आटपाडी ता.१६-आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची निवड गुरुवार ता. 18 मे रोजी होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटाने समान नऊ जागा मिळवल्याने निवडीत बाजी कोण मारणार?, या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची झाली होती. बाजार समितीची सत्ता आजपर्यंत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याकडे राहिली होती. यावेळी माजी आमदार श्री. देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि राष्ट्रवादीने आघाडी करून लढवली होती. तर त्यांना जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यानी काँग्रेसचे जयदीप भोसले आणि रासपचे लक्ष्मण सरगर यांना सोबत घेऊन शिंदे गटाची शिवसेना, काँग्रेस आणि रासप अशी आघाडी करून सत्ताधाऱ्यांना तगडे आव्हान दिले होते. या निवडणुकीत सत्ताधारी गटाला नऊ आणि विरोधकांना नऊ अशा समान जागा मिळाल्या. निवडून आलेले सदस्य अत्यंत कमी मताच्या दोन, पाच, सात, दहा या फरकाने निवडून आले आहेत. निकाल लागल्यानंतर दोन्ही गटाला समान जागा मिळाल्याने त्याच दिवशी नूतन संचालकांना अज्ञात स्थळी हलवले आहे. दोन्ही गटाला सदस्य फुटाफुटीची भीती असल्यामुळे दक्षता घेतली आहे. बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड गुरुवार ता. 18 मे रोजी होणार आहे. या निवडीची उत्सुक शिगेला पोचली आहे. सभापती आणि उपसभापतीची नावे कोणीच जाहीर केलेली नाहीत. नावाची गुप्तता पाळली आहे. निवडीत कोण बाजी मारणार?, मतदान होणार का? झाले तर गुप्त की उघड होणार?, समान मते पडल्यास निवड कशी होणार?, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा