ईडीकडून आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात खोटी कारवाई केली जात असल्याच्या निषेधार्थ आणि ईडीला पुढे करून विरोधकांची मुस्कटदाबी केली जात असल्याच्या निषेधार्थ येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानी ईडी आणि भाजपाचा तीव्र निषेधाचे आंदोलन केले.
पोलीस ठाण्याजवळील मुख्य चौकातील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन केले. त्यानंतर आंदोलकांनी तहसील प्रशासनाला निवेदन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते रावसाहेब पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सुरज पाटील, राष्ट्रवादी महिला च्या जिल्हा उपाध्यक्षा अनिता पाटील, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय यमगर, विकासराव देशमुख, ओबीसी सेल अध्यक्ष जालिंदर कटरे, राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष किशोर गायकवाड, संपतराव पाटील, साहेबराव कदम, मुन्ना मुलाणी, वसंतराव जगताप, राजेंद्र सावंत, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष ऋषिकेश गुरव, विशाल जाधव,दीपक पाटील, युवक तालुका सरचिटणीस नितीन डांगे, प्रशांत मोटे, दत्तात्रय रावळ, मनोज भोसले, रवींद्र लांडगे, हणमंत चव्हाण, अतुल जावीर, संजय पुजारी , विजय सरगर , ऋषिकेश पाटील, समाधान भोसले, प्रशांत गाढवे, तुकाराम चव्हाण, आशिष जाधव, बाळासाहेब चव्हाण आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
आम्हां सर्वांचे प्राणप्रिय नेते, माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार श्री . जयंतराव पाटील साहेब यांची बदनामी करण्याच्या हेतूनेच सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) त्यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे.
विरोधकांची मुस्कुटदाबी करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा सुरु असलेला दुरुपयोग भाजपा सरकारला देशातून आणि राज्यातून हद्दपार करण्याचा निर्धार आंदोलकानी केला. "सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है," अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. )्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा