मुख्य सामग्रीवर वगळा

ईडीच्या रडारवर जयंत पाटील,,,अन् राष्ट्रवादीचा भाजपावर निशाणा

"ईडी"च्या रडारवर जयंत पाटील अन राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा                                                "ईडी " म्हणजेच सक्तवसुली संचालनालय हा शब्द शहरापासून गाव गाड्या पर्यंत आणि लहान पोरापासून आबाल वर्धापर्यंत चांगलाच परिचित झाला आहे. कारण नावाप्रमाणेच काम असल्याने चर्चेत आहे. या ईडीने भल्याभल्यांना दिवसा चांदण्यात दाखवल्या आहेत. आता ईडीचा कारभार कसा चालतो? कोणाच्या इशारावर चालतो?, कशासाठी वापर केला जातो? हे काय गुपित राहिलेले नाही. त्यामुळेच ईडीची बदनामीही तेवढीच मोठी झाली आहे. अश्या या ईडीच्या रडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आले आहेत,,,,.     "आयएल अँड एसएफ" प्रकरणात सत्यवसुली संचालनालयाने जयंत पाटील यांना दोन वेळा नोटीस दिली. पहिल्यांदा कामामुळे ते हजर राहू शकले नाहीत. तसं त्यांनी कळवले होते म्हणे. लागोलाग लगेच दुसरी नोटीसी पाठवली. यावेळी मात्र ते चौकशीला हजर झाले. त्यांची साडेनऊ तास चौकशी झाली. या चौकशीत जयंत पाटील यांनी एक अर्ध पुस्तक वाचून काढल,,,,.                       ईडीच्या रडारवर यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक दिग्गज मंडळी आली होती. यातील नवाब मलिक अजून आत मध्येच आहेत. तर छगन भुजबळ आणि अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आलेत. हसन मुश्रीफ यांनीही ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आता या ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर नेम धरला आहे.                               राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे राजीनामा नाट्य फसले आणि त्यासाठी देव पाण्यात घातलेल्या अनेकांचे मनसुबे धुळीला मिळाले. त्यांनी राजीनामा माघारी घेतल्यामुळे भाजपच्या नेतेमंडळींचा आणखी एक डाव फसला. इकडे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा दुसऱ्यांदा तोंडावर पडले. खऱ्या अर्थाने दादा नव्हे भाजपच फसले,,, दोनदा फसल्यानंतर भाजपाने तिसरा डाव टाकायला सुरुवात केली आहे. खरं तर अशा प्रकारातून पक्षाची जनमानसात प्रतिमा खराब होत चालली आहे पण भाजपच्या नेते मंडळींना त्याच्याशी काहीही देण घेण नाही. फोडा, झोडा आणि राज्य करा हाच पॅटर्न भाजपने राबवला आहे.                                  सध्या महाविकास आघाडीने चांगलीच मजबूत वज्रमुठ बांधली आहे. भाजपच्या विरोधात मिळेल तिथे संधी सोडत नाहीत. बऱ्यापैकी राष्ट्रवादीचे नेतेमंडळी भाजपाला शह देताना दिसत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. ऐनकेन प्रकारे भाजपला राष्ट्रवादी शह देण्याचा प्रयत्न करते आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पश्चिम महाराष्ट्र मानला जातो. सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसला दुबळे करण्याच्या दृष्टीने भाजपाने दिग्गज नेते मंडळीवर नेम धरला आहे. त्यामुळेच ईडीच्या रडारवर  जयंत पाटील आलेत. सध्या राष्ट्रवादीत जयंत पाटील यांची स्वच्छ आणि अभ्यासू नेतृत्व अशी प्रतिमा आहे. पक्षाचा जनमानसातील चेहरा म्हणून पुढे येताना दिसू लागलेत. भलेही त्यांचे अजितदादाशी फारसं जमत नसलं तरी शरद पवार यांचे जवळचे आणि विश्वासू मानले जातात. त्यांना मानणारा पक्षात मोठा वर्ग आहे. पक्ष बांधणे आणि वाढवण्याच्या दृष्टीने चाणाक्ष नेतृत्व म्हणून ते ओळखले जातात. अशा परिस्थितीत जयंत पाटील यांना त्यांच्याच कामात चौकशीच्या फेऱ्यात गुंतवून ठेवण्याची खेळी आणि डाव भाजपाने टाकला आहे. मात्र हसन मुश्रीफ यांच्यासारखेच जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्यानंतर पडसाद उमटलेत. गावगाड्यातील कार्यकर्ते घराबाहेर पडले. निदर्शने केली. चौकशीच्या दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईपासून गाव गाड्या पर्यंत निदर्शने केली. आता ईडीला हे काही नवीन राहिलेले नाही पण राष्ट्रवादीला पुन्हा एकदा   भाजपाने आयताच नवीन बुस्टर मिळवून दिला आहे. ईडीची नोटीस आणि निदर्शने आणि चौकशी याचे परिणाम काय दिसतात?, यावर ईडी आणि राष्ट्रवादीची पुढची पावली पडताना दिसतील.                    ( लेखक- नागेश गायकवाड).   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते