निंबवडे येथे शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवून गावातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व नानाशेठ दगडू शेंडगे व विठ्ठलशेठ दगडू शेंडगे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेनेच्या ध्येयधोरणांवर व पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून हा प्रवेश करण्यात आला.
या पक्षप्रवेशाप्रसंगी आमदार सुहास बाबर, उद्योजक राहुल हजारे तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या दोघांचे स्वागत केले.
निंबवडे जिल्हा परिषद गटातील उमेदवार अॅड. विद्याताई सचिन मोटे यांना पाठबळ देण्यासाठी तसेच शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या उद्देशाने हा पक्षप्रवेश करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रवेशामुळे निंबवडे व परिसरात शिवसेनेला बळ मिळणार असून आगामी निवडणुकीत पक्ष अधिक सक्षमपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नवीन कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून जनहितासाठी व गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा