स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय करण्यासाठी निवासस्थान कार्यालय घेण्यासाठी आटपाडी तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक लाख एक हजार रुपये गोळा करून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडे सुपूर्द केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरगर आणि त्यांच्या मावळ्यानी या निधीचे संकलन केले होते. या लोकनिधी संकलन आणि समर्पन सोहळा आटपाडी पार पडला. यावेळी महाराष्ट्र लोकहितवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तात्यासाहेब गायकवाड, रासकचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव ज्ञानेश्वर सलगर, रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित पाटील, रासपचे आणि तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरगर प्रमुख उपस्थित होते. दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हावी यासाठी कार्यालय निवासस्थान घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी महादेव जानकर यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या जिवावर राष्ट्रीय समाज पक्ष चालू आहे. ज्या कुटुंबातील कुणीही राजकारणात नसणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना पैलू पाडून राजकारणात नेते बनवण्याचे काम पक्ष करतो. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष आणि त्याग करणारा असल्याचे प्रतिपादन केले. या वेळी रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महाराष्ट्र महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने यांची भाषणे झाली. यावेळी उमाजी चव्हाण, कालिदास गाढवे, सत्यजित गलांडे, विलास चव्हाण, अजित कटरे, अरुण झंजे, सुदाम जरग, संदेश खटके, प्रशांत खुपकर, यश माने, सुहास सरगर, विशाल सरगर, विजय सरक, महादेव कोळेकर आदी उपस्थित होते. फोटो-१) आटपाडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करण्यासाठी संकलीत केलेला निधी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडे सुपूर्त केला.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा