आटपाडी (प्रतिनिधी) जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करगणी गटातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून गावनिहाय प्राथमिक अंदाज समोर येत आहेत. या गटात शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट आणि चुरशीची लढत पाहायला मिळत असून, मतदारांचा कौल कोणाकडे झुकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. *शिवसेनेचे 'वर्चस्व' आणि मताधिक्याची गावे*
प्राथमिक अंदाजानुसार, शिवसेनेची पकड अनेक महत्त्वाच्या गावांमध्ये मजबूत दिसत आहे. विशेषतः करगणी, शेटफळे, मासाळवाडी, खानजोडवाडी आणि यपावाडी या गावांमध्ये शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पिंपरी गावात मध्यम स्वरूपाचे, तर माळेवाडी आणि तडवळे गावांतून थोड्या मताधिक्याचा कल शिवसेनेच्या बाजूने दिसत आहे.
*भाजपाचीची या गावावर भिस्त*
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षालाही बोंबेवाडी गावात भाजपला मोठे मताधिक्य मिळण्याचे संकेत आहेत. माडगुळे गावात मध्यम स्वरूपाचे तर लेगरेवाडी आणि आंबेवाडी या गावांतून भाजपला निसटती आघाडी मिळण्याची चिन्हे आहेत. पात्रेवाडीत दोघांनीही समान संधी आहे.
Bjp
उत्तर द्याहटवा