मुख्य सामग्रीवर वगळा

माणगंगेच्या आखाड्यातून देशमुखांची माघार, निवडणूक बिनविरोध

आटपाडी येथील बंद असलेल्या माणगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीतून अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी आश्चर्यकारक सर्वच उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या गटाचे 18 उमेदवार बिनविरोध निवडून आले. अनपेक्षितरित्या  देशमुख गटाने उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.                                        येथील माणगंगा साखर कारखान्याची निवडणूक लागली होती. सत्ताधारी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख गटाने आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या गटाने परस्परांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 18 जागेसाठी 76 उमेदवारी अर्ज छाननीनंतर शिल्लक राहिले होते. निवडणूक बिनविरोधीसाठी बरेच वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाले होते. जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील गटाचे सर्व उमेदवारी अर्ज माघारी घेतील, अशी चर्चा होती. मात्र तानाजीराव पाटील यांनी निवडणूक बिनविरोधाला प्रतिसाद न देता निवडणूक लढण्याचा निर्धार जाहीर केला होता. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी देशमुख गटाचे कार्यकर्ते बाबासाहेब देशमुख सूतगिरणीवर मोठ्या संख्येने जमा झाले होते. तर तानाजीराव पाटील गटाचे कार्यकर्ते त्यांच्या महाविद्यालयावर मोठ्या संख्येने जमा झाले होते. संपूर्ण तालुक्याचे या दोन्ही गटाच्या हालचालीकडे आणि निर्णयाकडे लक्ष लागले होते. अर्ज माघारी घेण्याच्या पंधरा मिनिटे अगोदर देशमुख गटातून उमेदवारी दाखल केलेले सांगोला तालुक्यातील पाच उमेदवारी अर्ज अचानक माघारी घेतले. त्यानंतर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची बंद खोलीत चर्चा झाल्यानंतर राजेंद्र अण्णा देशमुख यांनी बाहेर येऊन कार्यकर्त्यांना आणि उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या सूचना दिल्या. या निर्णयाचा त्यांच्या कार्यकर्त्यांना आश्चर्यकारक धक्का बसला. अनेक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला मात्र श्री. देशमुख यांनी विरोधकांनी कारखाना जरूर चालवावा. म्हणजे त्यांना कारखानदारी समोरील प्रश्न आणि अडचणी समजतील. त्यांनी कारखाना चालू करावा यासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर उमेदवारांनी निवडणूक कार्यालयात जाऊन सर्वच उमेदवारी अर्ज माघारी घेतले.        तिकडे तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज निश्चित करून उर्वरित अर्ज माघारी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे 18 अर्ज शिल्लक ठेवून इतर सर्वच अर्ज दुपारी तीन पर्यंत माघारी घेतले.       माणगंगा साखर कारखान्याच्या स्थापनेपासून ३७ वर्षाची सत्ता जाऊन कारखान्यात ऐतिहासिक सत्तांतर झाले. कारखान्यावर शिंदे गटाच्या शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांच्या गटाची निर्विवाद सत्ता आली. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर बाजार समितीवर तानाजीराव पाटील यांनी सत्ता मिळवली होती. त्यानंतर कारखान्यावर सत्ता मिळवून देशमुख गटाला तिसरा जबर धक्का दिला आहे.                                                                      नुतन संचालक मंडळ-शिवाजी भगवान पाटील, जगन्नाथ आनंदा लोखंडे, कुंडलिक आनंदा आलदर,अनिल बाबा कदम, कृष्णा रामचंद्र गायकवाड, सागर बाळासो ढोले,बाळू भिमराव मोरे,तातोबा आप्पासाहेब पाटील,नाना नामदेव बंडगर, सुरेश पांडुरंग जरे,दादासो बायाजी वाघमोडे, पांडुरंग विठ्ठल पिसे, रमेश शिवाजी हातेकर, उज्ज्वल जालिंदर नवले,रतन वसंत मोरे, रामेश्वर ज्ञानू खिलारी, ब्रम्हदेव नाना होनमाने.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते