खरसुंडी, ता. आटपाडी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. चंद्रकांतभाऊ भोसले तसेच खरसुंडी पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ. लताताई अर्जुन पुजारी सावकार यांच्या प्रचारार्थ ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह बापूसाहेब देशमुख, सरपंच धोंडीराम इंगवले, माजी सरपंच अर्जुन पुजारी, राहुल गुरव, सुभाष चोपडे, भाऊसाहेब गायकवाड, धनंजय पुजारी, नंदकुमार झंजे, विजय पुजारी, किरण पुजारी, बादशाह इनामदार, अतुल मोहिते, किरण सावकार, विक्रम भिसे, रणधीर गुरव यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नेते, कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच खरसुंडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा