मुख्य सामग्रीवर वगळा

रोम जळत होता,तेव्हा निरो फिडल वाजवत होता

  रोम जळत होतं, तेव्हा निरो फिडल वाजवत होता…”


रोमन सम्राट निरो बाबतची ही म्हण प्रसिद्ध आहे. रोममध्ये जाणीवपूर्वक आग लावण्याचा आरोप निरोवर केला जातो.

फिडल हे एक तंतुवाद्य आहे.

आपली आई, सावत्र भाऊ आणि पत्नींची हत्या घडवून आणणारा आणि दरबारातल्या किन्नरांसोबत लग्न करणारा एक क्रूर राज्यकर्ता अशी इतिहासात निरोची नोंद आहे.

वयाच्या सोळाव्या वर्षी निरो आईच्या प्रयत्नांमुळे राजगादीवर आला. साल होतं इसवी सन 54. या साम्राज्याच्या सीमा स्पेनपासून ते उत्तरेला ब्रिटन आणि पूर्वेला सीरियापर्यंत पोहोचलेल्या होत्या.

निरोची आई अग्रिपीना हिला सत्तेची लालसा होती. कटकारस्थानं करत तिने निरोला सत्ता मिळवून दिली.

अग्रिपीनाने तिचा काका सम्राट क्लॉडियसशी विवाह केला आणि त्याच्या लेकीशी निरोचं लग्न लावून दिलं. त्यामुळे निरो राजघराण्याचा सदस्य तर झालाच पण सोबतच राजाला स्वतःचा मुलगा असूनही निरो सम्राट क्लॉडियसचा उत्तराधिकारीही ठरला.

अग्रिपीनाने सम्राट क्लॉडियसला विषारी मश्रूम म्हणजे अळंबी खायला घालून ठार केलं, असं म्हटलं जातं. पण यामध्ये कितपत तथ्य आहे, हे सिद्धं होऊ शकलेलं नाही

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते