येथील बंद असलेल्या माणगंगा साखर कारखान्याच्या अस्तित्वाची निवडणूक राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत होण्याची चिन्हे आहेत. कारखान्यातील सत्ताधारी आणि विरोधी गट राज्यात एकत्र सत्तेत असल्यामुळे कारखान्याचे रणांगण लागणार की समझोता होणार, ते 31 मे रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. त्याकडे लोकांच्या नजरा लागल्या आहेत. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी उभारलेला माणगंगा साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम 1986 मध्ये झाला होता. त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये ही बाहेरून ऊस आणून कारखाना चालू ठेवला होता. भीषण दुष्काळाच्या काळात दहा वर्षे कारखाना बंद राहिला होता तर 27 वर्षे कारखाना चालू होता. गेल्या पाच वर्षापासून कारखाना बंद आहे. जिल्हा बँकेने थकीत कर्जाच्या पोटी बँकेचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. सध्या कारखाना बँकेच्या ताब्यात असून कारखान्याची निवडणूक लागली आहे. सत्ताधारी गटाचे भाजपचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांच्या तुल्यबळ लढतीचे स्पष्ट संकेत आहेत. एकूण 17 जागेसाठी 76 उमेदवारी अर्ज छाननीनंतर शिल्लक राहिले आहेत. उद्या 31 मे रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर लढतीचे अधिकृत चित्र स्पष्ट होणार आहे. दोन्ही गटांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून सभासद शेतकऱ्यात खळबळ उडाली आहे. प्रत्येक गावागावात आणि पारावर कारखान्यावर चर्चेच्या फेरी झडू लागल्या आहेत. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि विरोधी गटाचे तानाजीराव पाटील यांनी सभासद शेतकऱ्यांच्या गाठीभेटी सुरू केले आहेत. त्यामुळे वातावरण अधिक तापले आहे. सध्या भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत एकत्र आहेत. इथे मात्र या दोन गटातच कारखान्याची लढत होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटात समझोता घडवण्याच्या दृष्टीने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. दोन्ही गटाने कारखाना सभासदांचा ठेवून चालू करण्याचा निर्धार केला आहे. या दोन्ही गटांमध्ये लढत होणार की समझोता होणार हे अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी बुधवारी 31 मे रोजी स्पष्ट होणार आहे. शेतकरी आणि सभासदांचे लक्ष त्याकडे लागले आहे. टेंभू योजनेचे पाणी आल्यामुळे ऊसाखाली क्षेत्र वाढत चालले आहे. मात्र लावलेल्या उसाचे करायचं काय?, असा प्रश्न कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे. कारखाना बंद असल्यामुळे ऊस लागवडीलाही ब्रेक लागणार आहे. गावाकड यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची कारखाना सुरू व्हावा आणि तो शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा एवढीच माफक अपेक्षा आहे. मग तो कारखाना कसा चालू होणार?, कोण चालवणार याच्याशी देण घेण नाही. निवडणुकीच्या निमित्ताने कारखाना सुरू करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासोबतच शेतकऱ्यांची देणे आणि कामगारांचे देणे हे प्रश्नही चर्चेत आलेत. सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटांनी कारखाना पुन्हा सुरू करण्याचा निर्धार आणि संकल्प सभासदांच्या समोर गाठीभेटीत केला आहे. त्यामुळे कारखाना सुरू होईल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. *-- जागा-१९. अर्ज-७६. सभासद - १०५.०५. मृत सभासद-५५००. अर्ज माघारीची मुदत-३१ मे. सभासद- आटपाडी, सांगोला आणि माण तालुका.*
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा