आटपाडी ता.4-आटपाडी पश्चिम भागातील खरसुंडीचे श्री. सिद्धनाथ, घोडेखूर,जकाईदरा, भिमाशंकर आणि शुकाचार्य या पवित्र देवस्थानच्या भरीव विकासासाठी जयदीप भोसले यांना जिल्हा परिषदेत पाठवा, असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केले. खरसुंडी गटाचे शिवसेनेचे उमेदवार जयदीप भोसले पंचायत समितीच्या उमेदवार डॉ. मिनाक्षी पुजारी, सुनिता सरगर यांच्या प्रचारार्थ तळेवाडी, काळेवाडी, गोमेवाडी, हिवतड, मानेवाडी, अर्जुनवाडी आदी गावांचा आमदार सुहास बाबर यांनी दौरा करून प्रचार सभा घेतल्या. त्यांच्या सोबत जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, तीर्थक्षेत्र आघाडीचे भारत पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, हरीभाऊ माने आदी सोबत होते. यावेळी आमदार श्री. बाबर यांनी खरसुंडीचे श्री. सिद्धनाथ देवस्थानला चारही बाजूने जोडणाऱ्या रस्त्यासाठी 177 कोटी रुपये देऊन कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. खानापूर मतदार संघात सर्वाधिक नेलकरंजी परिसराला मोठी धार्मिक स्थळाचे भाग्य लाभले आहे. त्याचा कायापालट केला जाईल. शेतीसाठी पाणी आले आहे आता विजेची गरज आहे. 50% भागात दिवसा वीज देण्याचा प्रयोग सुरू केला आहे. उर्वरित भागालाही काही दिवसातच दिवसा वीज मिळेल. राजकारणात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यायचं असतं. त्याची जाण असलेल्या आणि तुमची काळजी घेणारे जयदीप भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संधी द्या. तीच मोहनकाका भोसले यांना खरी श्रद्धांजली ठरेल.". श्री. पाटील म्हणाले,"कामे सांगून मते मागतो. विरोधक मतासाठीच गावात येतात त्यांना प्रश्नच माहीत नाहीत. त्यामुळे सोडवणं लांबच आहे. विरोधकांचा शिव्या देण आणि दहशत निर्माण करण एवढाच कार्यक्रम चालू आहे. शिव्या देणाऱ्याना यावेळी खड्यासारखे बाजूला काढा. यावेळी अनेकांची भाषणे झाली. यावेळी आनंदराव देशमुख, संजय देशमुख, दादासाहेब सरगर, सरपंच नाना सरगर, शामराव म्हारगुडे, नानासाहेब सरगर, जगन्नाथ सरगर, मारूती सरगर आदी उपस्थित होते. फोटो -१) तळेवाडी ता. आटपाडी खरसुंडी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार जयदीप भोसले आणि पंचायत समिती उमेदवाराच्या प्रचारार्थ आमदार सुभाष बाबर यांनी तळेवाडी येथे प्रचार सभा घेतली.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा