मुख्य सामग्रीवर वगळा

आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद ा निवडणुकीची अशी होणारा मतमोजणी

आटपाडी ता. 8- आटपाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांसाठी पार पडलेल्या मतदानाची मोजणीची  जय्यत तयारी पूर्ण केली असून 19 टेबल्सवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये एका टेबलावर टपाली आणि इतर 18 टेबलावर ईव्हीएम मशीन मतदानाची मोजणी केली जाणार आहे.  साधारण चार तासात सर्व निकाल स्पष्ट होतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी  समाधान शेंडगे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शीतल बंडगर यांनी दिली. 
मतमोजणीसाठी एकूण 19 टेबल्सची व्यवस्था केली आहे. यापैकी 18 टेबल्सवर ईव्हीएम  मशीनमधील मतांची मोजणी होईल, तर एक टेबल टपाली मतपत्रिकेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. संपूर्ण चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीची मतमोजणी प्रक्रिया एकूण 11 फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे.
 खरसुंडी जिल्हा परिषद गटात पासून मतमोजणीची सुरूवात केली जाणार. त्यानंतर अनुक्रमे करगणी, दिघंची आणि  सर्वात शेवटी निंबवडे गटांची मतमोजणी केली जाईल. साधारण एका गटाची मतमोजणी चार फेऱ्यात पूर्ण होईल. त्यासाठी एक तास वेळ जाऊ शकतो. चारही गटाची मतमोजणी दुपारी दोन पर्यंत पूर्ण होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.गटनिहाय आणि गणनिहाय निकाल जाहीर केले जाणार असून, एकावेळी फक्त संबंधित गटातील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनाच कक्षात प्रवेश दिला जाणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने एक पोलीस उपअधीक्षक, दहा पोलीस अधिकारी आणि शंभर पोलीस अंमलदारांसह होमगार्डचा मोठा ताफा तैनात करण्यात केला आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई केली आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी तहसील कार्यालय येथे ओळखपत्रांचे वितरण केले आहे.
नागरिकांना निकालाची माहिती मिळावी म्हणून तहसील कार्यालयाबाहेर लाऊडस्पीकरची सोय केली आहे. तसेच पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. 
मतमोजणीसाठी 122 अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते