मुख्य सामग्रीवर वगळा

वाचा चाळीस वर्षांपूर्वीची लग्न

नागेश गायकवाड तीस चाळीस वर्षांपूर्वीची लग्न म्हणजे अख्या गावाचा एक मोठा उत्सवच होता. एक महिना अगोदर लग्नाची तयारी चालायची. हाय नाई तेवढं पाहुणे लग्नाला मुक्कामाला यायची. एक महिना अगोदरच बस्ता काढायचा. काय तो बस्ता असायचा गावभर चर्चा व्हायची. एक आयरन नवरीच्या माणसानी काढायचा तर दुसरा नवऱ्याच्या माणसानी काढायचा. ही रिक्षा लागायची कापड भारी काढायची. इन, इवाय, मामाचा पोशाख. कान पिळकी,आजचीरच लुगडं काय काय लय असायचं. लग्नाच वराड घेऊन जाणाऱ्यासाठी अगोदरच बैलगाड्या तयार ठेवायच्या. बैलाला एक महिना अगोदरच गव्हाच्या कणकीचे गोळे चालून लठ्ठ आणि देखणी करायची. लग्नाच्या चार दिवस अगोदरच सारा गोतावळा गोळा व्हावा. तडम ताशाच्या वाद्याच्या गजरात गावदेव आदल्या दिवशी निघायचा. वराड आणायला आदल्या दिवशी मुरळी पाठवायचा. लग्नामध्ये आहेर केल्यानंतर माईकवरून पुकारायची पद्धत होती. अमुक अमुक एक रुपया, तमूक तमूक दोन रुपये, अशा प्रकारे. ज्याचा आहेर अकरा रुपये किंवा त्याच्या वर असेल, त्याच्याबद्दल तर खूप भारी वाटायचं. त्याच्यानंतर लग्नानंतर दोन-चार दिवसातच नवरदेव त्याला लग्नात हुंडा म्हणून मिळालेला रेडिओ गळ्यात घालून, मिळालेल्या सायकलवर ऐटीत टांग टाकून आणि मिळालेले हॅंडो सँडोचे घड्याळ हातामध्ये सगळ्यांना दिसेल अशा दिमाखात दाखवत, गावात पूर्ण फेरफटका मारायचा, त्यावेळेस त्याची शान काही औरच होती. आत्ताच्या नवरदेवांना त्याच्या शंभर पट मिळाले, तरी त्याची सर येणार नाही हे नक्की. लग्नाच्या दोन दिवस अगोदर सर्वांसोबत बुंदी बनविण्यासाठी केलेले जागरण, किंवा लापशी वा भात बाजेवर टाकून नंतर वाढायला घेतांना अक्षरशः वापरलेले फावडे, पिण्यासाठी नदीवरून बैलगाडीने टिपाड भरून आणताना पूर्ण ओलेचिंब होणे, हे सर्व इतिहास जमा झालेय. पूर्वी लग्नात ईर काढायची. वीर म्हणजे एक मनोरंजनाचा कार्यक्रम होता. एका ज्येष्ठ माणसाला ईर करायचं त्याला एकानं टावेल गुंडाळून माग उडून धरायच. पुढे भावकीतली पाच 25 पोरं हातात करंजाच्या फोका घेऊन उभा असायची. इरापुढे सुपारी ठेवायची. पोर ईराला चुकवून सुपारी घेऊन पळवायचे आणि इर पोरास्नी सुपारी घेताना बडवायचा. काय बहाद्दर इराकचा ठोका काठीवर घालायचे आणि इराला चिडवायची. एक तास लागायचा हिराला यायला. तोवर इकड नवरदेव पारण्याला जायची तयारी केलेली असायची. गावातली सगळ्यात चांगली देखणी सायकल आणायची आणि नवरदेवाला सायकलीवर बसून पारण्याला घेऊन जायचे. हिराचा आणि पारण्याचा गाव येडा व्हायला तासभर लागायचा. तोपर्यंत मांडवात तांदळाची तयारी झालेली असायची. नवरा नवरी कपाळाला भलं मोठं बाशिंग बांधून लाकडाच्या पाटावर येऊन बसायची. मग मंगलाष्टका व्हायच्या. जेवणाच्या पंगती उठायच्या. लग्नाआधी मुला-मुलीच्या वडिलांसोबत त्यांना घालावयाची आंघोळ, त्यानंतर सर्वांना आग्रहाने धरून आणून कपाळभर भरलेला मळवट, त्यावरून लावलेली चमकी सगळे नव्या पिढीला पटणार देखील नाही. "आली ईईईईई लग्नघटी समीप नवरा" ... अशी आरोळी कानावर पडली की बूड झटकायला सुरुवात करायची. नंतर वाजवा रे वाजवा .... असे म्हणला, की मंडपाच्या बांबूला पाठ लावून बसायचे . गावातल्या लग्नात जेवायची ही गंमत ज्यांनी अनुभवली असेल, त्यांना कोणत्याही महागड्या हॉटेलात अजिबात मज्जा येणार नाही. पत्रावळी वाटणारी मंडळी विशेष क्रूर आणि निष्ठूर का असत कोण जाणे ! फाटलेली पत्रावळ बघून सुद्धा मुद्दाम दुसरी पत्रावळ देत नसत ... आणि जर दिलीच तर तीही एकदम तुकडा झालेली. जणू लग्न यांच्या घरच हाय. पूर्वी लय मोठे लगीन असलं तर कुठेतरी पोळ्या असायच्या नाहीतर लापशी भात ठरलेले जेवण. नंतर कळ्या आल्या. त्यानंतर बुंदी आले आणि नंतर बुंदीचे लाडू. लगीन दारात केलं आणि गावभर बुंदीचे जेवण घातलं म्हणून नवरा नवरीचे बाप मिरवायचे. रात्री बैलगाडीतून वरात निघायची. लाईट नव्हती तेव्हा गॅसच्या 32 च्या उजेडात वराती पुढे लेझमीचा डाव रंगाचा. घरातल्या आठ वाजता निघालेली वरात पाटच घरी पोहोचायची. भावकीतली आणि गावातली पोरं रात्रभर लेझीम खेळून आणि नाचून मजा करायची. बडी पार्टी असेल तर गावठी दारूचे भलं मोठं बैलगाडीत मागे असायचं. काय जण दारू लय झाल्यामुळे अर्ध्यावरच माघारी परतायच.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते