मुख्य सामग्रीवर वगळा

आमदार अनिलभाऊ कॅबिनेट मंत्री होणार

मे महिन्याच्या अखेरीस राज्य सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची शक्यता असून मंत्रिमंडळात खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांचे नाव आघाडीवर आहे. आमदार अनिल बाबर यांना मंत्रिपद मिळाल्यास खानापूर विधानसभा मतदारसंघाला स्थापनेपासूनचे पहिलेचे मंत्रीपद असणार आहे. आमदार बाबर यांना मदत व पुनर्वसन किंवा मृद व जलसंधारणचे कॅबिनेट मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.                 नुकताच उच्च न्यायालयाने 40 आमदार अपात्रतेचे अपील नुकतेच फेटाळले आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे फडवणी सरकार सुरक्षित झाल्यामुळे मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार करण्याच्या हालचाली गतीने सुरू झाल्या आहेत. येत्या शुक्रवार ता.२६ किंवा रविवारी ता. 28 मे रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेतून आमदार अनिल बाबर यांचे नाव निश्चित झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी आमदार बाबर यांच्या पत्नीचे निधन झाल्याने ते मंत्रीपदापासून लांब राहिले होते. दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आमदार बाबर यांच्या नावावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. यासंबंधी दोन दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.                                               आमदार बाबर यांना कोणते खाते मिळणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून आमदार बाबर यांची ओळख आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या बंडामध्ये आमदार अनिलभाऊ आघाडीवर सहभागी होते. मुख्यमंत्र्यासह 16 आमदाराच्या अपात्रतेमध्ये अनिलभाऊंचे नाव होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार बाबर यांना यापूर्वीच विकास निधी देऊन बळ दिले आहे. दोघांचे खूप निकट संबंध आहेत. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाच कॅबिनेट खात्याचा कारभार आहे. त्यातील मदत व पुनर्वसन विभाग किंवा मृद व जलसंधारण या दोन खात्यापैकी एक कॅबिनेट मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पालक मंत्र्यांच्याही निवडी जाहीर केल्या जाणार आहेत. कदाचित जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आमदार अनिलभाऊ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागले आहे. आमदार बाबर यांच्या रूपाने मतदारसंघाला पहिल्यांदाच मंत्रिपद मिळण्याची आशा पल्लवीत झाल्या आहेत. यापूर्वी तासगाव, सांगली,इस्लामपूर आणि कडेगाव विधानसभा मतदारसंघालाच मंत्रीपदी मिळाली होती. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात अनेक वेळा खानापूर मतदारसंघाला मंत्रीपदापासून लांब ठेवण्याचे अनेक वेळा कारस्थाने झाली होती. यावेळी साऱ्या गोष्टी जुळून आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते