मुख्य सामग्रीवर वगळा

महिला आणि तरुणांचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी अँड. मोटेनाचा संधी द्या- आमदार सुहास बाबर

आटपाडी ता. 4- महिला आणि तरूणांचे  उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी विद्या मोटे यांनाच जिल्हा परिषदेला संधी द्या, अशी साद आमदार सुहास बाबर यांनी घातली.              निबवंडे जिल्हा परिषद गटाची निवडणुक प्रचार सभेचे घरनिकी आणि बनपुरी येथे आयोजन केले होते. यावेळी आमदार श्री. बाबर बोलत होते. यावेळी उमेदवार अँड. विद्या मोटे, तानाजीराव पाटील, अनिल पाटील, अहिल्या पुकळे प्रमुख उपस्थित होते. आमदार श्री. बाबर यांनी गावात, तालुक्यात आणि मतदार संघात केलेल्या कामांचा आढावा मांडला. ते म्हणाले,'पन्नास टक्के खानापूर मतदार संघात शेतीसाठी दिवसा वीज दिली आहे.काही दिवसातच भाडेतत्त्वावर जमिनी घेऊन सौरऊर्जा प्रकल्प उभारून शेतीला दिवसा वीज देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सांगली जिल्हात सर्वात जास्त चांगली जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आरोग्य सुविधाची गुणवत्ता सुधारून रस्त्यांची कामे केली आहेत. आम्ही केलेली आणि करणारी कामे सांगून मतदान मागतो. तर विरोधकांकडे सांगण्यासारखे कामच नाही. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून बाहेरून पोरं आणून गाड्यांची तोडफोड सुरू केली आहे.या दहशतीला न भिता आणि प्रत्युत्तर न देता गोड बोलून मोडीत काढण्याचे अहवान केले. महिला आणि तरूणांनी जागे व्हावे. त्यांचे भवितव्य घडविणारयाचया मागे उभा राहण्याचे आवाहन केले. अँड. मोटे यांनी फौंडेशनच्या माध्यमातून केलेल्या कामांचा आढावा मांडला. समाजातील सुशिक्षित तरूण पिढी जागी झाली आहे. ती विरोधकांच्या भुलथापांना बळी पडत नसल्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. यावेळी तानाजी पाटील आणि अनिल पाटील यांची भाषणे झाली. यावेळी राजा अर्जुन, आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते