मुख्य सामग्रीवर वगळा

माजी मंत्री महादेव जानकर यांनी शिलेदारासाठी वाडीवस्ती पिंजून काढली

आटपाडी ता. ४-आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापला असून, आपल्या एकनिष्ठ सहकाऱ्यांच्या विजयासाठी माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कंबर कसली आहे. आपल्या शिलेदारांना जिल्हा परिषदेत पाठवण्यासाठी त्यांनी तालुक्यातील गावे आणि वाड्यावस्त्या पिंजून काढल्या असून, एका माजी मंत्र्याची आपल्या कार्यकर्त्यासाठीची ही धडपड पाहून मतदार अक्षरशः भारावून गेले आहेत .                              *रासपाच्या उमेदवारांसाठी मैदानात*
खरसुंडी जिल्हा परिषद गटातून सत्यवान गलांडे, दिघंची गटातून संदेश खटके आणि करगणी गटातील रासपाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ जानकर यांनी स्वतः मैदानात उतरून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. "प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी द्या," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वाड्यावस्त्यांवर थेट संवाद:
महादेव जानकर यांनी आपल्या दौऱ्यात तळेवाडी, काळेवाडी, हिवतड, मानेवाडी, मेटकरवाडी, गोमेवाडी, अर्जुनवाडी, लेंगरेवाडी, मासाळवाडी, आंबेवाडी, बोबेवाडी, पुजारवाडी, राजेवाडी आणि लिंगीवरे यांसह अनेक गावांचा दौरा केला. या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ सभा न घेता प्रत्यक्ष वाड्यावस्त्यांवरील ज्येष्ठ मेंढपाळ, महिला, भगिनी आणि तरुण-तरुणींशी जिव्हाळ्याचा संवाद साधला*.               कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन बांधली मोट*
प्रत्येक गावातील प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन जानकर यांनी सविस्तर चर्चा केली. राज्याचे मंत्रिपद भूषवलेला एक मोठा नेता थेट सामान्य मतदाराच्या दारात येऊन संवाद साधत असल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जागोजागी त्यांचे औक्षण करून आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
या दौऱ्यामुळे आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत असून, जानकरांच्या या 'फिल्डिंग'मुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते