मुख्य सामग्रीवर वगळा

पराभवाच्या राखेतून दत्तात्रय पाटील यांची फिनिक्स भरारी

आटपाडी ता. 11- करगणी ग्रामपंचायती थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत निसटता पराभवाच्या राखेतून सावरून दत्तात्रय पाटील यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीत तब्बल २८९५ मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवत फिनिक्स भरारी घेतली. तर करगणीला ज्येष्ठ नेते कै. अण्णासाहेब पत्की, कै. विजयसिंह पाटील आणि कै. सर्जेराव खिलारी यांच्या पश्चात चांगले सर्वसमावेशक नेतृत्व मिळाले.
 ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने विरोधकांनी दत्तात्रय पाटील यांच्या राजकीय कारकीर्दवर शंका उपस्थित केली होती. मात्र, 'राजकारणात पराभव हा शेवट नसतो' हे पाटील यांनी सिद्ध केले. या विजयामुळे त्यांचे राजकीय वजन केवळ करगणी गणातच नव्हे तर संपूर्ण आटपाडी तालुक्यात वाढले आहे.
भाजपचे तगडे उमेदवार संभाजी पाटील यांना केवळ ४२८२ मतांवर समाधान मानावे लागले. तर दत्तात्रय पाटील यांना मिळालेला ७१७७ मतांचा कौल दिला. ् या निवडणुकीतील सर्वाधिक मतांपैकी एक विजय मानला जात आहे.
राजकीय समीकरणांमध्ये बदल
दत्तात्रय पाटील यांचा हा विजय केवळ एक जागा जिंकण्यापुरता मर्यादित नसून, तो आगामी काळातील तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे. आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. 
हा निकाल अनेक तरुण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे, तर प्रस्थापित नेत्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. पंचायत समितीवर भगवा फडकवत असतानाच, दत्तात्रय पाटील यांच्या रूपाने जमिनीवर काम करणारे नेतृत्व मिळाले आहे.
एकूणच, या निकालाने आटपाडीच्या राजकारणात दत्तात्रय पाटील यांचे नाव आता ठळकपणे कोरले गेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते