आटपाडी ता. 4- पिंपरी खुर्द आणि आंबेवाडीत आज खळबळ उडणारी राजकीय घटना घडली. गावचे माजी उपसभापती व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे खंदे कार्यकर्ते रुपेश पाटील आणि आंबेवाडीचे सुनील पुजारी यांनी राष्ट्रवादी–शिवसेना महायुतीचे उमेदवार विनायक मासाळ आणि रामदास सूर्यवंशी यांना आपला खणखणीत पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे पिंपरी आणि आंबेवाडी परिसरात विरोधकांच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
कार्यकर्त्यांचा निर्धार; प्रचारातही आघाडीवर
केवळ पाठिंबा देऊन न थांबता, स्वतः प्रचारात आघाडीवर राहून विनायक मासाळ आणि रामदास सूर्यवंशी यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार रूपेश पाटील आणि सुनील पुजारी यांनी व्यक्त केला. या घडामोडींमुळे राजकीय पटलावर मोठी खळबळ उडाली असून महायुतीचे पारडे जड झाले आहे. पिंपरी खुर्दमध्ये 'भरती'; अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रवेश
याचवेळी अमित कदम, सुरेश कदम, प्रदीप कदम, सचिन कदम, पप्पु सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी–शिवसेना युतीत प्रवेश केला. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे पिंपरी खुर्दमध्ये महायुतीची ताकद कमालीची वाढली असून विरोधकांना खिंडार पडले आहे.
दिग्गजांची उपस्थिती
या सोहळ्याप्रसंगी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आमदार सुहास बाबर, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, भारत तात्या पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, सभापती संतोष पुजारी यांसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा