मुख्य सामग्रीवर वगळा

नेलकरंजी गणात विकासापुढे विरोधकाची तटबंदी ढासळल,ी सुनिता सरगर यांच्या परड्यात जनमताचे भरभरून दान

आटपाडी ता. 3- नेलंकरजी पंचायत समिती गणात शिवसेनेच्या उमेदवार सुनिता सरगर यांनी प्रचारात  आघाडी घेतली असून, त्यांचा झंझावात कायम आहे. तळेवाडी, गोमेवाडी, मानेवाडी आणि नेलकरंजी यांसारख्या गावांतून मिळालेला अभुतपुर्व प्रतिसादामुळे त्यांच्या विक्रमी मताधिक्यावर आता शिक्कामोर्तब झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 
खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयदीप भोसले आणि तळेवाडी गणाच्या उमेदवार सुनिता सरगर यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर, तानाजीराव पाटील, भारत पाटील आणि अनिल पाटील यांनी गावोगावी झंझावाती सभा घेतल्या आहेत.             *गावकरी शिवसेनेच्या पाठीशी*
गेल्या चार दिवसांपासून तळेवाडी गणातील प्रत्येक गावात सुनिता सरगर यांच्याबद्दल सहानुभूती आणि पाठिंबा वाढत चालला आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेने गेल्या काही काळात केलेल्या विकासकामांना पाहुन विरोधकांच्या हक्काच्या मतदारांनीही आता शिवसेनेचा रस्ता धरला आहे. प्रचारादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केल्याने युतीची ताकद द्विगुणित झाली आहे.शिवसेनेच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधकांची प्रचार यंत्रणा कमालीची ढिल्ली पडली असल्याचे चित्र आहे. कार्यकर्त्यांची धरसोड आणि मतदारांचा थंड प्रतिसाद यामुळे विरोधी गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तळेवाडी, गोमेवाडी आणि नेलकरंजी या पट्ट्यात सुनिता सरगर यांना मिळणारे समर्थन पाहता, जयदीप भोसले आणि सरगर यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते