संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आटपाडी बाजार समितीच्या सभापती पदावर शिंदे गटाच्या शिवसेनेचे संतोष पुजारी आणि उपसभापती पदावर काँग्रेसचे राहुल गायकवाड यांची दहा विरुद्ध आठ मताच्या फरकाने निवड झाली. शिवसेना, काँग्रेस आणि रासप आघाडीने नऊ तर सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत नऊ जागेवर विजय मिळवला होता. त्यामुळे गुप्त झालेल्या मतदानात सेनेने बाजी मारली. आटपाडी बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे स्थापनेपासून निर्विवाद वर्चस्व राहिले होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी काँग्रेसचे जयदीप भोसले आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरगर यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली होती. तर सत्ताधारी गटाने माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्याशी आघाडी करून निवडणूक लढवली होती. विरोधकांनी सत्ताधार्यांना तगडे आव्हान दिले होते. सत्ताधारी आणि विरोधी गटाला समान नऊ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदावर कोण विराजमान होणार?, याची उत्सुकता लागली होती. निवडणूक निकालानंतर सत्ताधारी गटाने त्याच रात्री निवडून आलेल्या संचालकांना अज्ञात स्थळी हलवले होते. सर्वांचे फोन बंद होते. तर विरोधी गटाने निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आपले नूतन सदस्य बाहेर ठेवले होते. आज तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड पार पडली. सत्ताधारी भाजप आघाडीने सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख आणि उपसभापती पदासाठी दादासाहेब हुबाले यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले तर शिवसेना आघाडी कडून सभापती पदासाठी संतोष पुजारी आणि उपसभापती पदासाठी राहुल गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दोन्ही गटाने उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुप्त मतदान घेण्याची प्रक्रिया राबवली. भाजप आघाडीचे नऊ सदस्य एका बाजूला आणि शिवसेना आघाडीचे नऊ सदस्य दुसऱ्या बाजूला बसले होते. मतदान झाले तरीही कोणालाही कसला आहे अंदाज लागला नव्हता. बाहेर लोकांची उत्सुकता ताणली होती. प्रत्यक्षात मतमोजणी झाल्यानंतर सेनेच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या उमेदवारांना दहा मते पडली तर भाजप आघाडीच्या उमेदवारांना आठ मते पडली. निवडणूक निकाल जाहीर केल्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्यांनीतुफान फटाक्याची आतषबाजी करून एकच जल्लोष केला. आटपाडी पेठेतून मिरवणूक काढली. आटपाडी बाजार समितीत सत्तांतर करून तानाजीराव पाटील यांनी पहिल्यांदाच ताब्यात घेतली. भाजप आघाडीकडून सभापती पदासाठी बरेच जण इच्छुक होते. यामध्ये नेते मंडळींनी लक्ष घालून समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना यश आले नाही ते मतमोजणीनंतर दिसून आले. तर शिवसेनेकडे ही सभापतीपदासाठी काहीजण इच्छुक होते मात्र त्यांच्या एकमत झाल्याने त्यांनी बाजी मारली.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा