. इनामदार, डॉ. शंकरराव खरात यांच्या रूपाने साहित्य संमेलनाला अध्यक्ष दिलेत. त्यांच्यानंतरच्या कालखंडात मराठी साहित्य लेखनाची परंपरा आटपाडीने कायम जोपासली आहे. नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आणि त्यांचे पुस्तके प्रकाशित करण्याच्या दृष्टीने आटपाडीत मराठी साहित्य परिषदेची शाखा गेली 25 वर्षे अखंडपणे सुरू आहे. आटपाडी तालुका मराठी साहित्य परिषदेच्या शाखेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख आहेत. ते शाखेच्या माध्यमातून दरवर्षी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवलेल्या लेखकाचे व्याख्यान आयोजित करतात. याशिवाय लहान मोठी साहित्य संमेलने होतात. तसेच मराठी साहित्य परिषदेच्या येथील शाखेने तालुक्यातील नवोदित साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित केले आहेत. गतवर्षी मराठी साहित्य परिषदेच्या येथील शाखेने "एक लाख पुस्तक वाचन आणि आकलन" उपक्रम राबवला होता. या उपक्रमामध्ये देशभरातून आणि परदेशातून मराठी वाचकांनी सहभाग घेतला होता. अवघ्या अकरा महिन्यांमध्ये एक लाख पुस्तके वाचून त्याच्या नोंदी केलेल्या वही शाखेकडे जमा केल्या होत्या. त्याची दखल घेऊन मराठी साहित्य परिषदेने परिषदेच्या 118 व्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट शाखा पुरस्कार म्हणून आटपाडी शाखेला जाहीर केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते